नवीन लेखन...

माझी अधिकमासी पाककृती खास जावयासाठी -पनीर वेज बिन्दापुरी

आपल्या इथे अधिक मासात जावयाला वाण देण्याची पद्धत आहे. गेल्या रविवारी लेक-जावयाला जेवायला बोलविले होते. शनिवारी रात्री सौ.ने अनरसे केले होते. (किमान ३३ अनरसे तरी जावयाला द्यायचे असतात, ते ही एका तांब्याच्या किंवा पितळेच्या डब्यात). साहजिक आहे चिवडा ही केला होता. रविवारी सकाळी सौ.ने सहज म्हंटले, मी केलेल्या पाककृती तुम्ही आपल्या नावाने खपवितात. आज लेक- जावई येणार आहे. त्या साठी तुम्हीच डिश बनवा. मी ही म्हणालो त्यात काय आहे, मला ही चांगले पदार्थ बनविता येतात, तू बघच. त्यावर सौ. म्हणाली साधी- सौपी पनीरची भाजी करा. काल संध्याकाळीच बाजारातून अर्धा किलो विकत घेतले आहे. टमाटर, कांदे आणि शिमला मिर्च ही आहे. तेवढ्यात लेकीचा फोन आला. बहुतेक तिच्या आईने तिला आज बाबा रेसिपी बनविणार आहे याची कल्पना दिली असेल. ती म्हणाली, बाबा नेहमी सारखी पंजाबी स्टाईल पनीरची भाजी बनवू नका, काही तरी वेगळ बनवा. विचार करू लागलो आणि एक नवीन कल्पना सुचली. पनीर, टमाटर, कांदे आणि शिमला मिरची (ढोबळी मिरची) वापरून भाजी करायचे ठरविले.

आता भाजीचे साहित्य बघू. अर्धा किलो पनीरचे चौकोर आकाराचे तुकडे कापून घ्या. ४ टमाटर मध्यम आकाराचे, प्रत्येक टमाटरचे ६ भाग करून घ्या. कांदे ही थोडे जाडसर कापा. शिमला मिरचीचे ही थोडे मोठे आकाराचे तुकडे करा. या शिवाय ३-४ हिरव्या मिरच्या बारीक चिरून घ्या. अर्धा ईंच आले बारीक चिरून घ्या. खालील चित्रात चिरलेली भाजी दाखविली आहे.
या शिवाय विनेगर , टमाटर सोया साॅस, काळी मिरीची पावडर आणि जिरे ही वापरले.

कढई गॅस वर ठेऊन गैस मध्यम ठेवा. आधी चार टेबल स्पून तेल टाका, तेल गरम झाल्यावर एक लहान चमचा जिरे, चिरलेली मिरची आणि आले टाका. नंतर कांदे टाका. दोन एक मिनिटे कांदे परतल्यावर टमाटर आणि पनीर घालून एक-दीड मिनिटे परता. (आपल्याला टमाटर ची ग्रेवी करायची नाही आहे, म्हणून टमाटर पनीर सोबत टाकले) नंतर त्यात चिरलेली शिमला मिरची, एक मोठा चमचा काळी मिरी पूड, दीड चमचे सोया साॅस, २ चमचे विनेगर, ४-५ चमचे टमाटर साॅस आणि स्वादानुसार मीठ टाकून भाजी व्यवस्थित परतून घ्या, नंतर कढई झाकण ठेवा. २ मिनिटानंतर झाकण काढून, पाणी सुटले असेल तर गॅस मोठा करून एक-दीड मिनिटे भाजी परतून घ्या आणि गॅस बंद करा. भाजी खालील चित्रा प्रमाणे दिसेल.

मी केलेली ही भाजी सर्वांना आवडली. भाजीला काळीमिरी, सोया साॅस आणि आले टाकल्यामुळे एक वेगळा स्वाद आला होता. (थोडा सलाड सारखा) जर तुम्हाला तिखट, चरमरीत आवडत असेल तर जास्त हिरव्या मिरच्या टाकू शकतात.

मी दिल्लीत बिंदापूर या गावाजवळच्या बिंदापूर एक्स. या कॉलोनीत राहतो म्हणून भाजीला हे नाव दिले आहे.

टीप: (इथे एक गोष्ट नमूद करणे गरजेचे. शिमला मिरचीत बिया फार असतात, आपण त्या भाजीत वापरत नाही. शिमला मिरची विकत घेताना, दोन एका आकाराच्या मिरच्या हातात घेऊन पाहाव्या जी कमी वजनाची असेल ती निवडावी. अश्या रीतीने भाजी विकत घेतली तर अध्या किलोत 2-३ मिरच्या सहज जास्त बसतात).

Avatar
About विवेक पटाईत 194 Articles
संवेदनशील मन, लेखन व वाचनाची आवड मराठीसृष्टी वर नियमित लेखन.

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..