नवीन लेखन...

अशी आई नको गं बाई !

एका हायवेवरील मॉलच्या समोरील बसस्टॉपच्या मागे ( लाज वाटते म्ह्णून नाही तर सार्वजनिक ठिकाण आहे म्ह्णुन असेल कदाचित आणि एका बिझनेस पार्कच्या खाली असणार्‍या पानाच्या टपरीसमोर बर्‍यापैकी अधुनिक पोषाख परिधान केलेल्या सुंदर दुखण्या तरूणी ऐटीत सिगारेट ओढताना पाहिले की भल्या भल्या पुरुषांची बोटे तोंडात गेल्याखेरीज राहात नाहीत. आंम्ही तर कधी विजलेला सिगारेटही बोटात पकडला नाही पण सिगारेट ओढून झाल्यावर आपल्या उंच टाचेच्या सॅन्डल खाली सिगारेट विजविण्याची कला पाहिल्यावर तर मी स्वतः ही आवाक होतो. एक तरूणी सिगारेट ओढतेय आणि एखादा तरूण लायटरने तिचे सिगारेट पेटवतोय हे चित्रपटात शोभणार दृष्यही हल्ली उगडया डोळ्यांनी पाहताना डोळे अक्षरशः तृप्त होतात खेदाने. आपल्या देशात कॅन्सर रुग्णांच प्रमाण वाढत असतानाही सिगारेट ओढणार्‍या अधुनिक तरुणी पाहिल्या की मनात असंख्य प्रश्न निर्माण होतात. चारचौघात आपल्या वडिलधार्‍यांसमोर सिगारेट ओढताना काही पुरुषांनाही संकोच वाटतो तिथे आजच्या तरुणी चार सिगारेट न         ओढणार्‍या परुषांच्या मधे उभ राहून ऐटीत सिगारेट ओढताना हल्ली सर्रास दिसतात. भर रस्त्यात आरामात सिगारेट ओढणार्‍या हया तरूणी काही कोणी अशिक्षित तरूणी नसतात त्या असंस्कृत असतील असे ही खात्रीने सांगता येणार नाही. पण बहुदा हया तरुणी नोकरीनिमित्त आपल्या कुटुंबापासून दूर राहणार्‍या असतात. मानसिक ताण कमी करण्यासाठी त्या सिगारेट ओढत असाव्यात हे पटण्याजोगे नाही. फक्त एकच प्रश्न पडतो आपल्या देशाचं भविष्य ज्या पिढीच्या हातात आहे त्या पिढीला घडविणारी जन्माला घालणारी स्त्रियांची पिढी या पिढीच्या हातात खरंच आपल्या देशाचं भविष्य सुरक्षित आहे का ?

सिगारेट ओढण्याचे दुषपरिणाम माहित झाल्यावर आपली आई सिगारेट ओढणारी असावी असे कोणत्याही बाळाला वाटणार नाही. तो तर गर्भात असतानाच म्ह्णेल कदाचित अशी आई नको गं बाई ! आमच्या लहानपणी आमच्यावर झोपडपट्टीत राहात असतानाही सिगारेट ओढणे ही वाईट गोष्ट आहे हे आमच्या अशिक्षित आईने आंम्हाला समजावले होते. तिच्या हातात जोपर्यंत होते तिने आमच्यावर कोणत्याही व्यसनाच्या आहारी न जाण्याचेच संस्कार केले होते. पण आजची आईच जर व्यसनाधीन असेल तर ती आपल्या मुलांवर काय खाक संस्कार    करणार ? पूर्वीच्या स्त्रियांची पुरूषांच्या बरोबरीने कोणतीच व्यसन करण्याची हिंमतच नव्हती. आज स्त्री – पुरुष समानतेमुळे स्त्रियां पुरुषांच्या बरोबरीने व्यसनही करू लागल्या आहेत. पुरूषांच्या व्यसनाधीनतेचा परिणाम फक्त कुटुंबावर होतो पण स्त्रियांच्या व्यसनाधिनतेचा परिणाम देशाच्या भविष्यावर होतो. अधुनिकता फक्त  स्त्रियांच्या अधिकारा पुरती मर्यादित होती तोपर्यंत सारे ठिक होते पण आता स्त्रियांना इतर व्यसनांबरोबर सर्वच बाबतीत पुरुषांची बरोबरी करण्याच एक नवीन व्यसन जडू लागलं आहे जे फारच भयंकर आहे याचे फार भयंकर परिणाम आपल्या देशाला भविष्यात भोगावे लागणार आहेत. आजच्या तरूणी उच्चशिक्षित आहेत, पुरुषांच्या तोडीच्या आहेत, सारं जग त्यांनी पादाक्रांतही केलेले आहे, पण आता त्या एक चांगली आई होण्याची क्षमता कदाचित गमावून बसल्यात की काय अशी शंका मनात निर्माण होऊ लागली आहे… स्त्रियांनी पुरुषांची बरोबरी करण्यात काहीच वावगे नाही पण व्यसनांच्या बाबतीत स्त्रायांनी पुरूषांची बरोबरी करण्याचा मोह टाळायला हवा. फक्त सिगारेट ओढल्यामुळे स्त्रिया असंस्कृत असभ्य अथवा व्यभिचारी ठरत नाही पण जी गोष्ट चुकीच आहे ती गोष्ट स्त्रियां करता आहेत म्ह्णून त्याचे समर्थन नाही ना करता येणार. आजच्या अधुनिक स्त्रियांनीही शक्यतो सिगारेटच्याच नव्हे सर्व प्रकारच्या व्यसनांपासून शक्यतो दूरच राहायला हवे. पुरुष कितीही अधुनिक असला तरी त्याला व्यसनी मैत्रिण अथवा प्रेयसी आवडतही असेल पण व्यसनी पत्नी मात्र शक्यतो त्याला नकोच असते हे सत्य बदलणार नाही. व्यसनाने मानसिक ताण कमी होण्याऐवजी हल्ली तो अधिक वाढून काही लोक आत्महत्या करण्यापर्यंतच्या निर्णयापर्यंत पोहचताना दिसत आहेत. आपल्या देशाच्या भविष्याचा विचार करता आपल्या देशाला व्यसनी आईची नाही तर निर्व्यसनी आईची जास्त गरज आहे ती गरज आजच्या प्रत्येक तरुणीने ओळखून व्यसनाधिन तरूणींनी आत्मपरिक्षण करायला हवे नाही का ?

लेखक – निलेश बामणे

202, ओमकार, जलधारा एस.आर.ए. गृहनिर्माण संस्था मर्यादित, गणेश मंदिरा समोर,     श्रीकृष्ण नगर, संतोष नगर, गोरेगांव ( पूर्व ), मुंबई – 400 065. मो. 8652065375

Avatar
About निलेश बामणे 416 Articles
Poet & Writer Editor - Marathi magzine Sahitya Upekshitanche
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..