नवीन लेखन...

भारतीय स्वातंत्र्य आणि स्वदेशी 

स्वातंत्र्याचा लढा व स्वदेशी चळवळ हा विषय समजून घेताना इ.स. १८५० च्या पूर्वी देखील जे स्थानिक उठाव झाले त्याचीही पार्श्वभूमी समजून घ्यावी लागेल. भारतात ज्या ज्या भागात इंग्रजांची सत्ता स्थापन झाली, तेथील लोकांना इंग्रज शासनाचे दुष्परिणाम भोगावे लागल्यामुळे त्यांनी इंग्रजांच्या विरोधात उठाव केले. यात शेतकरी, कारागीर, आदिवासी, वन्य जमाती, साधू, फकीर, सैनिक अशा विविध गटांनी हे उठाव केल्याचे दिसून येते. […]

स्वदेशी संकल्पना

आपल्या स्वातंत्र्य चळवळीच्या कामात स्वराज्य आणि स्वदेशी हे दोन मंत्र महत्त्वाचे होते. या दोहोंचा परस्परांशी संबंध होता व असे म्हटले आहे की, स्वदेशीशिवाय स्वराज्य अपूर्ण आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात स्वदेशीचा अर्थ वेगळा होता आणि स्वातंत्र्योत्तर काळात त्याचा अर्थ वेगळा झाला. स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी स्वराज्य आणि स्वदेशी आवश्यक आहेत आणि स्वातंत्र्यानंतर आर्थिक स्वावलंबनासाठी स्वदेशी आवश्यक आहे असा विचार मांडण्यात आला. […]

स्वदेशी विचार आणि शिक्षण 

हल्लीच्या शिक्षण पद्धतीत होत असलेली देशी भाषांची अवहेलना, नीती व धर्मशिक्षणाचा अभाव, उद्योगधंद्यांची नव्या तऱ्हेची माहिती मिळण्याचा असंभव, कोणत्याही प्रकारे विद्येची खरी अभिरुची उत्पन्न होण्यास जी साधने लागतात त्यांचा अभाव आणि देशासंबंधाने एक प्रकारचा जो योग्य अभिमान उत्पन्न व्हावयास पाहिजे तो उत्पन्न होणे तर दूरच, पण तो उत्पन्न न होण्याबाबत घेतलेली खबरदारी हे हल्लीच्या शिक्षण पद्धतीतील ठळक दोष होत. […]

अन्न हे पूर्णब्रह्म 

जगातल्या उपलब्ध असणाऱ्या सर्व साहित्यामध्ये, अन्नासंबंधी अथवा भोजनासंबंधीचे सर्वात प्राचीन असे उल्लेख आढळतात ते भारतीय ग्रंथांमध्ये. ऋग्वेद हा जगातला सर्वात प्राचीन ग्रंथ मानला जातो. या ऋग्वेदामध्ये परिपूर्ण आहारासंबंधी अनेक सूक्त आहेत. […]

भारतीय पुराणे आणि स्वदेशी कल्पना

काही दिवसांपूर्वी गौरी गणपतीसाठी आईकडे गेले होते. या वर्षी, मी गौरीसाठी माहेरी आल्याने आईला खूपच आनंद झाला आणि एरवी ती जे शॉर्टकटमध्ये करत असे ते आता दोघी होतो म्हणून आम्ही दोघींनी मिळून सगळं अगदी साग्रसंगीत केले. आईकडे गौरी येते ती पाणवठ्यावरून. माझी आजी पूर्वी असा कलश नदीवरून भरून आणत असे. […]

‘स्व’चा द्वेष करणारे नियोजन

स्वातंत्र्यप्राप्तीसाठी झालेल्या लढ्यात स्वदेशीचा विचार प्रेरक होता. पण तो विचार स्वातंत्र्याच्या लढ्यात जेवढा महत्त्वाचा मानला गेला तेवढाच तो स्वातंत्र्यानंतरच्या नियोजनात त्याज्य आणि तिरस्करणीय ठरवला गेला. त्याचा परिणाम आपल्या आर्थिक स्थितीवर तर झालाच पण आपल्या सांस्कृतिक जीवनावरही झाला. […]

गुहा ते घर

या गाण्याच्या ओळी अनेकांच्या मनाला भावणाऱ्या आहेत. घर कसेही का असेना, ती झोपडी असो वा बंगला, की अजून काही…; त्या घरात वास्तव्यास असणाऱ्या माणसासाठी ते घर विशेषच असते. कोणतेही घर असो, ते अनेक गोष्टींचा निश्चितच एक संचय असते. त्यात भाव-भावना, इच्छा-आकांक्षा, महत्त्वाकांक्षा या सारख्या संमिश्र भावना आणि क्रिया प्रतिक्रियांचा समावेश होतो. […]

कापसापासून सुतापर्यंत

अन्न वस्त्र आणि निवारा, या मानवाच्या मूलभूत गरजांपैकी अन्न सर्व सजीवांना जीवन जगण्यासाठी लागते आणि इतर सजीव प्राणी आपल्या अन्नाची सोय करतातच, शिवाय स्वतःला निवाराही शोधतात. पण वस्त्र अथवा कपडा हे मानवीपणाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. […]

भारतीय लोकजीवन आणि कृषी परंपरा

मराठवाड्याच्या सीमेवरील उन्हाळ्यामध्ये तापणारा जिल्हा म्हणजे अहमदनगर येथे मला २०१६ साली भर उन्हाळ्यात जाण्याचा योग आला. ठिकाण होते, ‘कोंबळणे’ गाव, तालुका अकोला आणि शेत होते राहीबाई सोमा पोपेरे यांचे. नगरच्या दुष्काळी भागातील तो हिरवाकंच पट्टा म्हणजे भारतीय कृषी संस्कृतीचे एक विसाव्या शतकामधील खरेखुरे दर्शनच. […]

1 2 3 4
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..