नवीन लेखन...

ओडीसा राज्यातून इटालीयन पर्यटकाचे अपहरण (कथा ७)

ही अशी होती जाहिरात:- ‘तुम्हाला ताज महाल पेक्षा दुसरा भारत अनुभवायचा असेल,तर आदिवासी  वस्ती पर्यंत पोहचा,जे अजूनही धनुष्यबाण व इतर प्राचीन आयुधे वापरतात, फोटो काढण्यांसं तयार होत नाहीत.घनदाट जंगलात जंगली श्वापदा बरोबर मुकाबला करतात,हे पाहण्यासाठी भरपूर पायी प्रवास करावा लागेल,प्रवास सुरक्षित असेल याची हमी,तर  जरूर या भेटीला ओडीसा राज्यात. ही जाहिरात एक धाडसी इटालीयन प्रवासी Paulo […]

नक्षलींच्या दहशती मुळे झालेले निर्वासित (कथा ६)

गडचिरोली जिल्ह्यातील अनेक खेड्यातून ६० एक कुटुंबाना नक्षलवादींनी घराबाहेर काढून देशोधडीला लावलेले आहे. त्यांचे परतीचे मार्ग कायमचे बंद करून टाकलेले आहेत. सधन कुटुंबातील मंडळी साधे रोजी पगार मिळणारे कामगार म्हणून जीवन कंठीत आहेत. ६७ वर्षाचे मन्साराम कोले तावातावात आपली कथा सांगत होते “ माझा मुलगा पोलीसात भरती झाला आणी आमच्या घराचे वासेच फिरले.रोज नक्षलवादी वेळी अवेळी […]

एक अभागी – नक्षलवादी दहशतीची बळी (कथा ५)

शाळेत मुळाक्षर,शिकणे, १०० पर्यंत आकडे मोजणे, प्रादेशिक कोया भाषेत हे सर्व लिहिता येणे, ही नक्षलवादी जनता सरकारची सर्व मुलामुलींना शिक्षण देण्याची पद्धत, इयत्ता वगैरेची गरज नाही, अबुजमाड भागात अशा शाळा आहेत. एवढे जुजबी शिक्षण घेतले की यातील काही मुले खेड्यातील आपली राहती चंद्रमोळी झोपडी सोडून जंगलातील नक्षलवादिंच्या तंबूत राहण्यास येतात व तेच त्यांचे कायमचे आयुष्य जोपर्यंत […]

गोंड आदिवासी समाजातील परंपरेचे बळी – कुरमाघर (कथा ४)

वास्तविक निसर्गपूजक माडियागोंड जातीच्या आदिवासीत मातृसत्ताक पद्धत असून  घर चालविण्यात स्त्रीचा मोठा वाट आहे .ती दिवसभर घर व शेतीकामात गढलेली असते,अशा स्त्रीला मासिक पाळीच्या वेळी मात्र कुरमाघरात राहते घर सोडून राहण्यास जावेच लागते. […]

मृत्यु नक्षलवादींचा का गरीब निष्पाप आदिवासींचा ? (कथा ३)

बस्तर व बिजापूर हे छत्तीसगड मधील नक्षल चळवळीचे महत्वाचे जिल्हे, बिजापूर जिल्ह्यातील सारकेकुडा, कोटागुडाव राजपेटा या तीन खेड्यात रात्री गावकीची सभा चालू असताना SRP नी कोणतीही सूचना न देता बेछुट गोळीबार केला, पळापळ झाली, सभा उधळली दुसर दिवशी चंद्रमोळ्या झोपडयां समोर पुरुष व मुलांची प्रेते कापडात गुंडाळलेली, हताश होऊन कपाळाला हात लाऊन बसलेली गावकरी मंडळी त्यात […]

काळोखी गुहेत (कथा २)

ओडीसा राज्यातील तेंबुली नावाचे खेडे जेथे सामान्य जीवन जगण्याकरता लागणाऱ्या सर्वच वस्तूंची वांनगा आहे. अगदी आशा सुद्धा लुप्त पावलेली आहे. खेड्याच्या एका बाजूस नक्षलवादीचा तळ त्यामुळे सरकारी कोणतीच यंत्रणा अस्तिवात नाही, खेड्यातील एक तरुण आदिवासी बाई आपल्या ३ वर्षाच्या छकुलीला कडेवर घेऊन पाणी आणण्या साठी एका ओढ्याकडे चालत निघाली होती. प्रेमाने तिचे नाव ठेवले होते प्रीती […]

झुंडशाही (कथा नंबर १)

बस्तर मधील सुरगुजा जिल्हा जंगल, नद्या. दर्याने वेढलेला, खळाळणारे असंख्य नाले, रस्त्याला रस्ता म्हणायचे तरी कसे?काही वेळा घनदाट जंगलात नक्षलवादी वस्तीस येत, आदिवासींकडून हक्काने शिधा गोळा करत, तसे पाहता हा प्रदेश इतका मागासलेला, आदिवासींचे विखुरलेले पाडे, थोडीपार शेती, गुजराण तरी  कशी करणार? अर्ध पोटी जीवन चालू होते इतकेच. कारवा खेडे म्हणजे पाच पंचवीस चंद्रमोळी झोपड्या,काहींच्याच पडवीत […]

बंदुकीच्या छायेतील निरागस बाल्य

येथील डॉक्टरना नक्षलवादी वेठीस धरतात,त्यांना जंगलातील आपल्या तळावर जबरदस्तीने नेतात, तेथे उपचार तर करायचेच पण त्या शिवाय हॉस्पिटल मध्ये असलेला औषधसाठा घेऊन जातात. सरकार या कारणामुळे डॉक्टरसं वर कारवाई करतात. […]

नक्षलवादिना आव्हान देणारी पोलीस यंत्रणा :- ( GREY HOUND FORCE)

घनघोर पावसात सुकमा जिल्ह्यातील घनदाट जंगलात निर्णायक विजय मिळविण्याचे जिकरीचे कार्य केंद्रीय सुरक्षा दलाच्या जवानांनी जूलै २०१८ करून ८६ नक्षलीना ठार मारून निर्णायक यश मिळविले आहे.देशाच्या इतर भागात २०० नक्षली मारले गेले  आहेत. […]

बस्तर ( छत्तीसगड ) नक्षलवाद

अबुजमाड भागात सरकारी यंत्रणाचे अस्तित्व नाहीच.कोणताही रस्ता वा पूल बांधल्यास ते सुरुंग लावून उडवले जातात.माओवादी आपल्या जनता सरकार मार्फत आदिवासी मुलांकरता शाळा चालवतात,तेथे शिक्षक नाहीत मुलांना जेमतेम अक्षर ओळख आणी माओ प्रेमाची गाणी शिकवली जातात. […]

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..