नवीन लेखन...

‘रोमन हॉलिडे’ प्रसिद्ध हॉलीवूड अभिनेत्री ऑड्रे हेपबर्न

ऑड्रे हेपबर्न चे खरे नाव ऑड्रे रस्टन. ऑड्रे हेपबर्न ही मूळची ब्रसेल्सची. ऑड्रे रस्टनने पुढे आपल्या नावातले रस्टन काढून हेपबर्न केले. त्यांचा जन्म ४ में १९२९ रोजी झाला.  तिच्या लहानपणी वडिलांची नोकरी फिरतीची असल्यामुळे तिचे वास्तव्य बेल्जियमखेरीज इंग्लंड आणि हॉलंडमध्येही झाले. त्यामुळे ती डच, फ्रेंच, इंग्लिश, जर्मन आणि स्पॅनिश सफाईदारपणे बोलत असे. ब्रसेल्समध्ये प्रथम बॅले नृत्याचे शिक्षण घेतल्यावर ती लंडनच्या वेस्ट एंड या संगीत नाटक कंपनीत कोरस गायिका आणि छोटय़ामोठय़ा भूमिका करू लागली. पुढे ब्रॉडवेवर समावेश झाल्यावर तिची ओळख युरोप- अमेरिकेत एक होतकरू कलाकार म्हणून झाली. १९५१ साली ब्रॉडवेच्या ‘जिगी’ या नाटकात ऑड्रेने केलेल्या भूमिकेने तिला एक अभिनेत्री म्हणून उंचीवर नेऊन ठेवले.

हॉलीवूडची एक आघाडीची चित्रतारका म्हणून ऑड्रेचे नाव झाले ते १९५३ साली प्रकाशित झालेल्या ‘रोमन हॉलिडे’ या चित्रपटाने. रोमन हॉलिडेमध्ये तिने राजवाडय़ाच्या बंदिस्त आयुष्याला कंटाळून बाहेरचे मुक्त जग अनुभवण्यासाठी पळून शहरात गेलेल्या एका राजकन्येची भूमिका साकारली. तिने साकारलेल्या अल्लड, अवखळ, निरागस राजकन्येने ऑड्रेला १९५४ सालचे उत्कृष्ट अभिनेत्रीचे अकॅडमी अॅजवॉर्ड म्हणजेच ऑस्कर अॅावॉर्ड मिळवून दिले. त्यानंतरच्या तिच्या साब्रीना (१९५४), द नन्स स्टोरी (१९५९), ब्रेकफास्ट अॅकट टिफनीज (१९६१), शराड (१९६३), माय फेअर लेडी (१९६४) तसेच वेट अन्टिल डार्क (१९६७) या चित्रपटांतील अभिनयाने लोकप्रियतेचे शिखर गाठले. या चित्रपटांपकी पाच चित्रपटांतील सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचे ऑस्कर पुरस्कार ऑड्रेला मिळाले आणि बाकी चित्रपटांसाठी तिला गोल्डन ग्लोब, सेसिल डिमेलो अॅिवॉर्ड, ग्रॅमी अॅकवॉर्ड, सिने अॅिक्टर्स गिल्डतर्फे जीवनगौरव हे पुरस्कार मिळाले.

१९८८ साली चित्रपट क्षेत्रातून निवृत्ती स्वीकारल्यावर ऑड्रेने तिच्या मृत्यूपर्यंत म्हणजे १९९३ पर्यंत युनिसेफसाठी इथिओपिया, सुदान, सोमालिया वगरे दुष्काळग्रस्त आणि गरीब देशांतील कुपोषित मुलांसाठी मदतकार्य केले. ऑड्री हेपबर्न यांचा अभिनय, त्यांचे सौंदर्य व त्यांची सामाजिक जाणीव या विषयी विनिता महाजनी यांनी ‘मृगनयनी मनस्विनी : ऑड्री हेपबर्न’ हे पुस्तक लिहिले आहे. ऑड्रे हेपबर्नचे २० जानेवारी १९९३ रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4228 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..