नवीन लेखन...

स्वामी विवेकानंद विचारदर्शन

संघ कार्याचे स्वरुप बघता असे लक्षात येते की, स्वामी विवेकानंदाच्या कल्पनेचे मूर्तस्वरुप म्हणजेच संघकार्य, आज दहशतवाद, धर्मांतरण, भोगवादी संस्कृती इत्यादी आसूरी प्रवृत्ती चहुबाजूंनी हिंदु समाजावर आक्रमण करत आहेत. त्यापासुन समाजाचे रक्षण करणे हेच आजच्या परिस्थितीत धर्म कार्य आहे. यासाठीची पूर्व अट अशी आहे की या देशातील हिंदु समाज संस्कारीत होऊन संघटीत होण्याची गरज आहे. अशा व्यक्तींचा संघटीत समाज निर्माण करणे हेच श्रेष्ठ कार्य आहे. आणि हाच विवेकानंदांच्या जीवनाचा संदेश आहे.


स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1863 ला झाला. विवेकानंदांचे मूळचे नांव नरेंद्रनाथ दत्त असे होते. बंगालचे रहिवासी होते. स्वामी रामकृष्ण परमहंस यांचे ते एकनिष्ठ शिष्य होते. रामकृष्णांचा संदेश जनमाणसात पोहचविण्यासाठी त्यांनी रामकृष्ण मिशन सुरु केले. आज जगभर त्यांच्या अनेक शाखाआहेत. स्वामी विवेकानंदांची 150 वी जयंती सर्वत्र साजरी होणार आहे. त्यानिमित्ताने त्यांचे जीवन, जन्म आणि बालपण महाविद्यालयीन शिक्षण शिकॅगो अमेरिका येथील त्यांनी गाजविलेली सर्वधर्म परिषद स्वामी विवेकानंदांचा विचार व त्यांची शिकवण त्यांचे तरुणांना लाभलेले मार्गदर्शन हे जाणून घेऊ या.

कलकत्यातील “सिपलापल्ली” येथे 12 जानेवारी 1863 सोमवारी सकाळी त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील “विश्वनाथ दत्त” हे कलकत्ता उच्च न्यायालयात अॅटर्नी होते. ते स्वत: सामाजिक आणि धार्मिक संदर्भात पुरोगामी विचारांचे आणि उदार दयाळू स्वभावाचे होते. त्यांची माता भुवनेश्वरी देवी ही सुध्दा अत्यंत धार्मिक मनोवृत्तीची होती. नरेंद्रनाथांच्या विचार सरणीला वळण आणि संस्कार देण्यात या पालकांचा सहभाग होता. नरेंद्रनाथाला दर्शनशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, कला, साहित्य इ. अनेक विषयात कमालीची रुची व गतीही होती. वेद – उपनिषदे, रामायण, महाभारत, भगवदगीता इ. धार्मिक साहित्य वाचण्यास आणि चिंतनात त्यांना विषेश गोडी होती. शिवाय शास्त्रीय संगीताची देखील त्यांना उत्तम जाण होती. त्यासाठी त्यांनी “बेनी गुप्ता” आणि “अहमदखान” या उस्तादांकडून गायन आणि वादनाचे धडे गिरवले होते. बालपणापासूनच या विविध छंदा बरोबरच व्यायाम आणि क्रिडा, खेळ या उपक्रमांमध्ये ही ते सक्रिय सहभाग घेत होते.

आमच्या जुनाट अंधश्रध्दा आणि जाती जाती मधील भेदभाव त्यांना लहानपणापासूनच मान्य नव्हता. त्या संबंधी त्यांच्या मनात अनेक प्रश्न लहानपणीच निर्माण झाले होते. कोणतीही गोष्ट सदसद विवेकबुध्दीने आणि व्यवहार वादी दृष्टीकोनानेच ते स्वीकारीत असत.

नरेंद्र नाथांनी इ.स. 1871 साली आपल्या घरच्या शिक्षणानंतर ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या “मेट्रोपॉलिटीन इन्सिस्ट्युट” मध्ये प्रवेश घेतला. पुढे 1879 मध्ये प्रेसिडेंन्सी कॉलेजमधून परीक्षा उत्तीर्ण झाले. या संस्थेत काही काळ राहिल्यानंतर त्यांनी “जनरल असेंब्ली इन्सिस्ट्यूट” मधून प्रवेश घेतला. तिथे त्यांनी तर्कशास्त्र, पाश्चात्य तत्वज्ञान (Western Philosophy) आणि युरोपीय इतिहास यांचे सुक्ष्म अध्ययन केले. 1881 साली ते फाईन आटॉची आणि 1884 मध्ये बी. ए. ची रीक्षा उत्तीर्ण झाले. याकाळात नरेंद्रनाथांनी डेव्हीड ह्युमन, इमॅन्युएल, कान्ड, गोजीलेब, हित्श, बारुच रिचनोझा, जार्ज हेगल, आर्भर शॉपेन हाय्यर, ऑगस्ट कोमू, हर्बर पेन्सर, जॉनस्टुअर्ड, आणि चार्लस डार्विन इ. विचारांचा सखोल अभ्यास केला. हर्बर पेन्सरच्या उत्क्रंातीवादाने ते विशेष प्रभावी झाले होते. गुरुदास पट्टोपाध्याय या बंगाली प्रकाशकासाठी त्यांनी स्पेन्सरच्या “एज्युकेशन” या ग्रंथाचा अनुवाद ही केला होता. काही काळ त्यांनी “स्पेन्सर”  यांच्याशी आपला संपर्कही स्थापन केला होता.

या पाश्चात्य तत्वज्ञानाचा अभ्यासाबरोबरच त्यांनी प्राचीन संस्कृत आणि बंगाली ग्रंथांचा प्रगाढ अभ्यास केला होता. याचा अर्थ स्वामी विवेकानंद हे विद्यार्थी दशत प्रतिभावंत विद्यार्थी होते. त्यांच्या प्राध्यापकांचाही दुजोरा होता. 1881 ते 84 या कालावधीत ते जिथे शिकले त्या स्कॅटीश चर्च कॉलेजचे प्राचार्य डॉ. विव्यम हसी यांनी लिहिले आहे, ”नरेंद्र खरोखरच बुध्दीमान आहे. मी खुप फिरलो जग पाहिले परंतु त्यांच्यासारखी प्रतिभा आणि बुध्दीसामर्थ्य असलेला मुलगा अगदी जर्मन विद्यापीठातील तत्वज्ञानाच्या विद्यार्थ्यामध्ये ही मला बघायला मिळाली नाही. त्यांना विलक्षण स्मरणशक्ती असलेला म्हणून “श्रुतीधारा” म्हंटले जात असे महेंद्रलाल सरकारांनी त्यांच्यासी चर्चा केल्यावर म्हंटले होते, (भारतीय समाजातील सगळ्या समस्यासाठी त्याच्या निवारणासाठी स्वामी विवेकानंदाच्या उज्वल तेजस्वी विचारांच्या प्रकाशात वाटचाल करील असा विश्वास वाटतो. प्रा. रोलॉवू. यांनी स्वामी विवेकानंदांचा गौरव विश्वात्माच्या वाद्यवृंदानं सादर केलेले उत्कृष्ट संगीत या मोठ्या अर्थपूर्ण शब्दात केला आहे.)

“एवढ्या तरुण मुलाने एवढे वाचले असेल असे मला वाटले नव्हते.”

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..