‘काम’ म्हणजे नेमकं काय?

भारतीय संस्कृतीत मानल्या गेलेल्या चार पुरुषार्थांपैकी एक. बहुतेकांसाठी इतर तिघांच्या तुलनेत थोडासा दुर्लक्षित तर काहींसाठी (विनाकारणच) वर्ज्य असलेला असा हा विषय. काम हा संस्कृत शब्द (म चा उच्चार पूर्ण केला तर मराठीतील आणि संस्कृतमधील या सामायिक शब्दाचा अर्थभेद नीट जपता येईल.) ऐकताच आपल्या डोक्यात जो शब्द त्यापाठोपाठ येतो तो म्हणजे ‘कामसूत्र’. यामागील कारण म्हणजे बहुतांशी काम या शब्दाकडे शारीरिक सुख इतक्याच मर्यादित अर्थाने पाहिले जाते. प्रत्यक्षात मात्र या शब्दाचा अर्थ त्याहून कित्येक पटीने अधिक व्यापक आहे.

आपल्याकडे ज्ञानेंद्रिये आणि कर्मेंद्रिये अशी इंद्रियांची विभागणी त्यांच्या- त्यांच्या कर्मांनुसार केलेली आढळते. डोळे, नाक, कान, जीभ आणि त्वचा यांना ज्ञानेंद्रिये तर हात, पाय, वाणी, जननेंद्रिय आणि गुद यांना कर्मेंद्रिये असे म्हणतात. या प्रत्येकाची काही नेमून दिलेली कर्म आहेत. उदाहरणार्थ; पाहणे हे डोळ्यांचे वा चालणे हे पायांचे कर्म आहे. यांनाच ‘इंद्रियार्थ’ अशीही संज्ञा आहे. आचार्य वात्स्यायन यांनी केलेल्या व्याख्येनुसार; इंद्रियांचा आपापल्या इंद्रियार्थांबरोबर होणारा संयोग म्हणजे ‘काम’. थोड्क्यात काय तर एखादे छानसे गाणे ऐकणे हादेखील काम आहे किंवा एखाद्या मनमोहक अत्तराचा सुगंध घेणे हाही कामच आहे.

वर नमूद केलेल्या उपस्थ वा जननेंद्रिय या कर्मेंद्रियाचा इंद्रियार्थ आहे हर्ष म्हणजेच आनंद. शारीरिक संबंधातून मिळणाऱ्या सुखाचा इथे विचार केलेला आहे. काम या पुरुषार्थाच्या वरील व्याख्येनुसार हे कर्मदेखील काम याच गटात मोडते. मात्र केवळ शारीरिक सुख म्हणजेच काम नसून अन्यही सर्वच क्रिया या गटात मोडतात हे सर्वप्रथम लक्षात ठेवायला हवे. किमान यापुढे तरी या शब्दबाबत ‘तसा’ शब्द असा दृष्टिकोन न ठेवता त्याचा हा अर्थ नीट समजावून घ्या आणि इतरांनाही आवर्जून सांगा. ‘कामशास्त्र’ जाणून घेण्याची ही पहिली पायरी आहे!!

© वैद्य परीक्षित शेवडे; MD (Ayu.)
आयुर्वेदज्ज्ञ- लेखक- व्याख्याते
।। श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद ।। डोंबिवली
संपर्क: ०२५१-२८६३८३५

25 December 2016

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..