राग मारवा

मारवा राग हा मारवा थाटातून तयार झाला असून हा मारवा थाटाचा आश्रयराग आहे. पंचम स्वर वर्ज असल्याने हा षाडव जातीचा समजतात. याचे रिषभ कोमल, मध्यम तीव्र आणि गंधार, निषाद, हे स्वर शुद्ध आहेत. आरोहाला सुरुवात मंद्र निषादापासून करतात. यात वादी संवादी रिषभ धैवत आहे. वादी संवादी एकमेकांचे मध्यम पंचम असतात, ह्या नियमाला हा राग अपवाद आहे. याचा गानसमय दिवसाचा शेवटचा प्रहर मानतात. याचे चलन म्हणजे रागविस्तार-तिन्ही सप्तकात होत असले तरी याची प्रकृती फारशी गंभीर नाही. कुणी कुणी आरोहात निषाद वक्र करतात. जलदीने ताना घेतेवेळी तो तसा येत नसला तरी सावकाश स्वरविस्तार करताना मध्य सप्तकातील निषादावरून जोरकसपणे धैवत घेण्यातच या रागाचे वैशिष्टय आहे. रि हा स्वर वादी असल्याने त्याला बरेच महत्व देतात. म्हणजे याच रागासारखा असलेल्या पूरिया रागाहून हा सहजच निराळा दिसतो. मावळत्या दिनकरा हे मा.भा.रा.तांबे यांचे गाणे राग मारवातील आहे. या गाण्यात मारवा बरोबर इतर ही जवळचे राग आहेत. तसेच स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तु मला हे मा.शंकर वैद्य यांचे गाणे हे ही मारवा रागातील आहे. या राग बाबत अधिक माहिती समूहातील तज्ञ व्यक्तींनी द्यावी.

संजीव वेलणकर पुणे
९४२२३०७३३
संदर्भ.इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 2285 Articles
श्री संजीव वेलणकर हे पुणे येथील कॅटरिंग व्यावसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती या विषयांवर ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…