नवीन लेखन...

पेट्रोरसायनांची गरज केव्हापासून पडू लागली?

माणूस हा निसर्गाचे बालक आहे. त्यामुळे तो सर्वस्वी | निसर्गावर अवलंबून आहे. त्याला शेती करायला लागून जेमतेम ८-१० हजार वर्षे झाली आहेत. पण त्या आठ-दहा हजार वर्षापूर्वीपासून ते अगदी ५०-१०० वर्षापूर्वीपर्यंत शेतीतून मिळणारी धान्ये, कापूस, रबर, इंधनासाठी लाकूड या सगळ्या गोष्टी त्याला पुऱ्या पडत भारताची असत.

पण आता लोकसंख्या ११६ कोटी आहे आणि जगाची लोकसंख्या ६५० कोटी आहे. त्यामुळे नैसर्गिक संपत्ती पुरेनाशी झाली. निसर्गातून मिळणाऱ्या रबराची ताकद फार नसे आणि यांत्रिक युगात, मोटर गाडया, ट्रक्स आणि ट्रक्टर्सना लागणारे टायर दणकट असावेत अशी गरज निर्माण झाली.कापसापासून बनवलेले सुती कपडे अपुरे तर पडू लागलेच पण थंडीसाठी हवे असणारे पुरेसे संरक्षण ते देऊ शकत नाहीत अशा अनंत अडचणी निर्माण झाल्या. शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ अशा प्रकारच्या सामाजिक समस्यांवर नेहमीच काम करीत असतात.

त्यातून पेट्रोरसायनातुन पदार्थ तयार करणे सुरु झाले. आज यातून टेरीलीनचा धागा मिळतो आणि आपली कपडयांची गरज टेरीलीन आणि टेरीकॉटननी पुरी केले. ब्युटाडाईन रबर हे हे दणकट असते.त्यापासून टायर 7 बनवतात.इंडस्ट्रीयल अल्कोहोल्सपासून सुगंधी द्रव्ये बनू र लागली. औषधे, दारुगोळा, सौंदर्य प्रसाधने, डिटर्जंट्स इत्यादी अनेक. या उद्योगातून मिळणारा सर्वात महत्वाचा पदार्थ म्हणजे वेगवेगळी फ्लॅस्टिक्स. जसजसे धातू कमी पडू लागले तसतशी घरातली तांब्याची आणि पितळेची भांडी गेली आणि त्यांची जागा फ्लॅस्टिकच्या वस्तूंनी घेतली. आज घरात कोठेही डोकावले तर सगळीकडे फ्लॅस्टिकच फ्लॅस्टिक दिसते. हीच गोष्ट उद्योगधंद्यातही घडली. मोटारी, विमाने आदी वाहनातही हेच घडले.

आता फ्लॉस्टिक विघटनशील नाही म्हणून कितीही आरडाओरड केली तरी त्याला पर्याय उरला नाही. पण शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ गफ्प बसत नाहीत. फ्लॅस्टिक विघटनशील कसे बनेल यावर जगभर संशोधन चालू आहे आणि पुढील पाचेक वर्षात ते घडून येईलही.

अ.पां. देशपांडे, (मुंबई)
मराठी विज्ञान परिषद

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..