टॅक्सी !

शंकर मुडकेचा बेचव चहा आणि तिखटजाळ सामोसा खाल्ल्याशिवाय आमच्या ऑफिसात कोणीच कामाला सुरवात करत नाही . तसा तो खाऊन आम्ही रोजच्या प्रमाणे आजही सुरवात केली . पण आज काहीसा  वेगळाच दिवस होता .
माझ्या टेबलवरला तो  कावळ्या सारखा काळाकुट्ट फोन केकाटला . हा लँडलाईन सेट सात वर्षा खाली घेतला होता . मालकाला तो लकी म्हणून अजून तसाच आहे .
” नमस्कार ,दैनिक दिनकर , बोला ”
“चीफ एडिटर ?”
“हा , बोलतोय ”
“काहो ? मुंबईत म्हणे एक अशी टॅक्सी आहे जी तुम्हाला हवे त्या ठिकाणी नेत नाही ,तर तुम्ही ज्या जागी हवे आहेत तेथे नेते !”
“अहो ,अश्या अफवांवर विश्वास ठेऊ नका . अशी टॅक्सी कशी असू शकते ? ”
“नाही म्हटलं, तुम्ही पेपरवाले तुम्हाला अश्या बातम्या माहित असत्यात . ”
” अशी काही अधिकृत बातमी आत्ता पर्यंत तरी आमच्या पर्यंत आलेली नाही . अली तर उद्या  पेपरात तुम्हाला नक्की दिसेल . धन्यवाद . ” मी फोन कट केला . काय एक एक महाभाग असतात ? काय तर म्हणे  ‘तुम्हाला हवे त्या ठिकाणी नेत नाही ,तर तुम्ही ज्या जागी हवे आहेत तेथे नेते !अशी टॅक्सी !”
पुन्हा फोन वाजला .
“नमस्कार –”
“नक्की अशी टॅक्सी नाहीना ?–“माघाचाच आवाज .
हा मुडदा समोर असतातर त्याचा पुन्हा मुडदा पाडला असता . एकदा सांगून काळात का नाही ?
“अहो , कितीदा सांगायचं –”
” नाही म्हणजे तो धुमाळ म्हणत होता , — पण तो खोटे बोलत असेल . ”
मी काही सुनवायच्या आत त्यानेच फोन बंद केला . दुसऱ्या क्षणी पुन्हा रिंग वाजली . साला वैताग . मी रागाने रीसिवर उचलला .
“अबे ,भाड्खाऊ —”
“तोड सांभाळा कुलकर्णी ! मी देवधर बोलतोय !” देवधर माझा बॉस !
“सॉरी सर ,एक फोन मघापसन —”
“उद्या बेंगलोरला सकाळी नवाला एडिटर्स मिट आहे . आपले सारे फॉरेन करसपोंडडट येणार आहेत तुमी मुंबई रीप्रेझेनट करा . बाय .”  माझा ‘ह्याव अ गुड डे ‘ न ऐकताच बाबाने फोन कट केला . बोंबला म्हणजे  आज झोपेचे खोबरे .
लॅपटॉप जवळ ओढला . बेंगलोर फ्लाईट बुक केली . पहाटे चारचा डिपार्चर होता . दोन तास घरा पासून एअर्पोट ,तास भर चेकइन साठी आणि अर्धातास बफर . म्हणजे रात्री बारा ते एकच्या दरम्यान घर सोडायला पाहिजे . कॅब बुक केली . पुन्हा फोन किंकाळला . हे दिवसभर चालू असत .
“नमस्कार,  दैनिक दिनकर . बोला ”
“मी डॉ अभ्यंकर , मला एक थँक्स द्यायकचे आहेत एका अननोन टॅक्सी ड्रॉयव्हरला . ”
डॉ अभ्यंकर म्हणजे  मुंबईतील बड प्रस्थ ! नामवंत न्यूरोसर्जन ! अन फोनवर !
“बोला डॉक्टर साहेब . काय झाले ?”
“गोष्ट काल रात्रीची आहे . माझी गाडी बिघडली म्हणून मी टॅक्सी बुक केली . घरचा पत्ता ड्रॉयव्हरला सांगून गाडीत बसलो . गाडी थांबली ,मी उतरलो पण ते माझे घर नव्हते ! माझ्या समोर नुकतीच एक प्रवासी बस अपघात ग्रस्त झाली होती ! लोक विव्हळत होते ,काही मदतीसाठी टाहो फोडत होते ! परिस्थितीची मला जाणीव झाली . मी माझ्या हॉस्पिटल स्टाफ , पोलीस , ऍम्बुलन्सला भराभर फोन केले . काही वेळात सरकारी फौज आली . तोवर जमेल तसा लोकांना मदत आणि धीर देत होतो . फार नाही पण काही जणांचे प्राण वाचवण्यात माझी मदत झाली . माझी नेमकी जेथे गरज आहे तेथे मला पोहंचवणाऱ्या टॅक्सी ड्रॉयव्हरचे आभार मानायचे आहेत . या गडबडीत त्याचे भाडे पण द्यावयाचे राहून गेले आहे . ! प्लिज एखाद्या कोपऱ्यात या माणुसकीच्या बातमीसाठी जागा द्या . आणि हो त्या ड्रॉयव्हरला मला भेटण्याचे अपील करा !”
“जरूर ती मी सोया करतो . ”
थँक म्हणत डॉक्टरांनी फोन ठेवला . मघाशी त्या बावळट माणसाचा फोन आणि हा डॉक्टर अभ्यंकरांनाची बातमी ! सत्य का योगा योग ? मी एक छोटी नोट  तयार केली .
“आनंद !”माझ्या असिस्टंटला आवाज दिला .
“सर ?”
“आनंद ,एखादी फिलरसाठी आलेली चारोळी , कविता कमी कर, हि नोट नजरे खालून घाल आणि पेपरला घे . आणि हो मी आता निघतो उद्या बेंगलोरला मिटिंग साठी जायचे आहे . थोडी झोप काढतो .  ”
“ओके ”
मी टेबलवरला पसारा आवरून निघालो .
०००
“कारे ,आज दुपारीच परतलास ?बरे नाही का काय ?”अंजलीने दार उघडताच विचारणा केली .
“आग ,सगळं ठीक आहे . प्रकृती पण मस्त आहे . ”
“मग ?”
“उद्या बेंगलोरला मिटिंग आहे . रात्री चारची फ्लाईट आहे . झोपेचं खोबर होणार . म्हणून जमेल तेव्हडी दुपारी झोप काढावी म्हणून लवकर आलो . ”
“मला वाटले माझी आठवण —-”
” अंजली , तू माझ्या आत्मा -जीव कि प्राण –जान -जिंदगी –आहेस ! तू नेहमीच माझ्या सोबत असतेस ! ”
“बस ,बस नको इतकं प्रेम उतू घालूस ! जेवलास का नसता जेवून घे . ताक केलंय .पी . आणि झोप . ”
मी बेड रूम कडे मोर्चा वळवला . कपडे बदले . ताक पिले . अन झोपी गेलो .
०००
अंजलीने उठवले तेव्हा रात्रीचे साडेनऊ झाले होते . फ्रेश झालो .
“चल ,अंजु जेवण करून घेवूत . मग तू झोपी जा . ”
“नको , मी आज जेवणार नाही . अरे दुपार पसन छातीत जळजळतंय . थोडं दूध पिऊन झोपणारय . ”
अंजलीच हे नेहमीच आहे . अरबट चरबीत खाते अन मग पित्त होत , डोकं दुखत .
मी जेवण केलं . थोडी मीटिंगची तयारी करायची होती ,त्याच्या नादी लागलो .
कॅबला रात्री बरोबर बारा विसला येण्या साठी बजावले होते आणि बारा विसला कॅब दाराबाहेर थांबली . !
अंजलीचा नुकताच डोळा लागला होता . तिला उठवणे जीवावर आले . जवळच्या चवीने घराचे मेन डोर लॉक करून टॅक्सीत बसलो . आभाळ भरून आलं असावं हवेत उष्मा वाढला होता . टॅक्सिच्या ए सी मध्ये डोळे मिटून मागे टेकलो . गाडीने वेग घेतला . तोच मोबाईल वाजला .
“बोल आनंद !”
” सॉरी ,सर . दुपारची तुमची नोट चुकून खिशातच राहिली .आत्ता लक्षात आलं . तरी प्रिंटिंग सेक्शनला गेलो होतो, पण पेपर लोड झाला होता . ”
“ठीक आहे . उद्या मात्र आठवणीने टाक  . एक अपॉलॉजीचा फोन डॉक्टरला कर . बाकी घे सांभाळून . ”
मी पुन्हा डोळे मिटून मागे टेकलो .
साधारण तासाभराने कॅबचा वेग वाढल्याचे जाणवले . डोळे उघडून पाहतो तो स्ट्रीट लाईट बंद . सर्वत्र अंधार . बाहेर पाऊस सुरु झालेला . कोणत्या भागात आहोत हेही कळेना .
“काय झालाय ?”मी ड्रॉयव्हरला विचारले .
“बारिश है साब . इसलिये बत्ती गुल हो गयिली  होगी . ”
“आपण वेळेत पोहांचूना ?”
” हा , आप फिकर मत करो . टाइम पर और सही मोके पर पोहचा दूंगा ! ”
दहा पंधरा मिनिटातच कचकन ब्रेक मारून कॅब थांबली .
समोर ‘अपोलो हॉस्पिटल ‘ ची निऑन पाटी चकाकत होती . दवाखान्याच्या इमर्जन्सी डोर वर माझी टॅक्सी पार्क झाली होती .
“आबे ,तेरेको एयरपोर्ट बोला था —“माझे शब्द घशातच राहिले . तेव्हड्यात सफाईदार वळण घेऊन सायरन वाजवत ती छोटी ऍम्ब्युलन्स माझ्या समोर थांबली . मागचे दार उघडून आमच्या शेजारच्या शेखरने बाहेर उडी मारूनच उतरला . लगोलग पेशंटला स्ट्रेचर वरून बाहेर घेतले . माझ्या पाय खालची जमीनच  खचली . स्ट्रेचरवर अंजली होती ! .
०००

अंजलीला आय सी सी यु मध्ये ऍडमिट केले होते . इमर्जन्सी होती . इ सी जि ऍबनॉर्मल होता . पण ती आता डॉक्टरांच्या देखरेखेखाली होती . थोडे स्थिरावल्यावर मी शेखरला विचारले .
“काय झालं होत ?”
“तुम्ही गेल्यावर काकूंनी मला आवाज दिला . त्या खूप घाबरल्या होत्या . दम लागला होता . छातीत जाळ होतोय म्हणाल्या . जबडा पण दुखतोय म्हणाल्या . मी तुम्हाला फोन लावला ‘नॉट रिचेबल ‘ आला . मग ऍम्ब्युलन्स मागवली !पण तुम्ही येथे अगदी वेळेवर कसे ? संध्याकाळी तुम्ही बेंगलोरला जाणार म्हणत होत्या काकू !”
“अरे मी एअरपोर्ट साठी निघालोच होतो —-“काही तरी आठवून मी मोबाईल काढला . त्यावर मी बुक केलेल्या टॅक्सीचा ‘गाडी फेल हुवा है ,दुसरा कॅब बुक करो ‘ मेसेज होता !
मग मला घेऊन निघालेली आणि येथे आणणारी कॅब कोणती होती ?
मी फोन लावला . मी बराच वेळ बोलत होतो . आणि शेवटी म्हणालो .
“आनंद , त्या चारोळ्या, कविता फिलरलाच राहू दे ! आणि ती ‘अँन्जिल टॅक्सी ‘ हेड लाईनला घे ! डॉक्टर अभ्यंकरानं सोबत माझी घटना पण टाक !”

— सु र कुलकर्णी

आपल्या प्रतिक्रियांची वाट पहातोय . पुन्हा भेटूच . Bye .



About सुरेश कुलकर्णी 55 लेख
मी सुरेश कुलकर्णी. . साधारण कथा , लेख ,जुन्या सिनेमाच्या (हिंदी )गण्यावर माझे लिखाण असते . एखादे छानसे पुस्तक वाचण्यात आले तर त्यावर हि लिहतो . माझ्या वाचकास एक नम्र विनंती माझे लिखाण आवडले तरी ,आणि नाही आवडले तरी जरूर कळवा माझ्या लिखाणाचा पोत त्या शिवाय सुधारणार नाही .माझे सर्व लिखाण काल्पनिक असते .

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

p-2078-IT-policy-300

महाराष्ट्राची आयटी अनुकूल शहरे

भारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिक संघटना नेस्कॉमच्या (नॅशनल असोसिएशन ऑफ ...
p-2104-muktagiri-300

श्रध्दास्थान मुक्तागिरी

विदर्भातील अमरावती जिल्हयात मुक्तागिरी हे निसर्गरम्य तसेच जैनधर्मीयांचे महत्त्वाचे धार्मिक ...
p-2060-mahalaxmin-temple-01-300

करवीरनगरी अर्थात कोल्हापूर

करवीरनगरी अर्थात कोल्हापूर जिल्ह्यास ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक वारसा लाभलेला ...
p-2090-ambejogai-city-300

अंबेजोगाई

अंबेजोगाई बीड जिल्ह्यातील एक शहर आहे. १३व्या शतकात स्वामी मुकुंदराज ...

Loading…