नवीन लेखन...

नवलभूमीचा यक्ष… नरेंद्र बल्लाळ

खरं म्हणजे ते अभिनयाच्या क्षेत्रात आले असते तर त्यांनी धमाल उडवली असती. सावळाच पण देखणा चेहरा, गांभीर्य आणि स्मितहास्य याचं त्या चेहऱ्यावर विलसणारं मिस्कील अजब मिश्रण, संपूर्ण व्यक्तिमत्त्वात असलेली ऋजु उत्कटता आणि ती पेलण्याचं सामर्थ्य असलेला आंतरिक कणखरपणा. […]

मराठमोळ्या फार्सचे जनक: श्याम फडके

त्यांच्या फार्सचे त्या काळी व्यावसायिक रंगभूमीवर खूप प्रयोग झाले आणि हौशी रंगभूमीवर त्याहीपेक्षा कितीतरी जास्त प्रयोग झाले. हौशी नटमंडळींना सुद्धा त्यांच्या सुटसुटीत फार्सचे असंख्य प्रयोग करावेसे वाटले. महाराष्ट्रातल्या छोट्या-छोट्या गावात आणि उत्सवात गल्लीबोळातही श्याम फडक्यांची नाटके होत होती. […]

चंदा रणदिवे – लक्षाधीश रंगकर्मी

चंदा रणदिवे एकांकिका व नाटके ज्या काळात बसवत होते, तेव्हा नायिका म्हणून भूमिका करण्यास मुली मिळणे कठीण होते. परंतु चंदा यांना ही अडचण कधीच आली नाही. कारण त्यांचे चोख व निखळ चारित्र्य! त्यांच्याविषयी सर्वांना गाढ विश्वास होता. चंदा दिवेकर, मीना प्रधान, मंगल फणसे, शालिनी राजे, सुनंदा कर्णिक, लता सावंत, उषा गुप्ते. अशा असंख्य हिरॉईन्स चंदा यांच्या नाटकातून घडल्या. […]

निखळ आनंदाचा झरा ‘बालनाट्य’

‘चुलबुल पांडा’, ‘गाढवाचा दवाखाना’, ‘जम्बो ससा’, ‘वाघोबाची दिवाळी’, ‘रोबो आणि राक्षस’ या बालनाट्यांनी मुलांना एक वेगळाच फिल दिला. उपहास, नक्कल, कोट्या, फार्स, प्रासंगिक, शाद्बिक विनोद, मेलोड्रामा, ब्लॅक कॉमेडी-हे सगळे काही त्यांना इन्स्टंट कळते आणि त्यांची दादही वेगवान असते. मुले नाटकात काम करताना स्वत खूप हसतात. स्लॅपस्टिक कॉमेडी त्यांना खूप आवडते. दुःख हसण्यावरी नेणे म्हणजे काय हे बालनाट्य करताना कळले. […]

नाट्याभिमानी शशी जोशी

व्यावसायिक रंगभूमीवर त्यांना मिळालेली पहिली नवी कोरी भूमिका होती 1974 साली रंगभूमीवर आलेल्या श्याम फडके लिखित आणि राम मुंगी दिग्दर्शित ‘बायको उडाली भुर्रर्र…’ या नाटकातील. धोपेश्वरकर ही विनोदी व्यक्तिरेखा शशी जोशींनी आपल्या ढंगात अशी फर्मास सादर केली की, त्यांना प्रेक्षक आणि समीक्षकांची भरभरून दाद मिळाली. या नाटकात त्यांना ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे यांच्याबरोबर एकच प्रसंग होता, पण त्यात ते धम्माल उडवायचे. मग व्यावसायिक रंगभूमीवर एकामागून एक नाटके मिळत गेली […]

नाटककार स. पां. जोशी

1950 साली सानेगुरुजींच्या निधनानंतर, सानेगुरुजी स्मारकाच्या हालचाली सुरू झाल्या. त्यावेळी सपांमधील नाटककार जागा झाला. गुरुजींच्या ‘आंतरभारती’ संकल्पनेवर आधारित ‘जीवनकला’ या सपांनी लिहिलेल्या नाटकाचा प्रथम प्रयोग डोंबिवलीच्या स. पां. जोशी विद्यालयाच्या प्रांगणात 9 जानेवारी 1951 रोजी झाला. याच नाटकाचा दुसरा प्रयोग 11 फेब्रुवारी 1951 रोजी झाला. त्यावेळी ‘नवशक्तिकार’ प्रभाकर पाध्ये यांच्या हस्ते नाटकाच्या पुस्तकाचे प्रकाशन झाले. या नाटकास आचार्य अत्र्यांची प्रस्तावना लाभली होती. शं. दि. डोंगरे कृत हिंदी अनुवादाचे प्रकाशन ऑक्टोबर 1951 मध्ये झाले. […]

संगीतभूषण पं. राम मराठे

रामभाऊंच्या आक्रमक आणि तडफदार गायकीला ‘झंझावात’ हाच शब्द योग्य ठरेल. आयुष्याच्या अखेरपर्यंत पांढरी चार आणि प्रसंगी काळी तीन पट्टीमध्ये रात्री 9 ते पहाटे 4 पर्यंत, विलक्षण ताकदीने आणि दमसासाने गायची अद्भुत क्षमता रामभाऊंकडे होती. या सादरीकरणात कधी बालगंधर्व आणि मास्टर कृष्णरावांची लडिवाळ गायकी, कधी नोम तोम युक्त आलापी आणि लयदार तिहाया घेणारी आग्रा गायकी, कधी लयदार आणि बुद्धिनिष्ठ रंजक ग्वाल्हेर गायकी अशी चतुरस्र गायकी रामभाऊ श्रोत्यांपुढे अत्यंत सहज ठेवून थक्क करायचे. […]

नाट्य तपस्वी मामा पेंडसे

१९२९ ते १९६९ अशी सलग ४० वर्षे मामांची रंगयात्रा व्यावसायिक रंगभूमीवर अव्याहत सुरू होती. या यात्रेमध्ये ‘आग्र्याहून सुटका’, ‘बेबंदशाही’, ‘तोतयाचे बंड’, ‘सवाई माधवरावाचा मृत्यु’, ‘भाऊबंदकी’, ‘दुरितांचे तिमिर जावो’, ‘खडाष्टक’, ‘एक होता म्हातारा’, ‘पंडितराज जगन्नाथ’, ‘स्वामिनी’, ‘सन्यस्त खङ्ग’, ‘देव नाही देव्हाऱयात’, ‘सत्तेचे गुलाम’, ‘स्वर जुळता गीत तुटे’, ‘आंधळ्यांची शाळा’, ‘लोकांचा राजा’, ‘कुलवधू’, ‘महापूर’, ‘नाटककाराच्या शोधात सहा पात्रे’ इत्यादी पन्नासएक नाटकांमधून मामांनी आपल्या लक्षवेधी अभिनयाचे दर्शन प्रेक्षकांना घडवले. […]

1 2 3 4
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..