नवीन लेखन...

मॅमोग्राफी

स्तनामधे येणारी गाठ हाताला लागेपर्यंत, परिस्थिती हाताबाहेर गेलेली असते ! म्हणजेच ती गाठ जर का कॅन्सरची असेल तर कदाचित ऑपरेशन करुनसुद्धा रुग्णाला काहीही फायदा होणार नाही. कारण ती पसरली जाते आणि म्हणूनच स्तनाचा कॅन्सर हाताला लागेपर्यंत थांबून रहाणे योग्य नव्हे. ३५ वर्षे वयानंतर प्रत्येक स्त्रीने मॅमोग्राफी हा तपास दरवर्षी करणे गरजेचे आहे. ह्या तपासात छोट्यात छोट्या कॅन्सरचे निदान होते.

मॅमोग्राफीमध्ये दोन्ही स्तनांचा दोन अॅंगल्समध्ये फोटो घेतला जातो. हा अतिशय स्पष्ट व अतिसूक्ष्म एक्स-रे च असतो व या मशिनची ट्यूब स्पेशल असल्याने क्ष-किरणांची मारक शक्ती कमीत कमी केलेली असते. त्यामुळे दरवर्षी मॅमोग्राफी केली तरीही काहीही धोका नाही.

या तपासात १ सें.मी. पेक्षाही छोटी गाठ त्या गाठीतील मुख्यत्वे कॅल्शिअम डिपॉझिशन पॅटर्नप्रमाणे पकडली जाते किंवा एखादी संशयास्पद गाठ जर पुढील वर्षे परत केलेल्या मॅमोग्राफीवर थोडी बदललेली दिसली तरीही सावधानता बाळगता येते व त्या गाठीची त्वरीत स्टिरीओटॅक्सी बायॉप्सी करुन ऑपरेशनने काढून टाकून ती नक्की कसली आहे हे समजते.

याचा मुख्य फायदा म्हणजे जर कॅन्सर असेल तर तो सुरुवातीच्या टप्प्यात लक्षात येतो. कॅन्सर नसला तर चांगलेच. दुसरा फायदा हा की कॅन्सर वाढला तर संपूर्ण ब्रेस्ट (स्तन) काढून टाकण्याची वेळ येते. ती वेळ लवकर निदान झाल्यावर येत नाही. लहान स्त्रियांमधील स्तन घनदाट दिसतात म्हणून त्यांच्या स्तनांमधील अधिक माहितीसाठी मॅमोसोनोग्राफी देखील केली जाते तसेच ४० वर्षांनंतर जरी फॅट डिपॉझिशनने स्तन विरळ झाले असले तरीही काही मोठ्या गाठींची अधिक माहिती मिळवण्याकरता मॅमोसोनोग्राफी केली जाते. मॅमोग्राफीला साधारण एक हजार रुपये तर स्टिरीओ टॅक्सी बायॉप्सीला दीड हजार रुपये खर्च येतो.

— डॉ. श्रीकांत कमलाकांत राजे

डॉ. श्रीकांत राजे
About डॉ. श्रीकांत राजे 21 Articles
ठाणे येथील सुप्रसिद्ध रेडिओलॉजिस्ट. एक्स-रे आणि सिटी स्कॅन या विषयांतील तज्ज्ञ. मेडिव्हिजन या डायग्नॉस्टिक्स सेंटरचे संचालक. “मेडिकल इमेजिंग” या क्ष किरण व मॉडर्न इमेजिंग विषयांवरील पहिल्या मराठी पुस्तकाचे लेखक. सर्वसाधारण माणसाला या विषयावरील महत्वाची माहिती थोडक्यात मिळण्यासाठी या पुस्तकाचा मोठा उपयोग झाला.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..