दवणा / दमनक

दवणा/दमनक ह्याचे २-३ मीटर उंच दाट उगवणारे सुगंधी क्षुप असते.फांद्या अंगठ्या एवढ्या जाड असतात.ह्याची पाने १५-१७ सेंमी लांब व रूंद असतात.पानाच्या मागील पृष्ठावर पांढरी लव असते.वरच्या भागात पुष्प येते जे गुच्छ स्वरूपात मंदिरात येते.

ह्याचे उपयुक्तांग पंचांग व क्षार असून हे चवीला कडू,तुरट व उष्ण गुणाचे व हल्के रूक्ष तीक्ष्ण असते.हा त्रिदोषशामक असून प्रामुख्याने कफवातनाशक आहे.

चला आता आपण ह्याचे औषधी उपयोग जाणून घेऊयात:

१)वेदना व सूज ह्यावर दवण्याचा लेप करतात.

२)ह्याचा क्षार गर्भाशय संकोचक असून मासिकपाळीच्या तक्रारीत उपयुक्त आहे.

३)दवणा आमपाचक असल्याने तापात उपयोगी आहे.

४)दवणा पित्तसारक असल्याने यकृत विकारात उपयुक्त आहे.

५)ह्याचे तेल किटकनाशक आहे.

(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )

(कृपया फोटो चुकला असल्यास सांगावे हि विनंती)

वैद्य (सौ) स्वाती हेमंत अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
©️ Dr Swati Anvekar



वैद्य (सौ) स्वाती हेमंत अणवेकर
About वैद्य (सौ) स्वाती हेमंत अणवेकर 202 Articles
वैद्य (सौ) स्वाती हेमंत अणवेकर गेली १० वर्षे गोव्यामध्ये म्हापसा शहरात आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीकच्या माध्यमातून पंचकर्म, आहार मार्गदर्शन, सुवर्णप्राशन असे उपक्रम राबवीत आहेत. लेखनाची आवड असल्याने त्या विविध स्थानिक वृत्तपत्रातून आयुर्वेद व सामाजिक समस्यांशी निगडीत लेखन त्या करतात तसेच आरोग्यसंबंधित विषयांवर शाळा, कॉलेज इ मध्ये व्याख्यान देतात. आहार या विषयात जास्त रूची असल्याने व त्यावर अभ्यास आणि वाचन असल्याने त्यांनी आपला किचन क्लिनीक या सदराद्वारे ऑनलाईन लिखाण सुरु केले आहे. त्या आरोग्य भारती व जायंट्स ग्रूपच्या सदस्य देखील आहेत. आयुर्वेद शास्त्राचा जमेल तेवढा अभ्यास करून त्याचा प्रचार व प्रसार करण्याची त्यांची मनीषा आहे.
Contact: Website

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

सिंधूदुर्गाच्या संरंक्षणासाठी बांधलेला किल्ले पद्मगड

सिंधुदुर्गाचे महत्त्वाचे भौगोलिक स्थान ओळखून शिवरायांनी याच्या संरक्षणासाठी मालवणच्या सागरतीरावर ...

डोंबिवलीतील ग्रंथालय व वाचनालये

सुशिक्षितांचे शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या डोंबिवलीत अनेक समृद्ध ग्रंथालये आणि ...

बिनखांबी गणेश मंदिर, कोल्हापुर

कोल्हापुर शहराच्या महाद्वार रस्त्यावर हे मंदिर आहे. याला बिनखांबी गणेश ...

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवतीचा किल्ला

सिंधुदुर्ग जिल्ह्यामधे असलेला निवतीचा हा किल्ला पर्यटकापासून बराच दूर आहे ...

Loading…