नवीन लेखन...

मंगल मंदिर हे माझे माहेर

मंगल मंदिर हे माझे माहेर – मंगल….
जगावेगळे असे हो सुंदर – असे हो सुंदर
मंगल मंदिर हे माझे माहेर धृ

हिरवागार अती परिसर त्याचा
प्रासादची जणु शिवरायांचा
प्रांगणात या विश्वकर्मा
आत भवानीचे सुंदर मंदिर – जगावेगळे… १

आकार मोठा तरीही बैठा
आंत आहे हो भव्य दिव्यता
देव-देवींच्या संत विभूतींच्या
मूर्ती असती नयन मनोहर – जगावेगळे… २

मारूती राया प्रवेश द्वारी
रिध्दी सिध्दी सह गणेश स्वारी
श्री राम जानकी लक्ष्मण हनुमंत
लोचन खिळती हो त्यांच्यावर – जगावेगळे… ३

शिवपिंडीवर भुजंग फणीधर
फणा उभारी ऐकुनिया स्वर
पुढे सावळा हा मुरलीधर
मुरली वाजवी मंजुळ सुस्वर – जगावेगळे…

संत विभूतींच्या सजीव मूर्ती
साई बाबा अन् समर्थ स्वामी
संत गजानन आशिष देती
सदैव राहे शिरी त्याचा कर – जगावेगळे… ५

गाभार्‍या मधी तुळजामाता
प्रगट जाहली ही अष्टभूजा
श्री दत्तात्रय, रखुमाई विठ्ठल
लक्ष्मी नारायण रेखीव सुंदर – जगावेगळे… ६

छत्रपती श्री शिवाजी राजे
सिहासनावरी येथे विराजले
आदराने त्यांच्या पुढे झुकते माथे
सदा घुमवा त्यांचा जयजयकार – जगावेगळे… ७

इथे बाजुला ठायी ठायी
शिल्पकलेची अपूर्व संचयी
छोटासा हा विधी-विनायक
कृपाछत्र हा धरी भक्तांवर – जगावेगळे… ८

वृक्षलतां मधे आहे शिवालय
त्यात बैसले भोळे शंकर
इथेच आहे पवित्र निर्मळ
सकळ जनांना भवानी सागर – जगावेगळे… ९

स्वयंभू येथे हा औदूंबर
छाया देई तो सकलांवर
पारावरती छोटे मंदीर
त्यात बैसले दत्त दिगंबर – जगावेगळे… १०

गायवासरांसवे अंगणी
पान्हा देई झरझर झरझर
येथील स्वामिनी चंदाराणी
ममतेला तिच्या अफाट पाझर – जगावेगळे… ११

माय माउली एक मागणे
ओटीत देग अहेव लेणे
आम्हा लेकींना प्रसन्न होऊनी
वरद हस्त हा ठेव शिरावर – जगावेगळे… १२

“माय भवानीत” या हो आता
विसरू न येथील कलाकुशलता
गोड घास हा देई तृप्तता
गुणीजन येथिल सेवा तत्पर – जगावेगळे… १३

आमुची ताई चंदाराणी
ओठी आहे अमृतवाणी
तुळजाईचे रूप घेऊनी
प्रेमळ कर हा ठेवी शिरावर – जगावेगळे… १४

असे हे माहेर अशी ही ताई
भेटी साठी आतुर होई
कोड कौतुका पारच नाही
मायेची ही घाला पाखर – जगावेगळे… १५

( वरील काव्य वरसगांव येथील श्री शिवभवानीचे सुंदर मंदिर व तेथील रम्य परिसराचे दर्शन घेतल्यावर तृप्त मनाने चिंतन करीत असताना उत्स्फुर्त पणे श्री तुळजा भवानी व सौ. ताई यांच्या प्रेमळ आशिर्वादाने रचले आहे.)

– गुलाब अरविंद प्रधान

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..