नवीन लेखन...

दिग्गज फूटबॉलपटू दिएगो मॅराडोना

दिग्गज फूटबॉलपटू दिएगो मॅराडोना याचा जन्म ३० ऑक्टोबर १९६० रोजी अर्जेंटीनाच्या लानुस शहरात झाला.

डिएगो मॅराडोना हे फुटबॉल विश्वातील सर्वात लोकप्रिय आणि वादग्रस्त नावांपैकी एक होते. फुटबॉल विश्वातील जादूगार नावाने प्रसिद्ध असलेला दिएगो मॅराडोनाच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती काही प्रतिकूल होती. त्याचे वडील एका फॅक्टरीत काम करत असत. त्याची आई गृहिणी होती. दिएगोचा जन्म‍ तीन बहिणीनंतर झाला होता. त्या‍मुळे तो घरातील सर्वात लाडका होता. जेव्हा मॅराडोना तीन वर्षांचा होता. तेव्हाब त्याच्या वडीलांनी त्याळला एक फुटबॉल भेट दिला होता. तेव्हापासून त्या ला फुटबॉलचे वेड लागले. वयाच्या १० व्या. वर्षी तो अर्जेंटीनाचा प्रसिद्ध क्लब असलेल्या लॉस सेबोलिटासचा सदस्य बनला. त्याने या क्लबला विक्रमी १३६ सामन्यां मध्ये विजय मिळवून दिला. १६ वर्ष पुर्ण होण्याच्या १० दिवस आधी मॅराडोनाची निवड अर्जेंटीना संघात झाली होती.

१९८१ मध्ये मॅराडोनाने बोका ज्यु निअर्स क्ल बशी करार केला. या क्ल्बला चॅम्पियनशीप जिंकून दिल्याबनंतर तो बार्सिलोनाला गेला. १९८६ च्या विश्वचयषकात मॅराडोनाच्या गोलमुळे अर्जेंटीनाने अंतिम सामन्यात पश्चिम जर्मनीला पराभूत केले होते. त्या‍च टुर्नामेंटच्या क्वार्टरफायनल मध्ये इंग्लंड विरोधात मॅराडोनाने वादग्रस्त‍ हॅड ऑफ गोल केला होता. क्वार्टर फायनलमध्ये इंग्लंड विरोधात केलेल्या या गोल्सना हँड ऑफ गॉड आणि गोल ऑफ द सेंचुरी नावाने ओळखलं जातं.त्यांनी त्यानंतर अर्जेंटिना फुटबॉल टीमसाठी प्रशिक्षक म्हणूनही काम केले.

मॅराडोनाने अर्जेंटिनासाठी ९१ मॅचेस खेळत ३४ गोल्स केले होते आणि चार वर्ल्ड कपमध्ये अर्जेंटिनाचं प्रतिनिधित्व केलं होतं. त्यांनी मैदानात असे काही प्रदर्शन, गोल्स केले जे आजही सर्वांच्या लक्षात आहेत. अनेक गोल्स असे केले जे पाहून सर्वंच आश्चर्यचकित झाले. बार्सिलोनासाठी मॅराडोना यांना एकही युरोपियन कप जिंकता आला नाही. मॅराडोना यांना एकदाच जगातील सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू म्हणून घोषित केले गेले होते. मॅराडोना अर्जेंटीनाचा फुटबॉलपटू असला तरी भारतात त्याच्या चाहत्यांची संख्या कमी नव्हती.

डिसेंबर २०१७ मध्ये कोलकाता येथे डिएगो मॅराडोना यांनी म्हटलं होतं की, मी एक सामान्य फुटबॉलपटू आहे आणि म्हणून मला ‘फुटबॉलचा देव’ म्हणणे योग्य नाही. या कार्यक्रमात १९८६ च्या विश्वचषक करंडकची ट्रॉफी घेतानाच्या मॅरेडोनाच्या १२ फूट उंच पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते.

दिएगो मॅराडोना यांचे निधन २५ नोव्हेंबर २०२० रोजी झाले.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 2959 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..