नवीन लेखन...

व्याख्या ज्या हसवतील…..

पेन : दुसऱ्याकडून घेऊन परत न करण्याची वस्तू.
बाग : भेळ शेवपुरी वगैरे खाऊन कचरा टाकण्याची जागा.
चौकशीची खिडकी : “इथला माणूस कुठे भेटेल हो” अशी चौकशी बाजूच्या खिडकीत करावी लागणारी एक जागा.
ग्रंथपाल : वाचकाने मागितलेले पुस्तक “बाहेर गेले आहे” असे तंबाखू चघळत तिरकसपणे सांगण्यासाठी नेमलेला माणूस.
विद्यार्थी : आपल्या शिक्षकांना काहीही ज्ञान नाही असे मानून आत्मकेंद्रित राहणारा एक जीव.
कार्यालय : घरगुती ताण-तणावानंतर विश्रांती मिळण्याची हक्काची जागा.
जांभई : विवाहित पुरुषांना तोंड उघडण्याची एकमेव संधी.
कपबशी : नवरा बायकोच्या भांडणात बळी जाणारी वस्तू.
कॉलेज : शाळा व लग्न या मधील वेळ घालवण्याचे मुलामुलींचे ठिकाण.
चंद्र : कवीच्या हातात सापडलेला दुर्दैवी ग्रह
अनुभव : सभ्य शब्दात मांडलेल्या चुका
मोह : जो आवरला असता माणूस सुखी राहतो पण आवरला नाही तर अजून सुखी होतो
शेजारी : तुमच्या स्वतःपेक्षा ज्याला तुमच्या आयुष्याची खडानखडा माहिती असते तो.
सुखवस्तू : वस्तुस्थितीत सुख मानणारा.
वक्तृत्व : मिनिटा दोन मिनिटात सांगून संपणारी कल्पना दोन तास घोळवणे.
लेखक : चार पानात लिहून संपणाऱ्या गोष्टीसाठी ४०० पानं खर्ची घालणारा.
फॅशन : शिंप्याच्या हातून झालेल्या चुका.
पासबुक : जगातील सर्वोत्कृष्ठ पुस्तकाचे नाव.
गॅलरी : मजल्यावरून लोकांच्या डोक्यावर कचरा फेकण्याची जागा.
लेखणी : एकाच वेळी असंख्य लोकांचा गळा कापण्याचे साधन.
छत्री : एकाचा निवारा, दोघांचा शॉवर बाथ.
परीक्षा : ज्ञान तपासून घेण्याचे एक ‘हातयंत्र’.
परीक्षा : पालक आणि शिक्षक यांच्या साडेसातीचा काळ.
विश्वशांती : दोन महायुद्धांच्या मधला काळ.
दाढी : आळशीपणा व ‘कुरुपपणा’ लपवण्याचे’ रुबाबदार’ साधन.
थाप : आजकाल १००% लोक हि फुकटात एकमेकांना देतात.
काटकसर : कंजूषपणाचे एक ‘गोंडस’ नाव.
नृत्य : पद्धतशीरपणे लाथा झाडण्याची कला.
घोरणे : नवर्‍याने /बायकोने केलेल्या दिवसभराच्या अन्यायाचा बदला रात्री घेण्याची निसर्गाने बहाल केलेली देणगी.
मन : नेहमी चोरीस जाणारी वस्तू.
ब्रह्मचर्य : कुठेच न जुळल्याने स्वीकारायचा मार्ग.
विवाहित माणूस : जन्मठेपेचा कैदी.
विधुर : जन्मठेपेतून सूट मिळालेला कैदी.
श्रीमंत नवरा : चालतं बोलतं ATM कार्ड.
श्रीमंत बायको : अचानक लागलेली लॉटरी.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..