नवीन लेखन...

योग्यतेनुसार यश

उंचावून झेप, नको घेवू उडी खोल आहे दरी, पाय तुझा मोडी…१ अंदाज घे तूं,  खोलीचा प्रथम यश येई तुला,  तया मध्यें ठाम…२ अनुमान काढ,  आपल्या शक्तीचे झेपेल कां ते,  विचार युक्तीचे…३ निर्णय घ्यावेस,  सदा विचारांनी निराश न होई,  त्यामध्ये कुणी….४ जाणून घे तूं, स्वत:ची पात्रता यश असे पाठी,  ज्याची जी योग्यता…५ डॉ. भगवान नागापूरकर संपर्क – […]

भावनेस हसती विचार

भावनेच्या जावूनी आहारीं,  नुकसान करतात सारे, तर्कशुद्धता विसरून जाते,  अंगात भरूनी वेडे वारे ..१, भावनेची लाटच उठता,  मती होते एकदम गुंग, बरोबर वा चूक काय, जाण रहात नसते मग..२ आपले सारे खरे असावे,  हाच होत असे अट्टाहास, आपण केल्या कर्मावरच,  बसतो आपला विश्वास..३ इंद्रीय आणि भावना यांची,  जमुनी जात असतां जोडी तर्कशुद्ध विचारांत त्याला, राहत नसते […]

खरे सुख अंतरी

सुख हे मृगजळ,  फसविते सर्वांला खेळ चालतो त्याचा,  चकविणे मनाला …१, बाह्य वस्तूंचे सुख,  क्षणिक  असते, मोहून जाता सर्व,  लक्ष्य तेच वेधते…२, खरे सुख अंतरी,  परि शोधी बाहेरी, चुकीचा हा हिशोब,  निराशा करी…३, अंतरातील सुख, नितांत  असते एकाच अनुभवाने,  जग विसरविते…४ डॉ. भगवान नागापूरकर संपर्क – ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

‘आनंद ‘ भावना

ध्येय असावे तुमचे नेहमीं आनंद मिळवण्याकडे ‘आनंद ‘ हाचि ईश्वर असतो समजून घ्याहो हे कोडे   ।।१।। शरीर देई  ‘सुख ‘  तुम्हांला क्षणिक ते तर असती सुखाच्या पाठीशी छाया असते ‘दुःख ‘  तयाला संबोधती   ।।२।। सुखाबरोबर नाते असते सदैव अशाच दुःखाचे वेगळे त्यांना कुणी न करती जाणा तत्त्व हे जीवनाचे   ।।३।। ‘आनंद ‘ भावना असे एकटी नसे […]

आधार

वेलींना आधार होता, वृक्ष वाटला दणकट परि बुंधा ज्याचा किडूनी गेला, कोसळणार मग कधीतरी नष्ट करिल तरूवेलींना, धरणीवरती आडवा होता सौंदर्य दिले लताफूलांनी, सारे कांहीं विसरूनी जाता वेलींनो आणि झुडपानों, सोडूनी घ्या आधार पोकळ स्वतंत्रपणे तुम्ही जगण्या , स्वावलंबनाचे टाका पाऊल डॉ. भगवान नागापूरकर संपर्क – ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

सदैव जागृत रहा

झोप घ्या हो शांत, जागृत राहूनी तुम्ही, विचित्र वाटे ही रित, परि येई तुमचे कामी …१ विश्रांती लागत असते, गरज म्हणून शरिराला ती तर मिळत नसते, केव्हांही तुमच्या मनाला ..२ चंचलता हा स्वभाव, आहे आपल्या मनाचा, शांत करण्या मना, उपाय नसे झोपेचा..३ एकाच दिशेने धावूनी, मिळवते मन विश्रांती एकाग्र चित्त असणे, उपाय हाच त्यावरती…४ चित्त करूनी […]

ढोंगी साधू महाराज

सोडत नसतो केव्हाही,  निसर्ग आपुल्या मर्यादा, चमत्कार करीत नसतो, नियमित चालतो सदा   १ साधूबाबा महाराज    कित्येक आहेत ह्या जगती नांव घेवूनी प्रभूचे     चमत्कार दाखविती   २ अज्ञानाने भरलो आम्ही विश्वास वाटतो त्यांचा चमत्कार दाखविण्यामध्ये    हात नसतो प्रभूचा    ३ तो महान असूनी     क्षुल्लक त्यासी ह्या गोष्टी प्रेमभावना घेण्या   कशास पडेल कष्टी   ४ नष्ट केला ईश्वर धर्म, ह्या साऱ्या […]

भक्तांसाठी कष्ट भोगतो श्रीहरी

युगानू युगें उभा राही,   एका विटेवरी कष्ट भोगतो भक्तांसाठी   पांडुरंग श्रीहरी   ।।धृ।। आई वडिलांची सेवा पुंडलीक भक्तीचा ठेवा भक्तित होई तल्लीन जगास गेला विसरुन उभा करुनी तुजला,    गेला निघूनी चंद्रभागेतीरी   ।।१।। कष्ट भोगतो भक्तांसाठी    पांडुरंग श्रीहरी विषाचा  पेला मीरेनें प्राशन केला भजनांत गेली दंग होऊनी पचविले विष तूं घेऊनी दुधामधले विष शोषूनी,   दाह त्याचा सहन करी   […]

लोप पावू लागलेली स्त्रीलज्जा

खुरटून जाते फूलझाड, गर्द झाडीच्या वनांत, कोमजूनी चालली स्त्रीलज्जा, धावपळीच्या जीवनांत ….१, भावनेची नाहीं उमलली, फुले तिची केव्हांही, नाजुकतेचे गंध फेकूनी, पुलकित झाली नाही…२, कोमेजूनी गेल्या भावना, साऱ्या हताळल्या जावून, एकांतपणाची खरी ओढ, दिसेल मग ती कोठून…३, गर्दीच्या या ओघामध्यें, धक्के-बुक्के मिळत आसे, प्रेमभावना जातां उडूनी, ओलावा मग राहत नसे…४, स्त्रीलज्जेची भावना जी, युगानूयुगें जपली घराबाहेर […]

कवीची खंत

भटकतो आहे कवि   विचारांच्या सागरांत वाहात चालला आहे    व्यवहारी जगांत आधार नाही त्याला    पैशाच्या शक्तीचा कुचकामी ठरत आहे    प्रयत्न त्याचा जगण्याचा अर्धपोटी राहात असतो     भाकरीच्या अभावी लिहीत चालला आहे        काव्यरचना प्रभावी उदासपणे बघतो आहे     ” हाऊस फूलची ” पाटी लिहीली होती नाट्यगीते     त्यानेच सर्वासाठी टाळ्यांचा तो कडकडाट       बाहेर ऐकू येई उपाशी होते त्याचे पोट    खिन्नतेने निघून […]

1 5 6 7 8 9 14
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..