तुम्हाला रिकाम्या पोटी चहा पिण्याची सवय आहे का

भारतातील सुमारे 90 टक्के लोकांची दिवसाची सुरुवात चहा पिण्याने होते. भारता सारख्या महान देशात चहा हे खास पेय आहे. पाहुण्यापासुन ते टाईमपासचा सर्वात  दुआ चहालाच मानले जाते. म्हणून प्रत्येक भारतीय लोकांच्या घरी चहा हा असतोच. सकाळी उठल्यानंतर गरमगरम वाफाळता चहा घेतला की सगळ्यांनाच प्रसन्न वाटते. मात्र सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी चहा पिण्याने प्रसन्न वाटत असले तरी त्याचे तोटे मात्र बरेच आहेत.

चहामध्ये असलेल्या कॅफीनमुळे जरी तुम्हाला फ्रेश वाटत असले तरी याचे काही गंभीर परिणामही तुम्हाला भविष्यात भोगावे लागू शकतात. चहा म्हणजे काही लोकांसाठी अमृतासारखं असतं. काही लोकांना चहाची इतकी सवय असते की चहाविना अशा लोकांना जगणे अशक्य होईल असे त्यांचे वागणे असते. परंतु लोक चहा पिताना अनेक चुका करतात. जास्त चहा प्यायल्याने अथवा रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने आपल्याला हानीही होऊ शकते. सकाळी उठल्यानंतर शरीराला प्रोटिन आणि कार्बोहायड्रेटची गरज असते. मात्र अशा वेळी काहीच न खाता रिकाम्या पोटी चहा-कॉफीचं सेवन केल्यानं शरीरात प्रोटिनचं शोषण योग्य प्रमाणात होत नाही परिणामी कुपोषणाची समस्या निर्माण होते. शिवाय अकाली केस गळती, डोळ्यांच्या समस्या, कंबरदुखी, लठ्ठपणा अशा समस्या तसंच महिलांमध्ये कॅल्शिअमची कमतरता आणि पुरुषांना प्रोस्टेट कॅन्सरचा धोकाही होऊ शकतो.

Related image

1) रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने पित्त रस तयार होण्याच्या आणि काम करण्याच्या प्रक्रियेवर जास्त प्रभाव पडतो. या कारणाने मळमळ आणि घाबरल्यासारखंही वाटू शकतं.
2) एका रिसर्चनुसार सकाळी रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने नुकसान होते खासकरुन उन्हाळ्याच्या दिवसात कारण चहामध्ये कॅफेन आणि टॅनिन असते ज्यामुळे शरीरास उर्जा मिळते. पण काळ्या चहामध्ये दूध टाकल्यास त्यातील अँटीऑक्सिडंट्स नष्ट होतात.
3) रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने अल्सर आणि हायपर ऍसिडिटीचा धोका असतो. कारण रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने पोटाच्या आतील बाजूस जखम होण्याची शक्यताही वाढते. रिकाम्या पोटी दुधाचा चहा प्यायल्याने लवकर थकवा जाणवतो. तसेच मूड-स्विंगची समस्याही वाढू लागते.
4) चहामध्ये असिड ची मात्रा खूप प्रमाणात असते. यामुळे सकाळी सकाळी रिकाम्या पोटी चहा घेतल्याने पोटातील रसावर त्याचा परिणाम होतो आणि आपल्याला उलटीचा त्रास होतो.
5) चहामुळे हाडांचे होणारे नुकसान हे भविष्यकाळात निदर्शनास येणारे आणि दुर्लक्ष केल्यास त्याचे गंभीर परिणामही होऊ शकतात. चहामधील फ्लोराईड नावाचे खनिज हाडांसाठी एक मोठा धोका असू शकते.
6) पचन तंत्र कमजोर होण्यामागे सर्वात मोठे कारण आहे रिकाम्या पोटी गरम चहाचे सेवन. ही समस्या दररोज रिकाम्या पोटी चहा पिण्याने उद्भवते. तसेच रिकाम्या पोटी चहा पिण्याने आपली भूक प्रभावित होते किंवा भूक लागणे बंद होतं. अशाने आपण आवश्यक पोषणापासून वंचित राहता.
7) रात्री झोपल्यानंतर काही तास पाणी न प्यायल्यानं किंवा काही न खाल्ल्यानं शरीर डिहायड्रेट झालेलं असतं. त्यात सकाळी उठल्यावर सुरुवातीला चहा प्यायल्यानं डिहायड्रेशन अधिक वाढतं. डिहायड्रेशन जास्त झाल्यास मिनरल्स अनियंत्रित होतात , त्यामुळे स्नायूंमध्ये क्रँप्स येतात.
8) रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने पोटातील अग्नी आपोआपच मंदावतो. त्यामुळे येणारा पुढचा बराच वेळ भूक लागत नाही. त्यामुळे आपण पोषणापासून वंचित राहतो. शरीराचे योग्य पोषण न झाल्याने शरीराची प्रतिकारशक्ती कमी होते.
आपण आपल्या रोजच्या जीवनात जर अशा छोट्या छोटया गोष्टींचे नीट पालन केले तर आपण बऱ्याच आजारांना आपल्यापसून दूर ठेवू शकतो.
— संकेत रमेश प्रसादे 
Sanket
About Sanket 71 Articles
संकेत प्रसादे हे एक प्रसिद्ध लेखक, ब्लॉगर, प्रशिक्षक, समुपदेशक आणि युटूबर आहेत. त्यांची आतापर्यंत २ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. तसेच ते नवराष्ट्र ह्या दैनिकामध्ये मानसिक आणि शारीरिक आरोग्यासंबंधी लिखाण करतात. मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्याबद्दल ते आपल्या लिखाणांमधून तसेच कार्यक्रमांमधून लोकांमध्ये जनजागृती निर्माण करतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…