नवीन लेखन...

द अदर साईड ऑफ सोल – ४

….शेवटी त्याने पुन्हा एकदा आत्महत्या केली.

आज करू , उद्या करू , असं करता करता त्यानं एकदाचं फायनल ठरवून टाकलं आणि आत्महत्या केलीच.

आत्महत्या करण्यापूर्वी अर्थातच त्यानं स्टेटस टाकलं फेबुवर. सिलिंग फॅन. त्यावर बसलेला कावळा आणि फॅनच्या खाली लादीवर डेड बॉडी. खूप प्रयत्नानंतर त्याला हे चित्र मिळालं होतं. कॅप्शन तयार होतीच.

कावळ्यांच्या चोचीला येईल धार ।
आत्महत्या कर चल हो तैयार ।।

पोस्ट केल्यावर क्षणार्धात लाईक्स आणि आरआयपी च्या कमेंट्सचा धगफुटीसारखा धोधो पाऊस पडू लागला …

मग त्यानं सुखेनैव आत्महत्या केली. पहिली आत्महत्या केली होती, तेव्हा कुणी दखल घेतली नव्हती. अर्थात त्या आत्महत्येकडे फारसं कुणी गांभीर्यानं घेतलं नव्हतं .

रोज मरे त्याला कोण रडे? असं म्हणून सगळ्यांनी दुर्लक्ष केलं होतं.

तसा तो रोज थोडा थोडा कणाकणानं मरत होता , पण स्वतः एकदम मेल्यानंतर समाजाला येणारं फिलिंग त्याला अनुभवता येत नव्हतं .

रोजचंच मरण. खचाखच भरलेल्या ट्रेनमध्ये न शिरता आल्यानं आणि त्यामुळं कामावर जायला उशीर झाल्यानं मिळणारा लेटमार्क आणि सगळ्यांच्या भयंकर कुत्सित नजरांमुळं येणारं मरण. गुणवत्तेपेक्षा लांडीलबाडीला मिळणारं मानाचं स्थान बघून येणारं नैराश्याचं मरण. आत्मविश्वास खच्ची करणारं मरण. कलेचा बाजार मांडणारं मरण. स्वतःचे शब्द विकायला लावणारं आणि त्यासाठी लाचार करणारं मरण. पोट नावाचा खड्डा भरण्यासाठी देहाचं प्रदर्शन करायला लावणारं मरण.
सामाजिक स्तर विसरून भीक मागायला लावणारं आणि समानत्वाच्या पातळीवर आणणारं मरण. स्वतःच्या अस्तित्वासाठी धर्म जात लिंग प्रदेश विसरायला लावणारं मरण.

असंख्य मरणं रोज मरताना आत्महत्येचं फिलिंग काही येत नव्हतं. मग त्यानं आत्महत्या केली .
अर्थात तरुणाईच्या नव्या फंडानुसार स्टेटस टाकून वगैरे …

नंतर त्याचा व्हिडीओ बनवला. अर्थात गळ्यात फास वगैरे अडकवून. तो व्हिडीओ व्हायरल होईल याची त्याला खात्री होतीच. मग त्याने न्यूज चॅनल ऑन केलं. अपेक्षेप्रमाणे त्याच्या आत्महत्येची न्यूज सुरू झाली होती. मग नेहमीचे यशस्वी कलाकार मेकअप करून बाईट्स द्यायला सज्ज झाले. त्याच्या आत्महत्येचं राजकारण सुरू झालं.

त्याचं घर , त्याचा गाव , त्याची शाळा , महाविद्यालय , त्याची माणसं , त्याचं फ्रेंडसर्कल , त्याचं ऑफिस , ट्रेन मधले सहकारी , त्याचा नेहमीचा चहावाला , वडासांभारवाला , बूट पॉलिशवाला , त्याचा लिफ्टमन …या सर्वांचे बाईट्स …
असं सगळं खणून खणून चॅनलवाले दळण दळू लागले. सगळ्यांना भरल्या गळ्यानं बोलायला लावून…
असलेल्या , नसलेल्या गुणांचं प्रदर्शन करायला लावून… त्यानं बनवलेल्या फासाचं वर्णन , शेवटच्या घटका मोजण्या अगोदरच्या मनःस्थितीचं वर्णन , त्यासाठी मनोविकार तज्ज्ञांचं पॅनल , त्यांच्या चर्चा… समकालिनांवर होणाऱ्या परिणामांच्या चर्चा , त्यासाठी समाजशास्त्रज्ञ मंडळींचं पॅनल… असे सगळे धोबीघाट सुरू झाले .

आणि त्यानं खरीखुरी आत्महत्या केली. मग त्याचा आत्मा , आत्महत्येचं खरंखुरं फिलिंग घेऊन अनंतात विलीन झाला .

हरि ओम।
Rip .

( पूर्णतः काल्पनिक !)

— डॉ . श्रीकृष्ण जोशी , रत्नागिरी .

३१ जुलै २०२०

डॉ. श्रीकृष्ण जोशी
About डॉ. श्रीकृष्ण जोशी 109 Articles
डॉ.श्रीकृष्ण जोशी यांचे प्रकाशित साहित्य कादंबरी : 1 शेम्बी, 2 घसरण, 3 महाराज, 4 घर दोघांचे, 5 अगतिक, 6 नंतर , 7 शल्य, 8 शापित, 9 तुझ्याशिवाय, 10 काटशह, 11 कातळ, 12 अथांग, 13 मार्शीलन, 14 समांतर, 15 वादळ वेणा, 16 भोवरा, 17 ब्रेकिंग न्यूज, 18 कापूस आणि फॅनची गोष्ट(आगामी), 19 सापशिडी,फासे आणि काही सोंगट्या (आगामी ) दीर्घकथा संग्रह: 1 रानोमाळ, 2 रानवा संगीत नाटक : 1 सं. शांतिब्रह्म, 2 घन अमृताचा, 3 राधामानस, 4 ऎश्वर्यावती, 5 ऋणानुबंध, 6 स्वरयात्री, 7 चोखा मेळा गद्य नाटक: 1 चिनुचं घर, 2 स्वप्नपक्षी, 3 अरे, चल उचल काव्यसंग्रह: 1 खडूचे अभंग, 2 क्रांतिज्वाला ललित लेख: (आगामी) 1 रौद्रलेणी, 2 पडघम, 3 शब्दांच्या पलीकडे कथासंग्रह:(आगामी ) 1 ड्रॉवर, 2 चंद्रखुणा बाल वाङ्मय: 1 अपूर्वा, 2 गोष्टीरूप चाणक्य, 3 सरदार वल्लभभाई पटेल(आगामी ) संपादन : 1 मुद्रा (प्रातिनिधिक कथासंग्रह) 2 व्हिजिट बॅग, 3 पॅनोरमा पारितोषिके: 1 डेथ ऑफ कॉमन सेन्स या नभोनाट्याला अखिल भारतीय आकाशवाणीच्या नभोनाट्य लेखन स्पर्धेत संपूर्ण भारतातून प्रथम क्रमांक, नभोनाट्याचे 14 भारतीय भाषांमध्ये भाषांतर, 2 दिल्ली येथील स्पर्धेत 'सं. घन अमृताचा ' या नाटकाला लेखनाचे प्रथम पारितोषिक 3 सं. ऎश्वर्यावती आणि सं.ऋणानुबंध या नाटकांना अनुक्रमे द्वितीय आणि विशेष पारितोषिक उल्लेखनीय : * पावस येथील स्वामी स्वरूपानंद तीर्थराज विधी आणि स्वामी स्वरूपानंद जन्मसोहळा या सीडींसाठी पटकथा लेखन * सं. घन अमृताचा, सं. शांतिब्रह्म, सं. ऎश्वर्यवती या तीन संगीत नाटकांचे आकाशवाणीच्या महाराष्ट्रातील सर्व केंद्रावरून प्रसारण * क्रांतिसूर्य सावरकर आणि कातळ या मालिकांचे आकाशवाणीवरून प्रत्येकी 13 भागांचे लेखन आणि प्रसारण *आकाशवाणी वरून 20 श्रुतिका प्रसारित * समांतर कादंबरी, नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड या संस्थेमार्फत अंध बांधवांसाठी कॅसेट च्या माध्यमातून प्रकाशित * अंध बांधवांसाठी , स्वामी स्वरूपानंद यांचे ब्रेल लिपीतील चरित्र लेखन पुरस्कार 1 'शापित ' कादंबरीला कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार 2 'शल्य ' कादंबरीला कुसुमताई अभ्यंकर पुरस्कार 3 'शल्य ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 4 'कातळ ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 5 अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई यांचा 1998 साठी , स्वरराज छोटा गंधर्व पुरस्कार 6 सं. घन अमृताचा हे नाटक , राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 7 सन 2000 मध्ये सर्वोत्कृष्ट संगीत नाटककार आणि सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून नाट्यपरिषदेचा गुणगौरव पुरस्कार 8 सन 2002 मध्ये सं. शांतिब्रह्म हे नाटक राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 9 मुंबई येथील साहित्य संघ मंदिराचा , कै. अ. ना.भालेराव पुरस्कार 10 संगीत नाट्यलेखानासाठी , कै. पु.भ.भावे पुरस्कार 11 समांतर कादंबरीला रोटरी पुणे यांचा सर्वोत्कृष्ट कादंबरी म्हणून पुरस्कार 12 सन 2006 मध्ये राधा मानस , राज्य नाट्य स्पर्धेत राज्यात द्वितीय तर दिल्लीत प्रथम 13 त्रिदल या संगीत नाटकाच्या पुस्तकासाठी 2007-08 चा महाराष्ट्र शासनाचा कुसुमाग्रज पुरस्कार 14 आदर्श शिक्षक पुरस्कार 15 पुणे येथील बाल गंधर्व संगीत मंडळाचा कै. अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार 16 वुमेन्स फाउंडेशन कोल्हापूर या संस्थेचा साहित्य भूषण पुरस्कार.... हा माझा अल्प असा परिचय ...!!!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..