नवीन लेखन...

सोनोग्राफी (स्त्री रोग व प्रसूतिशास्त्र)

या तपासामध्ये अल्ट्रासाऊंड (ध्वनीलहरी) यांचा वापर मुख्यत्वे पोटातील व स्त्रियांच्या गर्भाशय व गर्भामध्ये होणार्‍या रोगामध्ये होतो व ध्वनिलहरी, क्ष किरणांपेक्षा खूपच सौम्य असल्याने यांचा त्रास गर्भाला अजिबात होत नाही. म्हणूनच गर्भाची वाढ, गर्भाचे रोग, गर्भधारणा यांचा पूर्ण अभ्यास कितीही वेळा करता येऊ शकतो.

अल्ट्रासोनोग्राफी स्त्री रोगतज्ज्ञांना एक मोठे वरदान ठरले आहे. जवळजवळ सर्वं स्त्री रोग तज्ञांकडे हे मशीन उपलब्ध झाले आहे. याचा जास्तीत जास्त उपयोग पहिल्या तीन महिन्यांत गर्भधारणेचा अभ्यास, गर्भपाताबद्दल माहिती व चुकीच्या ठिकाणी होणारी गर्भधारणा याकरिता केला जातो पुढील तीन महिन्यांत गर्भधारणेत होणार्‍या गर्भाच्या व्यंगा बद्दल पुन्हा एकदा सोनोग्राफी केली जाते. शेवटच्या तीन महिन्यांत गर्भाची अवस्था, त्याचे वजन, वाढ व गर्भजल व प्लॅसेंटा (वार) यांची माहिती मिळवून बाळंतपण सुखरुप होईल का, हे तपासले जाते.

स्त्रियांमधील वांझ्यत्व (इनफर्टिलिटी) मध्ये त्यांच्या गर्भाशयाचा व नलिकांचा अभ्यास – व्यतिरिक्त बिजांडामधील बिजांची वाढ व बीजधारणा (ओव्हयुलेशन स्टडी) यांचा अभ्यास केला जातो. यामध्ये स्पेशल प्रोब (टी.व्ही.) हा योनी मार्गात घातला जातो. यामुळे बिजे स्वच्छ व स्पष्ट दिसतात.

स्त्रियांनी सोनोग्राफी करायला जाण्याअगोदर चार-पाच ग्लास पाणी पिऊन लघवी न करता क्लिनिकमध्ये जावे; कारण मूत्राशय (ब्लॅडर) भरलेले असेल तर गर्भाचा अभ्यास करणे सोपे जाते. या तपासासाठी उपाशीपोटी जाण्याची गरज नसते.

स्त्रियांमध्ये गर्भाशयाला होणारे विविध रोग व बिजांडांना होणारे विविध रोग यांचा तपास सोनोग्राफी करते.

सोनोग्राफी करुन गर्भाला होणारे व्यंग हे बायॉपसीमुळे लवकरात लवकर समजू शकते. ही बायॉपसी पहिल्या त
न महिन्यांतच करावी लागते. यामध्ये वारामधील (फ्लासेंटा) पेशींचा तपास केला जातो. गर्भव्यंग सिद्ध झाल्यास गर्भपात केला जातो.

गर्भाची लिंग चाचणी परीक्षा कायद्याने गुन्हा असल्याने आपण आपल्या डॉक्टरांना हे प्रश्न विचारु नयेत व त्रास देऊ नये. बाळाची वाढ व प्रसूती कशी सुखरुप होईल याकडे लक्ष केंद्रित करावे.

— डॉ. श्रीकांत कमलाकांत राजे

डॉ. श्रीकांत राजे
About डॉ. श्रीकांत राजे 21 Articles
ठाणे येथील सुप्रसिद्ध रेडिओलॉजिस्ट. एक्स-रे आणि सिटी स्कॅन या विषयांतील तज्ज्ञ. मेडिव्हिजन या डायग्नॉस्टिक्स सेंटरचे संचालक. “मेडिकल इमेजिंग” या क्ष किरण व मॉडर्न इमेजिंग विषयांवरील पहिल्या मराठी पुस्तकाचे लेखक. सर्वसाधारण माणसाला या विषयावरील महत्वाची माहिती थोडक्यात मिळण्यासाठी या पुस्तकाचा मोठा उपयोग झाला.

1 Comment on सोनोग्राफी (स्त्री रोग व प्रसूतिशास्त्र)

Leave a Reply to Balaji shinde Cancel reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..