ह्याचे सुमारे १५ मीटर उंच वृक्ष असतो.पाने १०-१५ सेंमी रूंद व भालाकार असून फुल पांढरे,लहान व गुच्छात उगवणारे आहे.फळ लहान व सफरचंदा प्रमाणे गोल व लवयुक्त असते.ह्याच्या बिया धुरकट पिवळ्या व अनेक कोन असलेल्या असतात.
तुवरकाचे उपयुक्तांग आहे बीज व बीज तेल.हे चवीला तुरट,कडू,तिखट असून उष्ण गुणाचे व हल्के स्निग्ध व तीक्ष्ण असते.तुवरक कफनाशक व वातनाशक आहे.
चला आता आपण ह्याचे काही औषधी उपयोग जाणून घेऊयात:
१)खाज,त्वचारोग व व्रण ह्यात तुवरक तेल उपयोगी आहे.
२)तुवरक रक्ताच्या विकारात रक्तातील दोष नष्ट करते.
३)तुवरक तेलाचा उपयोग जीर्ण त्वचारोगामध्ये पोटात देण्याकरिता केला जातो.
४)आमवात व वातरक्त ह्यात तुवरक तेल वेदनाशामक काम करते.
(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )
(कृपया फोटो चुकला असल्यास सांगावे हि विनंती)
वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
©️Dr Swati Anvekar
Leave a Reply