नवीन लेखन...

अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस

भारतीय वंशाच्या अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस यांचा जन्म २० ऑक्टोबर १९६४ ओकलंड, कॅलिफोर्निया येथे झाला.

या पदासाठी निवडल्या गेलेल्या त्या पहिल्या कृष्णवर्णीय महिला आहेत. कमला हॅरिस यांचे आईवडील दोघेही स्थलांतरित. सुरुवातीला कॅलिफोर्नियामधून खासदार असलेल्या कमला हॅरिस यांनी जो बायडन यांना राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून आव्हान दिलं होतं. मात्र, प्रायमरीमध्ये त्या बायडन आणि सँडर्स यांच्या तुलनेत मागे पडल्या होत्या. राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारी स्पर्धेतून कमला हॅरीस बाहेर पडल्यानंतर उपराष्ट्रपतीपदासाठी त्यांच्याच नावाची चर्चा सुरू होती. कमला हॅरिस यांच्या आईचा जन्म भारतातला आणि वडिलांचा जमैकातला.

कमला हॅरिस यांची आई शामला गोपालन म्हणजे भारतीय आणि वडील डोनल्ड हॅरिस म्हणजे जमैकन. वडील ख्रिस्ती, आई हिंदू. त्यांची आई श्यामला गोपालन श्यामला या कॅन्सर संशोधक आणि नागरी हक्क कार्यकर्त्या होत्या. तर कमला यांचे वडील अर्थतज्ज्ञ आहेत. कमला लहान असतानाच त्यांचे पालक विभक्त झाले आणि आपल्या दोन्ही मुलींना त्यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीची जाणीव असेल याची काळजी श्यामला यांनी त्यांना वाढवताना घेतली.

२०१४ मध्ये कमला हॅरिस यांनी डग्लस एमहॉफ यांच्याशी लग्न केलं. हॅरिस यांनी काही काळ कॅनडातही घालवलाय. श्यामला गोपालन हॅरिस यांनी कॅनडातल्या मॅकगिल युनिव्हर्सिटीमध्ये प्राध्यापिकेची नोकरी स्वीकारल्यानंतर माया आणि कमला या दोन्ही बहिणी पाच वर्षं माँट्रियालच्या शाळेत शिकत होत्या. अमेरिकेतल्या हार्वर्ड विद्यापीठात कमला यांनी चार वर्षं शिक्षण घेतलं. हार्वडमधल्या शिक्षणानंतर कमला हॅरिस यांनी युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियामधून कायद्याची पदवी घेतली आणि अल्मेडा काऊंटीच्या डिस्ट्रीक्ट अ‍ॅटर्नी कार्यालयापासून करिअरला सुरुवात केली.

२००३ साली त्या सॅन फ्रान्सिस्कोच्या डिस्ट्रिक्ट अ‍ॅटर्नी झाल्याय. कॅलिफोर्नियाच्या अ‍ॅटर्नी जनरल म्हणून निवड होणाऱ्या त्या पहिल्या महिला आणि पहिला कृष्णवर्णीय व्यक्ती होत्या.

२०१७ साली त्यांची निवड कॅलिफोर्नियाच्या ज्युनियर युएस सिनेटर म्हणून झाली. अमेरिकेच्या सिनेटमध्ये त्यांनी महत्त्वाच्या चर्चांदरम्यान त्यांच्या संभाषण कौशल्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. गेल्या वर्षीच्या सुरुवातीला कमला हॅरिस यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदासाठीच्या उमेदवाराच्या शर्यतीत आपण असल्याचं जाहीर केलं. सुरुवातीला त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला पण त्या आपल्या मोहीमेला ठोस दिशा देऊ शकल्या नाहीत. शिवाय महत्त्वाच्या आरोग्य विषयक धोरणांबाबतच्या प्रश्नांची त्यांच्याकडे समाधानकारक उत्तरंही नव्हती.

उमेदवारीसाठीच्या वादविवाद म्हणजेच डिबेट्सदरम्यान कमलांनी त्यांच्यातली वकिलाची संभाषण कौशल्यं दाखवत अनेकदा जो बायडन यांच्यावरच प्रश्नांची सरबत्ती केली होती. पण आपल्या उमेदवारीच्या या सर्वोच्च शक्तीस्थळांचा फायदा त्यांना करून घेता आला नाही. अखेर २०२० च्या सुरुवातीला त्यांनी अध्यक्षपदासाठीच्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवारीच्या शर्यतीतून माघार घेतली आणि माजी उपराष्ट्राध्यक्ष यांना पाठिंबा जाहीर केला.

अमेरिकेमध्ये सध्या वर्ण आणि वंशभेदाच्या विरोधात निदर्शनं सुरू आहेत. ब्लॅक लाईव्हज मॅटरच्या चळवळीने जोर धरलाय. पोलिसांकडून केल्या जाणाऱ्या हिंसेच्या विरोधात आवाज उठवला जातोय. आणि यामध्ये हॅरिस यांनी पुढाकार घेतलाय. आफ्रिकन अमेरिकन राजकारणी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं.

अमेरिकेतल्या पोलिसी प्रथा बदलण्याची गरज त्यांनी टॉक शोमध्ये बोलताना व्यक्त केली. केंटुकी मधील २६ वर्षांच्या आफ्रिकन अमेरिकन तरुणीला, ब्रिओना टेलरला ठार करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी त्यांनी ट्विटरवरून केली होती. यंत्रणांमध्ये असणारा वर्णभेद मोडून काढणं गरजेचं असल्याचं त्यांनी अनेकदा म्हटलंय.
कमला हॅरिस यांच्या भारतीय वंशामुळे अमेरिकेतले भारतीयही त्यांच्याकडे आपल्यापैकीच एक म्हणून पाहतात. म्हणूनच कमला यांना देण्यात आलेल्या या उपराष्ट्राध्यक्ष पदाच्या संधीकडे अमेरिकेतल्या भारतीय आणि दक्षिण आशियायी लोकांना देण्यात आलेलं प्रतिनिधित्वं म्हणूनही पाहिलं जातंय.

आपली ओळख (Identity), आपलं मूळ यामुळे आपण वंचितांचं प्रतिनिधित्वं करण्यासाठी योग्य ठरत असल्याचं कमला हॅरिस यांनी अनेकदा म्हटलंय. आता जो बायडन यांनी त्यांची निवड ‘रनिंग मेट’ म्हणून केलेली आहे. कदाचित आता त्यांना हे सगळं व्हाईट हाऊसमधून करायची संधी मिळेल.

कमला हॅरिस यांनी ‘द ट्रुथ्स वी होल्ड’ (The Thruths We Hold) या नावाने आत्मचरित्र लिहीले आहे. मोठं होताना कमला यांचा कायमच त्यांच्या भारतीय मुळाशी संपर्क आला. आईसोबत त्या भारतातही येत. पण यासोबतच आईने आपल्याला आणि बहिणीला ओकलंडच्या कृष्णवर्णीय इतिहासाशीही जोडल्याचं कमला सांगतात. आईच्या हातचा दहीभात, डाळ, इडली खाऊन मोठं झाल्याचं त्या सांगतात. त्यांनी घरी भारतीय बिर्याणी बनवण्याबद्दलही लिहिलेलं आहे.

संकलन: संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 2994 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..