नवीन लेखन...

ती आणि मी – दीपस्तंभ (कथा)

का ?

हा प्रश्न आपण कुणालाच विचारू नये.असे माझे स्पष्ट मत आहे. तसा मी तिलाही कधीच विचारला नाही. कारण तिच्या ‘ अफाट बुद्धिमतेची’ मला आधीच कल्पना आली होती. खरे तर ती माठ होती माठ . मुख्य म्हणजे तिलाही त्याची कल्पना होती. तरीपण त्याचे बऱ्यापैकी नाव होते,चित्रकलेच्या समीक्षेत , अर्थात तिला चित्रे काढणे नीट जमत नव्हती.समीक्षकांचे हेच दुखणे आणि हाच प्लेस पॉईन्ट असतो.हे पण तिला माहीत होते फक्त , बडबड्या बिन्धास स्वभावामुळे ती सर्वाना परिचित होती.

फार वर्षांपूर्वी भेटली , आमची मैत्री होती.त्यावेळी मला एका मैत्रिणीची गरज होती.ती गरज ती पुरी करत होती. तिचेही लग्न झालेले होते , आपण नुसते लग्न झालेले असेच म्हणू.माझ्या व्यतिरिक्त तिला बरेच मित्र होते. आम्ही आर्ट वर खूप गप्पा मारायचो , कधीकधी खरेच चागले बोलायची पण कधीकधीच .तिच्याकडे माणसे आकर्षून घेण्याची कला मात्र होती.त्यामुळे ती पार्टीत असताना. हाय-हॅलो करत मिसळून जायची. दोन-चार घोट पोटात गेले की ती माझ्याकडे यायची मी पण शांतपणे पीत बसलेला असायचो.

माझेही बरे चालले होते माझी चित्रे खपत होती.परंतु त्या दाढीवाल्याने मात्र पार मार्केट हलवून ठेवले होते.तो दाढीवाला आणि मी दोस्त होतो , परंतु दाढीवाला जबरदस्तच होता. अर्थात तिचाही तो मित्र होता.

हळूहळू आमचे नाते घट्ट होऊ लागले, स्टुडिओत यायची तेव्हा मी तिला मॉडेल बनवायचो.चित्र पुरेसे झाले की बघायला यायची,तिचे ऍबस्ट्रॅक्ट पाहून खूप अशी चिडायची.कारण ते तिचे ऍबस्ट्रॅक्ट असायचे , तिचे चित्र काढताना मला ती तशीच दिसायची.एकदा तिच्याघरी गेलो ,दोघेही पीत बसलो होतो , समोर समुद्र होता.हळू हळू डोळे जाड झाले आणि बरेच काही..त्या रात्रीनंतर तिचे ऍब्स्ट्रॅकट काढले नाही.कारण त्याचे ते रूप भन्नाट होते.

त्यानंतर आम्ही रेग्युलर राहू लागली.मी तिच्यात काय पाहिले ते त्या दिवसानंतर मला जाणवले, ती वादळच होती.आणि मी किनारा , धडकावर धडका बसत असत , लाटा फूटत असत आणि किनाराही .

पण अशा लाटा किनाऱ्याला हव्याच असतात.तो त्याच अपेक्षेने लाटेकडे बघत असतो….आणि लाट धडकतच असते. त्या लाटेची ओहोटी सहन होत नाही मला ,कधीच सहन झाली नाही.तिला काय वाटत होते याचा मी कधीच विचार केला नाही अर्थात तिनेही नाही.

मस्त चालले होते आमचे.आजही ती भेटते , लाटेप्रमाणे .

बरे वाटते ,आणखी एक बरे वाटते , त्या समुद्रात एकही ‘ दीपस्तंभ ‘ नाही. आहे पण तुटका…बंद

त्या ‘ दीपस्तंभाची ‘ नहमीच अडचण असते.उगाच दिशा वगैरे दाखवत बसतो.

लाटा अंगावर घेत असताना.

— सतीश चाफेकर

Avatar
About सतिश चाफेकर 447 Articles
सतिश चाफेकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. जगभरातील ३०००० पेक्षा जास्त व्यक्तींचा स्वाक्षरीसंग्रह त्यांच्याकडे आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..