ऊर्जेचा करा योग्य उपयोग

खर्च करावी ऊर्जा आपली, योग्य कामांकरिता
शक्तीस द्यावी दिशा चांगली, जीवन यशाकरिता   ।।धृ।।

बागेतील फुले सुंदर
फुलपाखरांचे रंग बहारदार
मोहक इंद्र धनुष्याकार
निसर्गातील रम्यतेमध्यें शोधा, ईश्वरी गुणवत्ता   ।।१।।
खर्च करावी ऊर्जा आपली, योग्य कामांकरिता

भजन पुजन प्रभूचे
भक्ति-भाव मनाचे
उपवास करी देहशुद्धीचे
तपसत्वाच्या शक्तीनें करा, आत्म्याची मुक्तता   ।।२।।
खर्च करावी ऊर्जा आपली, योग्य कामांकरिता

गरिबासी मदतीचा भाव
दुःखितांसाठीं प्रेमळ स्वभाव
घ्या इतरांच्या मनाचे ठाव
मिळवा कल्याण करुनी, त्यांच्यात समाधानता   ।।३।।
खर्च करावी ऊर्जा आपली, योग्य कामांकरिता

धनसंपत्ती गंगाजळ
मोहमोयांचे जाळ
षड्-रिपू विकार सकळ
विवेक बुद्धीने नष्ट करा, ही मनाची मलिनता   ।।४।।
खर्च करावी ऊर्जा आपली योग्य कामांकरिता

सर्वत्र आहे प्रभू संचार
अणूरेणूत झाला साकार
ब्रह्मांडही त्याचा आकार
विलीन व्हा ईश्वरी तत्वांत, त्यास सर्व अर्पिता   ।।५।।
खर्च करावी ऊर्जा आपली, योग्य कामांकरिता

— डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०

About डॉ. भगवान नागापूरकर 1413 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

पर्वतीच्या टेकडीवरची लेणी

पर्वताई देवीच्या नावावरुन टेकडीस पर्वती हे नाव पडले, पुण्याच्या अनेक ...

रत्नागिरी जिल्ह्यातील नारळ संशोधन केंद्र

रत्नागिरी तालुक्यात भाट्ये येथे नारळ संशोधन केंद्र आहे. हे केंद्र ...

सातारा जिल्ह्यातील पवनऊर्जा प्रकल्प

महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्हा पवनऊर्जा जिल्हा म्हणून प्रसिध्द आहे तो ...

सातवाहनकालीन कर्‍हाड

महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कर्‍हाड हे प्राचीन शहर सातवाहनकालीन आहे. सातवाहनकालीन ...

Loading…