नवीन लेखन...

आजचा आरोग्य विचार – भाग सहा

बिछाना कसा असावा ?
तर ज्यावर शांत झोप लागेल असा, पाठीला पूर्ण आराम मिळेल असा, ओबडधोबड नसलेला आणि स्वच्छ धुतलेला असावा.

भारतीय परंपरेतील बिछाना हा असाच होता. जमिनीवर अथवा एका लाकडी बाकावर पथारी पसरायची की झाले ! त्यावर एखादी चटई, धाबळी, घोंगडी, सतरंजी, गोधडी, रजई, किंवा शाल. झोपल्यानंतर इंग्रजी एस आकाराचा पाठीचा कणा पूर्णपणे जमिनीला समांतर टेकला जावा. ज्यामुळे मेरूदंडातील सर्व मणके देखील एका सरळ रेषेत येतात. आणि मज्जारज्जूवरील ताढ कमी होतो. म्हणजे मणक्यातील अंतर वाढणे, कमी होणे, मणक्यातील गादी सरकणे, गादीला सूज येणे, त्यामुळे होणारी पाठदुखी, कंबरदुखी, मुंग्या येणे आदि प्रकार कमी होतात.

घट्ट पृष्ठभागावर आपला पाठीचा कणा टेकला तर आपल्या शरीराच्या वजनामुळे सर्व मणके सहजपणे विश्रांती अवस्थेत येतात. पण गादीचा हाच पृष्ठभाग जर मऊ असेल तर मणक्यांना जेवढा आराम मिळायला हवा तेवढा मिळत नाही आणि पाठीच्या समस्या वाढतात.

हवा आणि पाणी भरलेल्या गाद्या या विशिष्ट अवस्थेतच वापरायच्या असतात. दररोज नाही. जे रुग्ण कायम बिछाईत (कायम बिछान्यात झोपून ) अवस्थेत असतात, म्हणजे कोणतीही हालचाल न करता जेव्हा झोपलेल्या अवस्थेत असतात, तेव्हा मांडीची, खुब्याची हाडे, मणके यांच्या टोकांमुळे त्वचेला बाहेरून जखमा होतात. आणि त्या लवकर बऱ्या होत नाहीत. फक्त याच अवस्थेत बिछाना अत्यंत मऊ असावा. किंवा पाण्याचा वा हवेचा असावा.

आज स्पंज, फोम डनलाॅपसारख्या अत्यंत मऊ बिछान्यावर थोडी उब मिळेल पण, मणक्यांना जेवढा आराम हवा तेवढा मिळत नाही. आणि नवीन प्रकारच्या गाद्यामधे नको तेवढी उष्णता तयार होते. त्यात उबल्यासारखे होते. घामही येतो.

केवळ बिछानाच नाही तर बसायचे आसनदेखील असेच होते.

शाळेतील मुख्याध्यापकांची लाकडी खुर्ची आठवतेय का ? टेबलाखाली पाय अधांतरी राहू नयेत, ते पूर्णपणे टेकवण्यासाठी एक त्रिकोणी आकाराचा लाकडी आधार असायचा. या लाकडी खुर्चीत बसल्यावर मणका, मांडीची, खुब्याची हाडे, यांना पुरेपूर विश्रांती मिळायची.

अशी विश्रांती आताच्या गरगर फिरणाऱ्या, पुढे मागे होणाऱ्या, आणि पाय अधांतरी राहाणाऱ्या खुर्चीत मिळत नाही. पाय अधांतरी लटकत राहिल्याने मणक्यावर ताण येतो आणि पाठीची दुखणी वाढलेली दिसतात. त्यासाठी कंबरेला, मानेला, पट्टे गुंडाळून ठेवणे हा पण पूर्ण उपाय होत नाही.

वैद्य सुविनय दामले.
कुडाळ, सिंधुदुर्ग.
9673938021

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..