टक्कल पुराण

मला ‘बाल’वयात जेंव्हा टक्कलाविषयी फारशी माहीती नव्हती तेंव्हा वाटायच की काही लोक जसे केस वाढवतात तसेच काही प्रतिस्पर्धी लोक टक्कल वाढवत असावेत. वाढत्या वयानुसार टक्कलांचे विविध आकार तसेच तुरळक केसांचा त्याच्या अवती भवतीचा वावर हा माझ्या टक्कलाविषयीच्या उत्कंठेचा केंद्रबिंदु होत गेला. टक्कल या विषयाचा खोलवर विचार करत करत आता तर माझेही केस झडत जाउन मीही स्वयंप्रकाशित होण्याच्या मार्गावर आहे परंतु तरीही माझा त्याविषयीचा अभ्यास तितक्याच चिकाटीने चालू आहे.

डोक्यावरचे केस चोहो बाजुनी झडत जात उदयाला येणार्या उदयोन्मुख टक्कलाची मजल हळु हळु ते लांबून चमकण्यापर्यंतही जाते. काही टक्कलांची सुरुवात भोवर्यापासुन केस झडण्याकडे होते तर काहींचे कपाळाच्या दिशेकडचे केस विरळ होत जातात पण दोन्ही कान व मानेच्या टापूमधे भरपूर केस रहातात. विरळ केस कधी कधी एकांताच्या भितीनी कळपानी रहाणही पसंत करतात. यात, कुरळे, पांढरे व काळे असे तीनही प्रकारचे केस आढळतात. याची ठेवण चंद्र, नेकलेस वा गजर्याशी मिळतीजुळती असते. कपाळ ते मान व दोन्ही कान या चौफेर भागात केस शिल्लक न रहाणे यालाच ” गाँन केस ” संबोधतात.

” वंशपरंपरागत ” हे टक्कलासाठीच कारण माझ्या अभ्यासुवृत्तीला मुळीच पटत नाहीये कारण टकलू पुरूषाच्या मुलींनाही भरघोस केसं असतात हे आपल्याला सुपरिचित आहे. तसेच विचार करुन केस झडुन टक्कल पडत असत तर कित्येक अविचारी टक्कलग्रस्थ झालेले आपल्याला दिसले नसते. टक्कल आणि अक्कल याचाही काही संबंध नसावा; माझ्याकडे ठोस पुरावा नाहीये पण काही सरदारही पगडीखाली टकलु असावेत असा माझा तर्क आहे.

इतिहासात किंवा शिवकालीन युगात किंवा पुराणात कोणी राक्षस, देव, ॠषीमुनी टकले असल्याचा उल्लेख नाही. टक्कल ही संकल्पनाच तेंव्हा नसणार. मला तर वाटत कालांतरानी जसा कंगव्याचा वापर सुरु झाला तसतसा कंगवा आणि टाळु यांच्या रोजच्या संघर्षातुनच केसानी टाळुशी फारकत घेतली आणि टक्कल पडायला सुरुवात झाली. आता अशा टक्कलांचा कंगव्याशी संबंध केवळ खाज सुटल्यावरच येत असावा.

1. काही टक्कल इतकी कट्टर असतात की कपाळ कुठे संपतय आणि गंध कुठपर्यंत लावाव हेच समजत नाही. गाफील राहुन, गंध लावणारा मणक्याच्या टोकापर्यंतही जाउ शकतो.
2. काही टकलांचा एरीयल व्ह्यु घेतला असता ती येज्दी मोटरसायकलच्या टाकीसारखी मधे खोलगट आणि टोकाला पसरट दिसतात.
3. काही टकलांवरचे तुरळक केस काही केल्या बसतच नाहीत, ते बुरुजावरुन टकलावर पहारा देत असल्याच भासवतात.
4. आँफिसमधे एका खानदानी टकलूला मी कंगवा मागितल्यावर हाहाःकार माजला होता.
5. आपण जास्त बोलल तर हे टकलू लोक, ” त्यात काय एवढ? केसाखाली तर सगळेच टकलु असतात” असाही प्रतिवादही करतात.

केवळ विनोद म्हणुन टक्कल हा विषय मांडतोय. कोणाच्याही वर्णनाशी साधर्म्य अढळल्यास तो केवळ योगायोगच समजावा!!

— प्रकाश तांबे
8600478883

Avatar
About प्रकाश तांबे 36 Articles
मी प्रकाश तांबे, पुणे. गेले तीन-चार वर्षे मी वर्तमानपत्रे व सोशल मीडीयावर सातत्याने लिहित असतो. जाणकार वाचकांच्या प्रतिक्रीयेने मला नेहमीच स्फूर्ती मिळत असते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…