नवीन लेखन...

सदैव नामस्मरण

प्रभूनाम मुखीं होते रामतिर्थांच्या सदा  । ऐकू आले तेच निद्रेत असता एकदा  ।। चमत्कार दिसून आला एके दिवशी  । राम नामाचे ध्वनी उमटती देहापाशी  ।। विज्ञानाने उकल केली या घटनेची  । खात्री करिता सत्यता पटली याची  ।। चेतना मिळता स्वर यंत्रात ध्वनी उमटे  । त्याच ध्वनीच्या विद्युत लहरींनी शब्द फुटे  ।। शब्दांचे वलय फिरती देहाभोवती  । […]

संकोचलेले मन

मध्य रात्र झाली होती,  सारे होते शांत  । रस्त्यावरती तुरळक व्यक्ती,  वाटला एकांत  ।। एक गाडी मंदिरीं थांबली,  त्याच शांत वेळीं  । सूटामधली व्यक्ती कुणी एक, आली दारा जवळी  ।। सारे होते नशिबात त्याच्या,  धन संपत्तीचे सुख  । दिवस घालवी मग्न राहूनी,  कार्ये पुढती अनेक  ।। तर्कज्ञान  तीव्र असूनी,  आगळा बाह्य चेहरा  । परि अंर्तमन सांगत […]

कळसूत्री बाहुल्या

नाचत होत्या दोन बाहुल्या, इकडून तिकडे  । टकमक पाहात हांसत  होत्या,  चोहीकडे  ।। झीम्मा खेळे, फुगडी खेळे,  गरगर फिरती  । हातवारे करुन त्या,  माना डोलावती  ।। जवळ येवून गुजगोष्टी,  सांगे एकमेकींना  । सासू नणंद यांच्या,  कुलंगड्या काढतांना  ।। सुख दुःखाच्या कथा,  सांगितल्या त्यांनीं  । कांहीतरी करुन दाखवूं, वदल्या दोघीजणी  ।। अज्ञानी गरीब बिचाऱ्या,  जेंव्हा संकल्प करती  […]

श्री सरस्वतीची तसवीर

जीवनांतले चित्र पालटूनी,  रंग ते बदलले जनी जनार्दन ठरविले,  सारे काय मिळविले  ।१। सुंदर तसबीर एक आणली,  देवी श्री लक्ष्मीची श्रद्धेचे भाव गुंतविले,  पूजा करूनी तिची  ।२। शिक्षण घेवूनी ज्ञान मिळविले,  कष्टानें सारे शरीर होते चैतन्यमय,  आणि धडपडणारे  ।३। रंग बधितले जीवनांतील,  विविध छटांचे सजविण्यास लागते त्या छटांना,  बळ संपत्तीचे  ।४। ज्ञान आणि प्रयत्न जेव्हां,  एक […]

आमचे खेळ

या मित्रांनो सारे या,    सर्व मिळूनी खेळू या   ।।धृ।। खेळ आमच्या देशाचे       गरिबांसाठी सोईचे  । मैदान नको मोठे ते         वस्तूही अल्प लागते  ।।  खेळांना त्या    समजून घ्या– १—  या मित्रांनो सारे या,  हुतुतूचा खेळ बघा       दोन गट, छोटी जागा  । स्पर्श रेषा ओलांडूनी      ह्तुतू म्हणती तोंडानी  ।। एकाच दमात   भिडू मारू या –२— या मित्रांनो सारे […]

शुद्धीसाठी गुरू

कितीक वेळा धुतला कोळसा,  रंग न बदले त्याचा  । उगाळता झिजून जाई,  परि काळेपणा कायमचा  ।। भट्टीत घालून त्यास जाळता,  घेई रंग लाल कसा  । शुभ्रपणा हा दिसून येतो,  राही न जेंव्हा कोळसा  ।। मलीनता ही मनामधली,  खोल  रूजली असे  । विचारांतील तर्कज्ञान ,  शुद्धीसाठी पुरे नसे  ।। गुरू लागतो अग्नी सारखा,  चित्त शुद्धी करिता  । […]

जीवन एक “जाते”

जात्याच्या पात्यामध्ये, भरडला जाई दाणा  । दोन चाकांत येईल,  मोडेल त्याचा कणा  ।। जीवन मृत्यूची चाके,  सतत फिरत राही  । येई जो मध्ये त्याच्या,  मागे न उरेल काही  ।। मध्यभागी राही स्थिर,  आंस त्यास म्हणती  । वरचे चाक फिरे,  त्याच्या भोवती  ।। आंसाजवळील दाणा,  दूर तो चाकापासूनी  । परिणाम चाकाचा तो होईल,  मग कोठूनी  ।। जन्म […]

‘शक्ती’ हेच ईश्वरी रुप

तप्त सळई स्पर्ष करीतां ,   चटका देई शरीराला  । सुप्त अशी औष्णिक शक्ति,   आस्तित्व दाखवी त्या वेळेला  ।। वीजा चमकूनी गर्जती मेघ,   लख्ख उजेड सारते काळोख  । प्रकाश नि ध्वनीच्या लहरी,   आस्तित्वाची दाखवी झलक  ।। साधी असे तार तांब्याची,   झटका देई विद्युत असतां  । विद्युत शक्तीचा परिणाम,  जाणवी देहा प्रवेश करतां  ।। झाडावरले पडता फळ,  भूमी […]

देह ईश्वरी रूप

स्नान करूनी निर्मळ मनीं, दर्पणापुढे  येऊन बसला  । जटा साऱ्या एकत्र बांधूनी, भस्म लाविले सर्वांगाला  ।। ओंकाराचा शब्द कोरला, चंदन लावूनी भाळावरती  । रूद्राक्षाच्या माळा बांधल्या, गळा हात नि शिरावरती  ।। वेळेचे भान विसरूनी, तन्मय झाला रूप रंगविण्या  । प्रभू नाम घेत मुखानें, नयन आतूर छबी टिपण्यां  ।। पवित्र आणि मंगलमय, वाटत होते स्वरूप बघूनी  । […]

देह – एक महान वस्ती

सात कोटीची वस्ती असूनी, सुंदर वसले शहर एक । प्रत्येक जण  स्वतंत्र असूनी, कार्ये चालती तेथे अनेक ।। सुसंगता शिस्तबद्ध साह्य करिती एकमेकांना । शत्रूची चाहूल येतां, परतूनी लाविती त्या घटना ।। अप्रतिम  शहर असूनी, नाव तयाचे असे  ‘पुरूष’ । ‘पुरू’ म्हणजेच गाव असूनी, मालक त्याचा आहे ‘ईश ।। अशीच अगणित शहरे, या अथांग विश्वाच्या शरीरी […]

1 3 4 5 6 7 12
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..