नवीन लेखन...

बॉलिवूड अभिनेते पंकज कपूर

१९८० ते १९९० मध्ये चित्रवाणीवर आलेल्या करमचंद आणि नंतर आलेल्या सार्वजनिक कार्यालयांमधील भ्रष्टाचारावर टिप्पणी करणारी जबान सँभाल के या विनोदी मालिकेद्वारे पंकज कपूर यांना घराघरांमधून लोकमान्यता मिळाली. बॉलिवूड अभिनेते पंकज कपूर यांचा जन्म २९ मे रोजी झाला. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून बाहेर पडल्यावर पुढची चार वर्षे कपूर यांनी नाटकांतून कामे केली, आणि त्याच सुमारास रिचर्ड एटनबरो यांच्या दिग्दर्शनाखाली गांधी या चित्रपटात एक भूमिका केली. या चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीसाठी त्यांनी महात्मा गांधीच्या भूमिकेला आवाज दिला होता. पंकज कपूर यांनी आजवर हिंदी नाट्य, दूरचित्रवाणी आणि चित्रपटांत अभिनय केला आहे. एक डॉक्टर की मौत (इ.स. १९९१) आणि २००३ मध्ये निघालेल्या विशाल भारद्वाज-दिग्दर्शित मकबूल ही त्यांची आजवरची सर्वांत प्रशंसनीय कामगिरी होती. या दोन्ही भूमिकांसाठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले आहेत. करमचंद जासूस १९८६ ची गाजलेली टीव्ही सिरियल जलवा, चालबाज, आताचा मासूम तसेच, मंडी, जाने भी दो यारो,गांधी, खामोश, हल्लाबोल राख यासारखे त्यांनी चित्रपट केले आहेत. पंकज कपूर यांनी आत्तापर्यंत ७४ हून अधिक नाटकांचे आणि मोहनदास बीए एलएलबी, वाह भाई वाह, साहेबजी बिबीजी गुलामजी’, दृष्टान्त, कनक डी बल्ली, अल्बर्ट ब्रिज आणि पांचवां सवार या चित्रवाणी मालिकांचे दिग्दर्शन केले आहे

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4238 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..