नवीन लेखन...

सुपर कॉम्प्युटर (महासंगणक)

१९२९ मध्ये द न्यूयॉर्क वर्ल्डने सुपर कॉम्प्युटर हा शब्द पहिल्यांदा आयबीएमच्या टॅब्युलेटर्ससाठी वापरला होता. त्यानंतर १९६०च्या सुमारास कंट्रोल डेटा कॉर्पोरेशनमध्ये काम करताना सेमूर क्रे यांनी पहिला महासंगणक तयार केला. […]

स्टेल्थ हेलिकॉप्टर

स्टेल्थ याचा अर्थ एखादे साधन शत्रूला दिसू न देता त्याच्या मदतीने गुप्तपणे कारवाई घडवून आणणे. अमेरिकेने पाकिस्तानातील अबोटाबाद येथे अल काईदाचा प्रमुख ओसामा बिन लादेन याला ठार करतानाच्या कारवाईत स्टेल्थ हेलिकॉप्टर वापरले होते. […]

एलटीटीडी तंत्रज्ञान

सागरी जलाचे रूपांतर पेयजलात करून त्याचा वापर पिण्यासाठी, तसेच ऊर्जानिर्मिती प्रकल्पात करण्याचे तंत्रज्ञान आता नवीन राहिलेले नाही. समुद्राचे पाणी पाईपने आणणे त्यावर प्रक्रिया करणे व नंतर ते हव्या त्या ठिकाणी पुरवणे ही खर्चिक बाब मानली जाते, असे असले तरी चेन्नईच्या सागरी विज्ञान संशोधन संस्थेने या तंत्रज्ञानात बरीच प्रगती केली आहे. […]

किरणोत्सर्ग

जपानमधील फुकुशिमा येथे दाईची अणुप्रकल्पात भूकंप व सुनामीमुळे अणुभट्टीचे मेल्टडाऊन झाल्याने किरणोत्सर्ग तेथील पर्यावरणात पसरत आहे. कुठल्याही अणुऊर्जा प्रकल्पात अस्थिर अणू असलेली किरणोत्सारी समस्थानिके वापरली जात असतात. त्यातून आयनांच्या स्वरूपात जे सूक्ष्म कण बाहेर पडत असतात त्यालाच किरणोत्सर्ग (रेडिएशन) असे म्हणतात. […]

अणुभट्टी (न्यूक्लिअर रिअॅक्टर)

इंग्लंडमधील कुम्ब्रिया येथे १९५८ मध्ये काल्डर हॉल भागात पहिला अणुशक्ती प्रकल्प तयार झाला, तेव्हापासून मानवाने अणूपासून फार मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्माण केली आहे. काही अणू हे स्थिर असतात, पण काही अस्थिर अ असतात. त्यांना किरणोत्सारी समस्थानिके म्हणतात. […]

अश्रुधूर (टीअर गॅस)

दिल्लीच्या रामलीला मैदानावर योगगुरू रामदेवबाबा यांचे आंदोलन उधळून लावण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला, त्याला टीअर गॅस असेही म्हणतात. दंगल नियंत्रणाच्या वेळी जमावाला पांगवण्यासाठीही अश्रुधुराचा वापर केला जातो.अश्रुधुराला लॅक्रिमेटर असेही म्हणतात. […]

सिस्मोग्राफ (भूकंपमापक)

भूकंप होत असताना ज्या लहरी जमिनीखाली निर्माण होतात त्या पसरत जातात तेव्हा त्यांची नोंद आरेखन किंवा आलेखाच्या माध्यमातून घेतली जाते. हे काम ज्या यंत्राच्या मदतीने केले जाते त्याला सिस्मोग्राफ असे म्हणतात. […]

द्विनेत्री (बायनॉक्युलर्स)

प्रकाशशास्त्र म्हणजे ऑप्टिक्समध्ये कॅमेरा, दुर्बीण यांच्याखालोखाल सर्वांत लोकप्रिय उपकरण म्हणजे द्विनेत्री त्यालाच बायनॉक्युलर असे म्हणतात. बहुतांश लोक अशा बायनॉक्युलरचा वापर क्रिकेट सामने पाहताना किंवा पक्षी निरीक्षणसाठी करीत असतात. एका नेत्रिकेची दुर्बीण जे दाखवते त्यापेक्षा अधिक दोन नेत्रिका असलेल्या बायनॉक्युलरमुळे आपल्याला दिसत असते. […]

बॅरोमीटर

हवामान अंदाज वर्तवताना हवेच्या दाबावर वातावरणातील बदल काही प्रमाणात अवलंबून असतात जर हवेचा दाब जास्त असेल तर सगळे काही सुरळीत असते पणदाब कमी होत गेला, की वातावरणात ओलसरपणा येतो. […]

स्पीड गन

रस्त्यांवर अनेक अपघात हे वाहनांच्या अतिवेगाने होत असतात, त्यामुळे अशा वाहनचालकांना वठणीवर आणण्यासाठी खरे तर स्पीड गन लावणे हा चांगला उपाय आहे. […]

1 2 3 4 5 11
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..