नवीन लेखन...

लंडनमधील वेम्ब्ले स्टेडियम

वेम्ब्ले स्टेडियम हे लंडनमधील वेम्ब्ले पार्क येथे आहे. मुख्यतः फुटबॉल खेळासाठी या मैदानाचा उपयोग केला जातो. या स्टेडियम वरील पांढरी कमान ही शहराच्या बाहेरून सुद्धा दिसते. ही कमान सर्व युरोपात प्रसिद्ध अशी कमान आहे.

‘द फुटबॉल असोसिएशन’ यांच्या मालकीचे हे स्टेडियम असले तरी वेम्ब्ले नॅशनल स्टेडियम लि. यांच्यामार्फत या स्टेडियमचे सर्व व्यवहार पाहिले जातात. २००० साली बंद करण्यात आले. २००३ पर्यंत हे आहे त्याच अवस्थेत होतं; परंतु नंतर स्टेडियमचे नवीन बांधकाम सुरू झाले. २००६ मध्ये ते पूर्ण व्हायला हवे होते परंतु हे संपूर्ण बांधकाम ९ मार्च २००७ला पूर्ण झाल्यावर ते हस्तांतरीत करण्यात आले.

युरोप मधील हे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे मैदान असून त्याची आसन क्षमता ९०,००० आहे. जगातील सर्वात उंच आणि सर्वात मोठे मैदान म्हणूनही याचा नावलौकिक आहे. या मैदानातील संपूर्ण आसन व्यवस्थेवर छत घालण्यात आले आहे. हे जगातील सर्वांत महाग बांधकाम असलेले स्टेडियम आहे. ८०० दशलक्ष पौंडस् इतका खर्च या बांधकामाला आला आहे.

हे मैदान १८८० पासून म्हणजेच बांधकाम होण्यापूर्वीपासून फुटबॉलचे मैदान म्हणून ओळखले जाते. या नवीन बांधकामाचे आर्कीटेक्ट फोस्टर फ्लस पार्टनर्स प्लस पॉप्युलर हे होते तर इंजिनिअर म्हणून मोट मॅकडोनाल्ड यांनी काम पाहिले. ग्रूफफिल्ड मल्टीफ्लेक्स या ऑस्ट्रेलियन कंपनीने याचे बांधकाम केले. फुटबॉल असोसिएशन, द डिपार्टमेन्ट ऑफ मिडिया अॅन्ड स्पोर्टस आणि लंडन डेव्हलपमेन्ट एजन्सी यांचा हे स्टेडियम पूर्ण करण्यात सहभाग होता.

या स्टेडियमचा आकार हा बाऊलप्रमाणे असून याचे वरचे छत हे सरकते आहे. काहीवेळा अॅथलेटिक्ससाठी सुद्धा या मैदानाचा उपयोग केला जातो.

हे स्टेडियम वेम्ब्ली पार्क स्टेशन पर्यंत भूमिगत रेल्वेने जोडले गेले आहे. या मैदानाचे बांधकाम सुरू असताना ३,५०० कामगार त्यावर काम करीत होते. ५६.कि.मी. लांबीची हेवी ड्यूटी विजेची केबल येथे आणण्यात आली असून २,६१८ प्रसाधनगृहे येथे बांधण्यात आली आहेत. एक किलोमीटर परिसरात या स्टेडियमचे बांधकाम आहे. वेम्ब्ले नॅशनल स्टेडियम लि. यांच्यामार्फत या स्टेडियमचे सर्व व्यवहार पाहिले जातात. इंग्लंड नॅशनल फुटबॉल टीम यांचे हे होम ग्राउंड आहे.

फुटबॉलच्या सामन्यांप्रमाणेच या मैदानावर इतरही खेळांचे सामने आणि मोठे संगीत महोत्सव होतात. ‘लंडन- ड्रीम्स या बॉलीवूडच्या चित्रपटाचे हे मुख्य चित्रिकरणाचे केंद्र होते. २०११ यु.ई.एफ.ए. चॅम्पियन लीग फाईनलच्या सामन्यांसाठी हे मैदान वापरण्यात येणार आहे. वेम्ब्ले स्टेडियम हे पूर्वी ब्रिटिश एम्पायर एक्झिब्यूशन स्टेडियम किंवा एम्पायर स्टेडियम या नावाने ओळखले जात असे. जगातील अनेक मोठ्या फुटबॉलच्या स्टेडियमपैकी हे एक महत्त्वाचे मोठे स्टेडियम आहे. इंग्लंडचे राष्ट्रीय फुटबॉल स्टेडियम असल्यामुळे तसेच भौगोलिक दृष्ट्या खेळांसाठी स्वाभाविक मैदान असल्यामुळे ते फुटबॉलचे होम ग्राउंड म्हणून ओळखले जाते.

या मैदानावर युरोपियन कप म्हणजे यु.ई.एफ.ए. चॅम्पियन्स लीगच्या स्पर्धा घेतल्या जातात. ज्या १७ स्टेडियमवर एफ.आय.एफ.ए. वर्ल्ड कपच्या मॅचेस घेतल्या जातात, त्यापैकी वेम्ब्ले स्टेडियम हे एक मैदान आहे. याचे पूर्वीचे बांधकाम असलेल्या इमारती आणि स्टेडियम हे २००० साली बंद करण्यात आले.

जगातील सर्वात उंच आणि सर्वात मोठे मैदान म्हणूनही याचा नावलौकिक आहे. या मैदानातील संपूर्ण आसन व्यवस्थेवर छत घालण्यात आले आहे. हे जगातील सर्वांत महाग बांधकाम असलेले स्टेडियम आहे. ८०० दशलक्ष पौंडस् इतका खर्च या बांधकामाला आला आहे. हे मैदान १८८० पासून म्हणजेच बांधकाम होण्यापूर्वीपासून फुटबॉलचे मैदान म्हणून ओळखले जाते. या नवीन बांधकामाचे आर्कीटेक्ट फोस्टर फ्लस पार्टनर्स प्लस पॉप्युलर हे होते तर इंजिनिअर म्हणून मोट मॅकडोनाल्ड यांनी काम पाहिले. ग्रुफफिल्ड मल्टीफ्लेक्स या ऑस्ट्रेलियन कंपनीने, याचे बांधकाम केले. फुटबॉल असोसिएशन, द डिपार्टमेन्ट ऑफ मिडिया अॅन्ड स्पोर्टस आणि लंडन डेव्हलपमेन्ट एजन्सी यांचा हे स्टेडियम पूर्ण करण्यात सहभाग होता.

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..