नवीन लेखन...

स्वामी विवेकानंद विचारदर्शन

तुम्ही संन्यासी असला तरी गोरगरीबांसाठी काहीतरी केले पाहिजे. भुकेल्यांना परमार्थ समजावून सांगणे म्हणजे ही धर्माची चेष्टा आहे.

श्रेष्ठ हिंदुधर्माच्या हिंदुत्वाचा आपण कधीही विसर पडू न देता जनतेलाच परमेश्वर मानून सदोदित सत्कार्य केले पाहिजे. आपले खरे भवितव्य हे जनतेवरच अवलंबून आहे. हे सगळे तत्वज्ञान स्वामी विवेकानंदानी इ.स.1892 मध्ये म्हणजे वयाच्या 28 व्या वर्षी सांगितले. दिनांक 25 डिसेंबर ते 27 डिसेंबर असे फक्त तीन दिवस कन्याकुमारी येथे केलेल्या तपश्चर्ये नंतर ते त्यांना उलगडले होते. खर्‍या अर्थाने या तीन दिवसाच्या तपसाधनेत त्यांना जीवन ध्येय गवसले होते. ही तपश्चर्या त्यांनी तीन सागरांनी वेष्टीत अशा श्रीपाद शीलेवर केली होती. त्या तिथेच आता भव्य विवेकानंद स्मारक उभे राहिले. तेच ते स्थान होय. हिंदुराष्ट्राच्या जागृतीचे चिरंतन आवाहन बनले आहे.

2 सप्टेंबर 1970 ला स्वामी विवेकानंदाचे स्मारक कन्याकुमारीला स्वामी विवेकानंद पूरम म्हणून पूर्ण झाले. मानव सेवा हीच माधव सेवा हे तत्व आपले अंतिम ध्येय मानून 7 जानेवारी 1970 ला स्वामी विवेकानंद केंद्र त्यांच्या विचार प्रसारासाठी स्थापन झाले. स्वर्गीय एकनाथजी रानडे या स्वामी विवेकानंद केंद्राचे शिल्पकार आहेत. विवेकानंद केंद्र आज आपल्या परीने सत्कार्यरत आहे. माणसांमधील दिव्यत्वाचे प्रगटीकरण हेच ध्येय विवेकानंदानी त्यांच्या अनुयायांनी, या केंद्र कार्यकर्त्यांनी प्रेरक मानले आहे ते कार्य पुढे चालविले आहे.

”All Power is within you. You can do anything & everything Belive in that. Do not belive that you are weak. Stand up and express the divinity. With in you. Stand up be hold., be strong. Take the whole responsibilities. On your solders and know that you are the creator of your own destiny.

स्वामी विवेकानंदांचे विचार त्यांच्या 150 व्या जयंतीच्या निमित्ताने समाजातील सर्व स्तरापर्यंत पोहचले पाहिजेत. स्वामी विवेकानंद म्हणजे युवकांना स्फुर्ती देणारा निरंतर झरा आहे. त्यांचा युवा पिढीवर प्रगाढ विश्वास होता. भारताच्या पुनरुत्थानाचे कार्यासाठी युवकांनीच पुढाकार घेतला पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. त्यांनी म्हटले आहे “मला केवळ शंभर निष्ठावान कार्यकर्ते द्या. हिंदु धर्म मग जगभर पोहोचविणे शक्य होईल.” अशा निष्ठावंत कार्यकर्त्यांची समाजात आजही आवश्यकता आहे. पुढे ते म्हणतात, आम्हाला हवे आहे प्रज्ञावान, वीर तेजस्वी युवक जे समुद्र उल्लघंन करुन मृत्यूलाही अलिंगन देण्याचे धाडस करतील अशा शेकडो स्त्री – पुरुष कार्यकर्त्यांची आवश्यकता आहे. केवळ त्यासाठी आपली सर्व शक्ती लावण्याची गरज आहे. आपल्या भोवताली असलेल्या जनसमुदायाचे ह्रदय परिवर्तन करुन चारित्र निर्माण करण्याचे महत कार्य करा. सिंहा सारख्या पुरुषार्थाने युक्त सर्व शक्तिमान ईश्वराप्रती अतूट निष्ठायुक्त मांगल्याच्या भावाने भारलेले हजारो स्त्री – पुरुष उभे करा. असे सर्व स्त्री – पुरुष आपल्या देशाच्या काना कोपर्‍यात भ्रमण करतील व सामाजिक पुनरुत्थानाचा सहकार्याचा, समतेचा व दारिद्र्य विमोचनाचा शुभ संदेश समाजाला देतील. “भारत जागो विश्व जगाओ” सन 1902 साली स्वामीजींचे महाप्रयाण झाले. स्वामीजींचे विचाराने तत्कालीन समाज प्रभावित झाला होता पण तो विचार पुढे नेणारे नेतृत्व मात्र उपलब्ध नव्हते. तब्बल 23 वर्षानंतर प. पू. डॉक्टर हेडगेवार यांनी या विचारांना मूर्त स्वरुप देण्यासाठीच जणू काही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना 1925 साली नागपूरला केली. संघ कार्याचे स्वरुप बघता असे लक्षात येते की, स्वामी विवेकानंदाच्या कल्पनेचे मूर्तस्वरुप म्हणजेच संघकार्य, आज दहशतवाद, धर्मांतरण, भोगवादी संस्कृती इत्यादी आसूरी प्रवृत्ती चहुबाजूंनी हिंदुसमाजावर आक्रमण करत आहेत. त्या पासून समाजाचे रक्षण करणे हेच आजच्या परिस्थितीत धर्म कार्य आहे. यासाठीची पूर्व अट अशी आहे की या देशातील हिंदु समाज संस्कारीत होऊन संघटीत होण्याची गरज आहे. अशा व्यक्तींचा संघटित समाज निर्माण करणे हेच श्रेष्ठ कार्य आहे. आणि हाच विवेकानंदांचे जीवनाचा संदेश आहे.

— डॉ. भास्कर व्य. गिरिधारी
नाशिक.
(सौजन्य – “पंढरी प्रहार”)

९ मार्च २०१३ 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..