नवीन लेखन...

गंमत संगणकीकरणामधल्या दिवसांची

गंमत संगणकीकरणामधल्या दिवसांची, अर्थात विसाव्या शतकाच्या सुरुवातीचा काळ!

मी खोलीत प्रवेश केला, खोली कसली एखादे छोटे सभागृहाचं म्हणा ना ! आतमध्ये सुमारे पन्नास विद्यार्थी बसलेले, मी आजूबाजूला एक नजर फिरवली तर खोलीत तणाव जाणवला. काही विद्यार्थी त्यांच्या नोट्सची उजळणी करत होते, इतर एकमेकांशी कुजबुजत होते; नजर सारखी त्यांच्या मनगटाकडे जात होती.
कुठल्याही महत्त्वाच्या परीक्षेआधी परीक्षा हॉलच्या बाहेर साधारण असच चिंताग्रस्त वातावरण असतं.

मी आत जाऊन माझ्या खुर्चीत बसताच पिन ड्रॉप शांतता पसरली. होय, कारण मी त्यांच्या तोंडी परीक्षेची परीक्षक होते. सगळ्यांच्या डोळ्यांत निरनिराळ्या भावना आणि चेहऱ्यावर अनेक भाव दिसत होते त्यात अविश्वास, शंका, गोंधळ, कुतूहल, वैताग काय नव्हतं ? काहींच्या चेहऱ्यावरची नापसंती तर मला उघडपणे जाणवत होती; काही विद्यार्थी शांतपणे भुवया उंचावत, माझ्या अधिकारावर प्रश्नचिन्ह उभे करत होते. पण मी मात्र एकदम शांत होते. थोडे पाणी पिऊन मी तोंडी परीक्षेला सुरूवात केली.

त्या खोलीत मी दिसायला आणि वयाने सर्वात लहान व्यक्ती होते; बावीस वर्षांची, अगदी किरकोळ देहयष्टी असलेली, कोणत्याही गर्दीत हरवून जाईल असे नगण्य व्यक्तिमत्व भासणारी मुलगी. याउलट, माझे सर्व विद्यार्थी होते पन्नाशीच्या आतबाहेर असणारे, बहुतेक माझ्या वडिलांच्या वयाचे, मोठ्या दाढी आणि मिशा असलेले प्रौढ पुरुष.

ते 20 व्या शतकाच्या सुरुवातीचे दिवस होते, जेव्हा बँका आणि सरकारी कार्यालयांनी संगणकीकरण सुरू केले होते. आणि त्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून, त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांना विशिष्ट संगणक अभ्यासक्रम आणि प्रमाणपत्रे घेणे अनिवार्य केले होते. एका बाजूला ज्यावेळी ‘तंत्रज्ञान’ हा शब्दच फारसा रुढ नव्हता त्यावेळी पूर्ण-वेळच्या नोकऱ्या, घरगुती किंवा वैयक्तिक जबाबदाऱ्या आणि वयामुळे येणाऱ्या अडचणी सांभाळत नवीन संगणकाचे तंत्रज्ञान शिकणे कठीण वाटणारे मध्यमवयीन स्त्री-पुरुष तर दुसरीकडे, संगणक शास्त्राचे अद्ययावत ज्ञान घेतलेली, पदवीधर, सर्व आव्हाने स्वीकारण्यासाठी कुठल्याही अतिरिक्त जबाबदाऱ्या नसलेली, कुठलेही आव्हान पेलण्यासाठी पूर्णपणे सज्ज असलेली मी.

जसजशा मुलाखती पुढे गेल्या, तसतसे त्यांच्या चेहऱ्यावरील भाव बदलू लागले आणि अधिक सकारात्मक होऊ लागले. शंकेची जागा कुतूहलाने, अविश्वासाची जागा माफक हास्याने घेतलेली मला जाणवत होती.

आता तुम्हाला अगदी प्रांजळपणे सांगते, तेव्हा मला जरी त्यांबद्द्ल सहानभूती वाटत होती किंवा मी तस दाखवत होते तरी आत खोलवर कुठेतरी माझ्यातली खट्याळ आणि नाठाळ मुलगी त्यांच्या डोळ्यातली ती भीती, त्यांचं मनातल्या मनात सोपा प्रश्न येऊ दे म्हणून प्रार्थना करणं, कठीण प्रश्नाचं (त्यांच्यासाठी पण माझ्या दृष्टीने अगदीच सोपा ) उत्तर देतानाच अडखळणं मस्त एन्जॉय करत होती.

कारण काही वर्ष त्यांच्या खुर्चीत बसल्यावरच मग मी ह्या खुर्चीत बसले होते ना !

“पोस्ट ऑफिस उघडं आहे ” ही सोनी मराठी वरील मालिका ९० च्या उत्तर दशकात घेऊन जाते. तेव्हा सरकारी यंत्रणांचे संगणकीकरण फार मोठ्या प्रमाणावर चालू होते. आज प्राजक्ता माळी ची एंट्री बघून मला २००१-०२ च्या दरम्याने घडलेला हा किस्सा मराठीत लिहून काढल्याशिवाय राहवले नाही.
तुमचे पण अल्याडचे किंवा पल्याडचे असे काही किस्से असतील तर जरूर लिहा!

-Prerana Kulkarni

Avatar
About `आम्ही साहित्यिक' फेसबुक ग्रुप 370 Articles
आम्ही साहित्यिक या फेसग्रुप ग्रुपवरुन आलेले लिखाण. हा ग्रुप मराठीसृष्टीने बनवला आहे व त्यावरील निवडक साहित्य मराठीसृष्टीवर प्रकाशित केले जाते. मराठीतील हा एक लोकप्रिय आणि दर्जेदार साहित्यविषयक ग्रुप आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..