सलाम विजय भटकरांना!

‘परम महासंगण’चे जनक म्हणून अवघ्या जगाला परिचित असलेल्या विजय भटकरांनी आयुर्वेदात विषद केलेले गो-पीयूषाचे महत्त्व समजून घेऊन त्यावर संशोधन केले आणि या जुन्या प्रभावी औषधाला नव्या स्वरूपात सादर करीत ‘इम्यूरिच’नामक कॅप्सूल तयार केली. स्वाईन फ्लूवर ही अतिशय प्रभावी आणि कुठलेही ‘साईड इफेक्ट’ नसलेली कॅप्सूल आहे.

भारतात उठलेले किंवा उठवल्या गेलेले स्वाईन फ्लू नावाचे वादळ आता शांत होत आहे. ते वादळ शांत होणारच होते, कारण मुळात ते वादळच नव्हते, तर तसा आभास उभा करण्यात आला होता. भारतात या वादळाचा केंद्रबिंदू महाराष्ट्रातील पुणे हे शहर होते. अमेरिकेत सिलिकॉन व्हॅलिला जे महत्त्व आहे तसेच भारतात पुण्याला प्राप्त होऊ लागलले आहे. तसेही पुणे आधीपासूनच शिक्षणाचे माहेरघर म्हणूनच ओळखले जात होते, त्यात आता आधुनिक शिक्षणाची आणि व्यवसायाची भर पडल्याने पुण्याचा मान-सन्मान, महत्त्व खूप वाढले आहे. भारतातील ‘आयटी’ उद्योगाची राजधानी म्हणून पुणे ओळखले जाते. अशा या पुण्यातच स्वाईन फ्लूने गोंधळ घालावा हा अपघात की घडवून आणलेला योगायोग, हा स्वतंत्र चिंतनाचा विषय ठरू शकतो; पण एक गोष्ट मात्र नक्की की या स्वाईन फ्लूला पुण्यातील लोकांनी मोठ्या धिराने तोंड दिले. घबराट जी दिसत होती ती पुण्यात बाहेरून आलेल्या लोकांमध्येच अधिक होती. गेले तीन-चार दिवस मी पुण्यात आहे. इथे आल्यावर जे चित्र दिसले ते तसे अपेक्षितच होते. पुण्यातून बाहेर जाणाऱ्या गाड्यांना चिक्कार गर्दी, सगळ्यांनी नाका-तोंडावर मास्क बांधलेला आणि पुणेकर मात्र ‘जिना यहाँ मरना यहाँ’च्या धुंदीत मस्त! मी पुण्याला ज्या विमानातून आलो त्या विमानातही एक-दोन मास्कधारी होतेच. या मास्कधारकांची पुण्यातील गर्दी पाहिल्यावर मला उगाचच आपण जैन धर्मीयांच्या एका मोठ्या मेळाव्यात तर सामील झालो नाही ना, अशी शंका यायल
लागली. जैन धर्मातील मुनी

लोक तोंडावर कायम असे मास्कसदृश

आवरण बांधत असतात. अर्थात त्यांचा उद्देश वेगळा असतो. हवेत असंख्य सूक्ष्मजीव असतात. आपण श्वास घेतो तेव्हा ते आपल्या शरीरात शिरतात आणि नाहक मारले जातात. ही हिंसा टाळण्यासाठी जैन मुनी नाका-तोंडावर मास्क बांधतात. अर्थात त्यामागे हवेतील अपायकारक विषाणू शरीरात शिरू नये, हा शुद्ध स्वच्छतेचा मंत्रही असू शकतो. पुण्यातील मास्कधारकांच्या गर्दीने जैन धर्मीयांच्या एका चांगल्या प्रथेचे समर्थनच केले असे म्हणावे लागेल. पुण्यात आल्यावर पुण्यातील सामान्य जनजीवन पाहून बरे वाटले. पुण्यात प्रत्यक्ष आलो नसतो तर प्रसारमाध्यमातील बातम्या पाहून आणि ऐकून पुणे म्हणजे साथ रोगाला बळी पडलेले एक शहर, असेच चित्र मनात राहिले असते. हा साथ रोग वाऱ्याच्या वेगाने फोफावत आहे, लोक उंदरांसारखी पटापट मरून पडत आहेत, अख्खे पुणे रिकामे होत आहे, अगदी याच स्वरूपाचे चित्र प्रसारमाध्यमांनी पुण्याच्या बाबतीत उभे केले होते. ते साफ खोटे असल्याचे दिसून आले. पुण्यातील जनजीवन अजिबात विस्कळित झालेले नव्हते. कुठेही दहशत नव्हती, गोंधळ नव्हता. स्वाईन फ्लूचा संसर्ग झालेले अनेक लोक कुठलाही उपचार न घेता ठणठणीत बरे झाल्याचीही अनेक उदाहरणे पुण्यात पाहायला मिळाली. अनेक केसेसमध्ये कुठलाही उपचार न घेता बरा होऊ शकणारा हा रोग जीवघेणा कसा ठरतो, त्याची इतकी दहशत कशी निर्माण होऊ शकते, हे एक म्हटले तर कोडे आहे आणि म्हटले तर नफेखोर औषध कंपन्यांच्या लुटमारीची साधी कहाणी आहे. जागतिक आरोग्य संघटनेने स्वाईन फ्लूचा जगभर प्रसार होऊन तो नियंत्रणाबाहेर गेल्याचे सांगितले. प्रसारमाध्यमांमध्ये अशाप्रकारच्या साथ रोगामध्ये भूतकाळात किती लाख किंवा कोटी लोक एकाचवेळी मारले गेले, हे सांगण्याची जणू काही स्पर्धा लागली. ही सगळी वातावरणनिर्मिती व्यवस्
ित पार पाडल्यानंतर या रोगावर ‘टॅमी फ्लू’ हे एक परिणामकारक औषध असल्याचे सांगण्यात आले. ‘टॅमी फ्लू’च्या कॅप्सूल तयार करणारी कंपनी अमेरिकेची आहे. त्यामुळे या गोळ्या विकत घ्यायच्या तर भारत सरकारला डॉलर मोजणे भाग होते. ‘टॅमी फ्लू’ची एक कॅप्सूल दहा डॉलरला म्हणजेच जवळपास साडेचारशे रुपयाला पडते. या कॅप्सूलचा डोस दहाच्या पटीत आहे. म्हणजे किमान दहा कॅप्सूल रुग्णाला द्याव्याच लागतात. हा खर्च साडेचार हजाराच्या घरात जातो. भारतात स्वाईन फ्लूची लागण झालेल्या किंवा तसा संशय असलेल्या रुग्णांची संख्या आणि भारत सरकारने अमेरिकेतून मागविलेल्या या ‘टॅमी फ्लू’ कॅप्सूलची संख्या यांचे प्रमाण अतिशय विषम आहे. किमान वीस लाख रुग्णांना पुरेसा ठरेल एवढा साठा भारताने या ‘टॅमी फ्लू’चाकरून ठेवला आहे, तेवढ्या कॅप्सूल अमेरिकेतून मागविल्या आहेत. स्वाईन फ्लूचा भर आता ओसरत आहे आणि आजमितीला संपूर्ण देशात या रोगाने बळी पडलेल्यांची अधिकृत आकडेवारी 38 आहे. अगदी खूपच कहर झाला तर ही संख्या दुपटीवर जाईल. या रोगाची लागण झाल्याचा संशय असलेल्यांची संख्याही दिवसेंदिवस कमी होत आहे. काही दिवसांनी हा रोग पूर्णत: हद्दपार झालेला असेल आणि कोट्यवधीचा ‘टॅमी फ्लू’चा माल ‘एक्सापयरी डेट’ पार करून कचऱ्याच्या ढिगात जमा होईल. या व्यवहारात जे कुणी गुंतले होते त्यांच्या घरावर मात्र दरम्यानच्या काळात सोन्याचे कवेलू चढलेले असतील. मुळात ‘टॅमी फ्लू’ने स्वाईन फ्लू बरा होतो की नाही, यावरच शंका व्यत्त* केली जात आहे. ज्या रोगात दहा पैकी आठ रुग्ण कुठलेही औषधोपचार न घेता बरे होत त्या रोगाच्या नावाखाली कोणत्याही औषधाचे मार्केटिंग अगदी सहज करता येईल. औषध गुणकारी असो वा नसो एेंशी टक्के पॉझिटिव्ह रिझल्ट ठरलेला आहे. या पृष्ठभूमीवर ‘टॅमी फ्लू’मध्ये कोणते औषध घटक आहेत, त्यांचे प्रमाण आणि त्यांची उपयुत्त*ता किती
हे, मानवी शरीरासाठी ते लाभदायक आहेत, या सगळ्यांचे सूक्ष्म विश्लेषण होणे गरजेचे ठरते. खरेतर अशा अनेक असल्या-नसल्या रोगांना प्रतिबंध घालण्यासाठी

परंपरागत भारतीय जीवनशैली आणि आहार अतिशय उपयुत्त* ठरतो, हे

मी आधीही सांगितलेले आहे, शिवाय आपल्या आयुर्वेदात अशा असंख्य रोगांवर आणि विकारांवर अतिशय गुणकारी ठरू शकणाऱ्या औषधांचे विश्लेषण करण्यात आले आहे. चरकसंहिता, सुश्रुताचे ठांथ, अष्टांगहृदय, भावप्रकाश आदी ग्रंथांमध्ये अशा औषधांची भरपूर चर्चा केलेली आहे. परंतु आपल्याला सगळे काही ‘इंस्टंट’ हवे असते, ‘पी हळद आणि हो गोरी’ असा सगळा प्रकार आपल्याकडे बोकाळलेला आहे. त्याचाच फायदा या विदेशी कंपन्या उचलत असतात. मुळात स्वाईन फ्लू हा रोग आहे की नाही आणि असलाच तर त्यावर ‘टॅमी फ्लू’ हे औषध रामबाण आहे की नाही, हेच अजून सिद्ध झालेले नाही; परंतु अनेक देशांमध्ये या टॅमी फ्लू’च्या घातक ‘साइड इफेक्ट्स’बद्दल ओरड सुरू झाली आहे. अॅलोपॅथीच्या अनेक औषधांबद्दल ही तक्रार नेहमीच असते. आयुर्वेद मात्र शरीराला पोषक आणि रोगाच्या कारणांचा समूळ नाश करणाऱ्या चिकित्सेबद्दल बोलत असतो. ‘परम महासंगण’चे जनक म्हणून अवघ्या जगाला परिचित असलेल्या विजय भटकरांनी आयुर्वेदात विषद केलेले गो-पीयूषाचे महत्त्व समजून घेऊन त्यावर संशोधन केले आणि या जुन्या प्रभावी औषधाला नव्या स्वरूपात सादर करीत ‘इम्यूरिच’नामक कॅप्सूल तयार केली. स्वाईन फ्लूवर ही अतिशय प्रभावी आणि कुठलेही ‘साइड इफेक्ट’ नसलेली कॅप्सूल आहे. विजय भटकरांच्या या संशोधनाचा कुठेच गवगवा झाला नाही. कारण स्पष्ट आहे, भटकरांनी तयार केलेल्या ‘इम्यूरिच’च्या धंद्यात दलालीला वाव नाही, हात पिवळे करून घेण्याची संधी नाही आणि विशेष म्हणजे हे औषध संपूर्णपणे देशी बनावटीचे आहे. जे देशी आहे ते टाकाऊच असते, अमेरिकेतून, युरोपातून आलेले तेवढे दर्जेदा
या गुलाम मानसिकतेचा भयंकर पगडा आपल्यावर असल्यामुळे भटकरांच्या संशोधनाला प्रसिद्धी देण्याची गरज कुणाला वाटली नसेल. शिवाय भटकरांचे हे उपयुत्त* औषध बाजारात आले तर ‘टॅमी फ्लू’, ‘मास्क’ वगैरेंचा धंदा होईल कसा, याचीही काळजी सरकारला, प्रसारमाध्यमांना वाहावी लागतेच की नाही? विजय भटकर नावाच्या संगणक तज्ज्ञाला जे ज्ञान उपयुत्त* वाटते ते ज्ञान आपले असूनही आपल्याला त्याचे कौतुक नसावे, ही अत्यंत खेदाची बाब आहे. वास्तविक संगणक तज्ज्ञ म्हटला की तो आधुनिक विज्ञानाचा विद्यार्थी समजला जातो. विविध वनस्पतींचे काढे, रस, घुटी, लेप वगैरे शब्दांशी त्याने नेहमीच फटकून वागायला हवे, हे सगळे त्याच्यासाठी पालापाचोळा असते; परंतु भटकर त्याला अपवाद ठरले. आपल्या पुरातन ठांथात किती मौलिक ठेवा दडला आहे याची त्यांना जाण होती आणि म्हणूनच त्या जुन्या सोन्यावर नवा मुलामा देत त्यांनी परंपरागत ज्ञान हे आधुनिक विज्ञानाच्या कसोटीवरही श्रेष्ठच ठरत असल्याचे दाखवून दिले. त्यांच्या संशोधनाने पाश्चिमात्य देशांच्या लुटीला पायबंद घालण्याच्या प्रयत्नांना चालना मिळेल, प्रोत्साहन मिळेल. या संशोधनासाठी त्यांना जगातील इतर कुठल्याही पुरस्कारापेक्षा मोठा पुरस्कार देऊन गौरविल्या गेले पाहिजे आणि ही जबाबदारी भारत सरकारची आहे. विजय भटकर नावाच्या खऱ्या अर्थाने ज्ञानतपस्वीला, महाऋषीला सलाम!

— प्रकाश पोहरे

Avatar
About प्रकाश पोहरे 436 Articles
श्री. प्रकाश पोहरे हे विदर्भातील “देशोन्नती” या लोकप्रिय दैनिकाचे मालक तसेच मुख्य संपादक आहेत. त्यांचे “प्रहार” या सदराअंतर्गत संपादकीय लेख फार लोकप्रिय आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..