नवीन लेखन...

विविध कालगणना

नाताळ आणि एक जानेवारी आली की नववर्षाच्या शुभेच्छा, गुढीपाडवा आला को नववर्षाच्या शुभेच्छा दिवाळी बरोबर नववर्षाच्या शुभेच्छा, पटेटीच्या शुभेच्छा, चैत्र दिनांक एक पुन्हा नववर्षाच्या शुभेच्छा. म्हणजे ही नववर्षे आहेत तरी किती? एकविसावे शतक 2000 साली सुरु झाले की 2001 साली हा त्यावेळेस डगीचच बाद झाला त्याच वर्षी एका कालगणनेनुसार एकविसावे शतक सुरु होऊन 57 वर्षे झाली होती. दुसऱ्या कालगणनेनुसार 527 वर्षे झाली होती. तिसऱ्यात 327 वे वर्ष आहे असेही लक्षात आले.

भारतात चलनात असलेल्या प्रमुख दिनदर्शिका म्हणजे ग्रेगरियन, तिथी दर्शक शालिवाहन शक, विक्रम संवंत आणि नवीनच सुरु झालेली राष्ट्रीय सौर कालगणना. त्याशिवाय हिजरी आणि पारशी कालगणना वेगळीच प्रत्येक धर्माची स्वतंत्र कालगणना पद्धती असते.

भारतात विविध धार्मिक सण सोडले तर सर्व व्यवहारात ग्रेगरियन दिनदर्शिका वापरली जाते. ही दिनदर्शिका अजिबात शास्त्रीय नाही. चंद्र, सूर्य, पृथ्वी किंवा अवकाशीय कुठल्याही घटनेशी संबंधीत नाही असा काहींचा दावा आणि म्हणून राष्ट्रीय सौर दिनदर्शिका अस्तित्त्वात आली. ही अस्तित्वात असली, सरकारी माध्यमांत, आकाशावाणीवर त्याचा उल्लेख होत असला तरी सर्व व्यवहार ग्रेगरियन दिनदर्शिकोवरच चालतात. राष्ट्रीय सौर कालगणनेची सुरुवात 22 मार्च 1957 पासून आली असली तरी वर्षगणना ही जुनी शक सवंत चालू ठेवली असल्यामुळे । चैत्रला वर्ष 1925 (22 मार्च, 2003) राहील म्हणजे एकविसाव्या शतकात प्रवेश करायला 76 वर्षे आहेत. साधारपणे नर्मदेच्या दक्षिणेस शालीवाहन शक व उत्तरेस विक्रम संवत पाळला जातो. या दोन्ही कालगणना चंद्र कलेनुसारच आहेत. आणखी एक गमत

म्हणजे महिना उत्तरेकडे पौर्णिमान्त आहे तर दक्षिणेकडे अमान्त आहे. सौरवर्ष चैत्र एकला शक 1924 आहे. तो दिवस आहे 22 मार्च, 2003 पण चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजे 2 एप्रिल, 2003 शालिवाहन शक 1925 सुरु होत आहे. म्हणजे 22 मार्चला सुरु होणारे सौरवर्ष 1924 की 1925?

हिजरी वर्ष हे पूर्णपणे चांद्रमासावर मोजले जाते. वर्षाचे 12 चांद्रमास. त्यामुळे हे वर्ष 354 दिवसांचे. म्हणूनच इ.स. 622 मध्ये ही हिजरी कालगणना सुरु झाली तरी सध्याचे हिजरी वर्ष 1523. आपल्या सौर अथवा ग्रेगरीयन कालगणनेनुसार मनुष्य 33 वर्षाचा होतो तेव्हा हिजरी कालगणनेनुसार तो 34 वर्षाचा होतो आणि म्हणूनच दरवर्षी मोहरम अकरा दिवसांनी लवकर येतो. शक, सवंत कालगणनेनुसार चांद्रमास असला तरी वर्ष हे सौरवर्ष असते आणि म्हणून हा फरक भरून कालगणनेसाठी दर तीन वर्षांनी एक अधिक महिना येतो.

हिजरी, शालिवाहन शक, विक्रम संवत आणि इसवी सन आणि आता सौर शक या पाच कालगणना शिवाय भारतात स्थापन झालेल्या आणखी काही कालगणना पुढीलप्रमाणे अर्थात पुढील यादी कालनुक्रमे नव्हे हे ध्यानात घ्यावे.

1) शहेनशाही अकबराने दिने इलाही धर्माच्या स्थापनेबरोबर इलाही सन तर तोरडमलच्या सल्यानुसार महसूल किंवा करवसूलीच्या सोयीनुसार फसली वर्ष

2)कलचुरी – कलचुरी राजांच्या काळात दक्षिणेकडे सुरु.

3) चेदी किंवा त्रेकुटक- दहाव्या अकराव्या शतकात चेदी देशांतील हैहय राजाच्या काळात सुरु झाली.

4) कोलम सवंत तामिली भागांत वापरले जाते.

5) ग्रह परिवृत्ती सवंत – इ.स.पूर्व 24 व्या वर्षी हे सुरु झाले. यात 90 वर्षाचे एक चक्र किंवा आवर्तन मोजले जाते.

6) गांगेय सवंत कलिंग देशाच्या गंगावशी राजाने इ. स. 576 सालापासून सुरू झाले.

7) गुप्त सवंत – गुप्त घराण्यातील एकाने हे सुरु केले.

8) चालुक्य विक्रम संवत – आंधतील कल्याणपूर येथील सोलंकी चालुक्य सहाव्या विक्रमादित्याने ही सुरू केली.

9) नेवार सवंत – नेपाळ नरेश जयदेव मल्ल याने इ.स. पूर्व 879 साली सुरु केले असे म्हणतात.

10) वुड्वैप्पू सवंत – कोचीन मधील एका राजघराण्याने हे सुरु केले.

11) बंगला सवंत ही कालगणना फसली संवत प्रमाणेच आहे. वैशाख महिन्यापासून वर्षाची सुरुवात होते.

12) बुद्ध निर्वाण सवंत – ही गौतम बुद्धाच्या निर्वाण वर्षापासून सुरु झाली.

13) भट्टिक संवत – जेसलमेरचा राजा भट्टिक याने ही सुरू केली.

14) मणिसन बंगालच्या बंगाब्द अथवा बंगला संवत नंतर 45 वर्षांनी हे सन सुरू झाले.

15) मौर्य संवत – आर्च चाणक्याच्या मदतीने चंद्रगुप्ताने मौर्य साम्राज्याची स्थापन केली. इ.स. पूर्व 321 वर्षे तेव्हापासून हा संवत सुरू झाला.

16) यहुदी संवत भारतातील यहुद लोकांमध्ये ही कालगणना प्रचलित आहे.

17) शिवाजी शक – छत्रपती शिवीजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वर्षी म्हणजे इ.स. 1674 मध्ये हा शक सुरू झाला.

18) लक्ष्मण सेन संवत – बंगालच्या लक्ष्मण सेनच्या राज्याभिषेकापासून हा संवत सुरू झाला.

19) वीर निर्वाण संवत – जैन महातीर्थकर महावीर स्वामींच्या परिनिर्वाण वर्षापासून याची गणना होते. अर्थात इ.स. 527 पासून हा सवत सुरु झाला.

20) शाहूर सन- महम्मद लुधलकने हा सन सुरू केला.

21) सप्तर्षी संवत – हिमालयात काही पहाड़ी भागात हा संवत वापरात होता.

22) सिंह अथवा शिवसिंह संवत- सौराष्ट्रातील गोहिल वंशाच्या गोहिल वंशाच्या कारकिर्दीत हे संवत सुरू झाले.

23) सेल्युकेशिअन संवत – ग्रीक सेनापती सेल्युकस निकेटर याने भारतात विजय मिळविल्यावर हे संवत सुरू केले. पण ग्रीकांबरोबरच याचा वापर संपला.

24) हर्ष संवत – सम्राट हर्षवर्धनाने स्वत:च्या राज्यरोहणापासून हे संवत सुरू केले.

25) ब्राह्मस्पत्य संवत्सर – हे एक विशेष संवत्सर गुरुच्या गतीवर अवलंबून आहे. गुरुग्रह बारा वर्षात एक राशीचक्र पुरे करतो त्यामुळे या कालगणनेनुसार एक संवत आपल्या बारा वर्षांचे असते.

या सर्व भारतीय कालगणनांची अधिक माहिती मिळवण्याचे प्रयत्न चालू आहेत. तरीपण एक निश्चित की वर्ष आणि त्यांचा स्थापना काळ आणि नावे वेगळेगळी असली तरी कालगणना म्हणजे म्हणजे महिना हा तिथीनुसार म्हणजे चांद्रमासच गणला जातो. बहुतांशी अमावस्येनंतर शुक्ल प्रतिपदेला सुरू होतो व हा महिना अमावस्येला संपतो. अपवादाने पौर्णिमान्त महिना हा पंधरा दिवस आधी सुरू होतो. महिन्यांची नावे….. अपभ्रंश सोडले तर तीच आहेत. थोडक्यात पंचांगावर आधारित चांद्रमास तेच अधिक महिनाही तसाच आणि सौर वर्षही तसेच. फक्त काही कालगणेत वर्षाची सुरुवात वेगवेगळ्या महिन्यात होते ती त्या त्या प्रसंगानुसार आणि म्हणून वर्षाची गणना वेगवेगळ्या महिन्यांत याचे ठळक उदाहरण म्हणजे शालिवाहन शक वर्ष चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून तर विक्रम सवंत सुरू होतो कार्तिक शुद्ध प्रतिपदेपासून तर आपले राष्ट्रीय सौरवर्ष सुरू होते ते एक चैत्रपासून (परंपरागत चैत्र प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा)

राष्ट्रीय सौर दिनदर्शिकेचा वापर व्हावा असे शासनाला वाटत असेल तर देशांतले सर्व आर्थिक व्यवहार महिन्याचा पगार, वार्षिक हिशेब वगैरे सर्व आणि त्याबरोबर प्रवासाची आणि तत्सम सर्व आरक्षणे अगदी नाटक सिनेमांची सुद्धा सौर दिनदर्शिकाप्रमाणे व्हावीत.

आपले आर्थिक वर्ष 31 मार्चपर्यंत असते. तेव्हा फाल्गुन सौर दिनांक 30 हा 21 मार्चला येतो. म्हणजेच वार्षिक हिशेबाचे वर्षांत काही फारसा फरक पडणार नाही.

जाता जाता सहज सांगायचे म्हणजे इंग्रजी दिनदर्शिका तुम्ही पाहीलेत तर इस्टर संडे आणि गुडफ्रायडे पाहीलेत तर ते त्याच तारखांना दरवर्षी येत नाहीत. कारण ख्रिश्चन म्हणजे ग्रेगरियन कालगणनेनुसार चैत्र पौर्णिमेनंतरचा पहिला रविवार हा इस्टर संडे असतो आणि या रविवारच्या आधीच शुक्रवार हा गुडफ्रायडे असतो. दरवर्षी या सणाच्या तारखा बदलत असतात.

हा विविध कालगणनांचा तपशील पुरा नाही याची जाणीव आहे. वाचकांनी अधिक माहिती किंवा तपशील पुरवला तर आनंदच होईल.

–डॉ. मनोहर मो. मोघे

 घरकुल, नाईकवाडी, आरे मार्ग

गोरेगांव (पूर्व), मुंबई 400063

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..