नवीन लेखन...

गेस हू ?





त्या दिवशी माझ्या मैत्रणीचा वाढदिवस होता. गुलाबाच्या चित्राचे भेटकार्ड घरात टाकले. त्यावर लिहिले “युवर्स लव्हली फ्रेंड. नीअर अॅण्ड डिअर. गेस हू ?” घरी गेल्यावर कामात गुंतून गेले. यजमानांची टूरवर व मुलीची ट्रेकिंगला जायची तयारी करायची होती. मुलगा बॅडमिंटन कोर्टवरुन जाऊन रिकामाच बसला होता. त्याला म्हटलं “मितू मावशीला फोन लाव बरं” मैत्रिणीच्या यजमानांनी फोन घेतला. कोण बोलतयं ही चौकशी न करताच “रॉंग कॉल” म्हणून ठेवून दिला.

तब्बल आठवड्यानंतर मी तिच्या घरी गेले. घरात आम्ही दोघी व तिची छोटी मुलगी होतो. तासाभरात तिच्या यजमानांनी पाच-सात वेळा फोन केले. मी थट्टेत म्हटलं “एव्हढ प्रेम, अजुनही ? अगं, आमचे फोनवरचे संभाषण होते ते फक्त विसरलेल्या महत्वाच्या गोष्टींसाठी !” मिता म्हणाली तुझा गोड गैरसमज खरा ठरू दे. माझ्या वाढदिवसाला एक पत्र आले आणि त्यावर लिहिले होते गेस हू ? त्या दिवशी हे घरी लवकर आले होते. त्यांच्या हातात ते पत्र पडले. मी त्यानंतर घरी पोहचले. घरी आल्यावर छोटीचा अभ्यास, शाळा, पाळणाघरातल्या गंमती-जमती, माझ्या ऑफिसमधले लोकलच्या प्रवासातले किस्से, अशा नेहमीप्रमाणे गप्पा झाल्या. तोपर्यंत मला पत्राबद्दल कल्पनाच नव्हती. छोटी झोपल्यावर त्यांनी मला पत्र दिले. मला म्हणाले तुझं खाजगी पत्र आहे. फोडलं नाही. गेस हू ? तेव्हा पासून आमच्या घरात संशय पिशाच्च वावरत आहे. ऑफिसमध्ये आनि घेी ह्यांचे फोन येतात. माझी पर्स माझ्या उपरोक्ष तपासतात. पै अन् पै चा हिशेब विचारतात.“मिताच्या डोळ्यात खळ्कन पाणी तरळलं. समजावणीच्या सुरात मी म्हणाले” अगं, खुळाबाई, ते पत्र मी होते. माझे अद्याक्षर पत्राच्या डाव्या कोपर्‍यात लिहिले आहे. “तेव्हढ्यात दारावरची बेल वाजली. मितूचे यजमान अॉफिसातून आले. चहा-पाणी

झाले. मला पत्राचा सारा घोळ

त्यांना समजावून सांगायचा होता. माझा स्नेह मितावर होता तो केवळ तिच्या निर्लोभी, सालस वागण्यामुळेच. तिच्या बाबतीत असं घडावं ? मी म्हणाले मितूच्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यास येणार होते. परंतू वेळेचं गणित जमलं नाही. मी एक भेटकार्ड घरात टाकून गेले होते. गेस हू ? त्याच दिवशी माझ्या मुलाला फोन लावायला सांगितला. त्याचा आवाज वयात आल्यामुळे फुटला आहे. हा कोण पुरुष ? असं कदाचित वाटलं असेल. असा उलगडा करत असतानाच हा माणूस चक्क उठून आतल्या खोलीत निघून गेला. त्याचा ज
ू अविर्भाव होता, पुढे कधीतरी, कुठेतरी सापडलेच की ? झाल्या गोष्टीवर पांघरुण घालायला मैत्रिणीला बोलवायची गरजच काय ?

संशयाचं भूत मनातून काढून टाकणे फार कठीण ! सतत संशयास्पद वृत्ती माणूस स्वत:चा आनंद गमावतो दुसर्‍यांच्या बारीक सारीक गोष्टींवर लक्ष ठेवताना स्वत:ला विसरतो. लाख मोलाचा वेळ वाया घालवतो. हे मनुष्याचे विकृत रुपच नाही का ? असा विचार मनात आला. मी अस्वस्थ झाले. माझ्यामुळे मितुवर विचित्र प्रसंग ओढवला होता.

एकदा गप्पांच्या ओघात माझ्या यजमानांस घडलेली हकिगत सांगितली. यजमान म्हणाले “प्रत्येक क्रियेस प्रतिक्रिया असतेच, तू निश्चिंत अस.” त्यांनी लगेच हार्ट – अॅरोचे भेटकार्ड तयार केले. खाली फक्त ओठांचे चित्र काढले. मितूच्या यजमानांस पाठवून दिले. चार-पाच दिवसांनी फोन केला, “मिस्टर जितू का ? माझं पत्र मिळालं का ? खास आणि फक्त तुझ्यासाठीच लिहिलेले बरका ! परत मी फोन करीनच पण आता हे यायची वेळ झालीय. बाय गुड बाय. सी यु डार्लिंग !” ह्यांचा हूबेहूब बायकी ढंगातला लाडीक आवाज ऐकून मी आवाक झाले होते. हे म्हणाले. “कॉलेजमध्ये असताना खूप जणांची फिरकी घेतली होती. प्रत्येक वेळी वेगळ्या मुलीचा आवाज…… पण आत्ता मजा आली. जितू खूपच घाबरून गेला होता. परत फोन करु नकोस असं विनवून सांगत होता. आता अधून मधून माझा एक कॉल ह्या पठ्ठ्यासाठी !”

एकदा मितूने फोन घेतला आणि तुमचा कॉल म्हणून जितूला दिला. मितूला सगळी कल्पना दिली होती. जितू मात्र नवीन गर्लफ्रेंड बद्दल चक्रावून गेला होता आणि नवीन फ्रेंड विचारत होती, “डार्लिंग, गेस हू ?”

— स्वाती ओलतीकर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..