नवीन लेखन...

कृष्ण बाललीला

चकित झाले गोकूळवासी बघून बाललीला सांगा कोण आहे तरी कृष्ण ? विचारी यशोदेला   ।।१।। प्रासादातील मोदक खातां तोंड ते उघडले मुखामध्ये मोदक नसूनी ब्रह्मांड ते दिसले   ।।२।। उच्छाद मांडूनी कालीयाने पाणी केले दुषित मर्दन करण्यासाठीं त्याचे उडी टाकी डोहात   ।।३।। पूतना असूनी राक्षसिण स्तनांत होते विष स्तनपान करुनी त्यानें तीला केले कासाविस   ।।४।। खोड्या बघूनी यशोदेनें […]

ऋतूचे चक्र आणि मन

कडाक्याची थंडी, दात कुडकडुती, हात-पाय गार, काटे अंगी येती नकोसा वाटतो,  मजला हिवाळा, वाट मी बघतो,  येण्या तो उन्हाळा सुकूनची जाते,  हिरवे  रान शरिर राहते,  घाम निथळून लाही लाही होता,  त्रस्त होई जीव, शोधण्या  ढग,  मन घेई धाव थांबवितो कामे,  वादळी वारा, पर्जन्याचा मारा,  पडताती गारा पाणी चहूकडे,  वाटते सुकावे, वर्षा  जावूनी,  सुक्यात खेळावे आपल्या जे […]

जीवन म्हणती याला

त्याची ऐकूनी करूण कहाणी,  डोळे भरून आले पाणी हृदय येता उंचबळूनी,  निराश झाले मन  ।।१।। आघात होता त्याच्या जीवनी,  तो तर नव्हता माझा कुणी तरी का आले प्रेम दाटूनी,  उमजेना काही ।।२।। दु:ख दुजाचे समोर आले,  मनास ज्याने कंपीत केले दोन जीवांच्या हृदयामधले,  अदृष्य हे धागे ।।३।। मानव धर्म एक बिजाचा,  वाढत गेला गुंता त्याचा ओढत […]

सुखाचे मृगजळ

धांवत असे मन आमचे,  शोधण्या नेहमीं सुखाला सुख तर आहे मृगजळ,  फसवित राही सर्वाला…१ मृगजळाचे  धावूनी पाठी,  निराशा हाती येत असे, वेडी आशा मनीं बाळगुनी,  सुखासाठी तडफडत असे…२, आपल्या हाती नसेल तेथें, सुख आम्हा भासत असे जवळ जातां प्रयत्न करूनी,  सुख नसूनी दुःखची भासे…३, खरे सुख कशांत बघतां,  तें तुमच्या मनींच वसत बाह्य जगी शोधत असतां  […]

सुखाची मोहमाया

तप्त लोखंडात,  लपली ती आग दिसे लाल लाल,  जाळी सर्व भाग…१, सुंदर फूलात,  सुंगध तो छान अवती भवती काटे,  ते कठीण…२, विजेची ती तार,  प्रकाशी दिव्याला, झटका तो देई,  स्पर्श होता तिला..३, सुखाच्या पाठीशीं, असे दुःख छाया न दिसे ती आम्हा,  असे मोह माया…४ डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

सुखाचा डब्बा

जगातील वस्तू, वाटे आकर्षक देह सुख देण्या, समजे त्या ठिक…१ प्रत्येक गोष्टीला,  डब्याचा आकार सुखाचे वेष्ठन, ते चमकदार…२ चमक बेगडी,  फसवी सर्वाला काय डब्यामध्ये,  कळेना कुणाला…३ झाकण उघडा,  दुःख दिसे आंत लपून बसले,  प्रत्येक गोष्टीत…४ हात लावताच,  दुःख हाती येई भासलेले सुख,  नष्ट होत जाई…५ डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

‘ तन्मयतेत’ आनंद – प्रभू

सतत गुंतलो आहो सारे शोध घेण्यास त्या ‘आनंदाला’ युगानूयुगे प्रयत्न होतो मिळवण्यासाठींच प्रभूला…१ बाह्य जगाचे सुख आगळे लागले सारे त्याच्या पाठीं ‘देह सुख’ अंतीम वाटे, खरा ‘आनंद’ देण्यापोटी…२ ‘ज्ञानामध्ये’ भरला  ‘आनंद’ समजूत झाली ही कांहींना लेखक, कवी, साहीत्यिक हे पाठ त्याची कांहीं सोडीना…३, साधू संत हे थोर महात्मे आनंद शोधूती ‘विश्रमांत’ ‘ध्यान’  लावून एक मनानें शांत […]

खोडकर कृष्ण

किती रे खोड्या करिशी कृष्णा यशोदा तर गेली थकूनी..।।धृ।। झोपू दे रे तिजला आतां,  ती तर गेली खूप दमूनी दही दुधांनी भांडी भरली, काही प्याली, काही वाटली, काही तर ती उपडी झाली, पिऊनी सांडूनीच सगळे,  नासलेस दही दूध लोणी…१, किती रे खोड्या करशी कृष्णा, यशोदा तर गेली थकूनी गणरायाचे पूजन करितां मग्न झाली यशोदा माता लक्ष्य […]

यशासाठी प्रयत्नाची दिशा

प्रयत्न करितां जीव तोडून,  जेव्हां यश तुम्हा न येई सोडून देता त्याला तुम्हीं,  नशिबास दोष देत राही..१ दोष नका देवू नशिबाला,  मार्ग निवडले तुम्ही चुकीचे का न मिळाले यश तुम्हां,   मूल्यमापन करा प्रयत्नाचे…२ चूक दिशेने प्रयत्न होतां,  वाहून जातो सदा आपण यश जेव्हा मिळत नसते,  निराश होवून जाते मन…३ पुनः पुन्हा प्रयत्न करूनी,  यश न आले […]

विधी लिखीत

विधी लिखीत असे अटळ   त्याच प्रमाणे होई निश्चित कोण बदले मग काळाला    प्रभूचा सहभाग असे ज्यांत  ।।१।। राम राज्याभिषेक समयीं   असता सर्वजण आनंदी राज्य सोडूनी वनी जाईल   जाणले नव्हते कुणी कधीं   ।।२।। नष्ट करुनी सर्प कुळाला   तक्षकावरही घात पडे परिक्षिताचे प्रयत्न सारे   फिके पडती नियती पुढे   ।।३।। आकाशवाणीचे शब्द ऐकतां   हादरुनी गेला कंस मनीं काळाने त्या […]

1 4 5 6 7 8 14
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..