नवीन लेखन...

स्वभावरेषा ….

मानवी मनाची उकल करणे हे सोपे नसते आणि ते सुद्धा त्याला न भेटता काही शब्दांवरून , अक्षरांवरुन खरे तर ग्रॅफालॉजी हा विषय अंधश्रद्धेकडे नेणारा आहे असे काही म्हणतात. ते विज्ञान आहे का ? असेही प्रश्न विचारले जातात. मी सतत सांगत आलो आहे हा एक अभ्यास आहे आणि अभ्यास म्हटले की , परीक्षा म्हटले की यात यश अपयश येतच रहाणार कॉम्प्युटरच्या युगात अनेक माणसे हाताने लिहिणे विसरले आहेत तर डिजिटल युगात चेकवर स्वाक्षरी करावी लागत नाही सर्व व्यवहार मोबाईल द्वारे होतात, कॉम्पुटर द्वारे होतात. पत्र लिहिणे हे शहरातील माणसे विसरली आहेत. तरीपण हजारो माणसे आजही पत्र लिहितात. ते कशी आणि काय करतात ह्याबद्दल आज आपण विचार करणार आहोत. लहानपणापासून मी रेडिओ वर ‘ आपली आवड ‘ ऐकत होतो आणि कोणी कुठून कशी गाण्याची फर्माईश केली त्यांची नावे सांगतात. असे रेडिओवर अनेक कार्यक्र्म होतात ज्यामध्ये श्रोत्यांच्या पत्रांना उत्तरे देतात. त्या येणाऱ्या पत्रांबद्दल मला खूप कुतूहल होते. परंतु मी रेडिओवर क्रिकेटचे लाईव्ह अपडेट्स द्यायला लागलो तेव्हा सम्पूर्ण सामना संपेपर्यंत मला स्टुडिओ मध्ये रहावे लागते तेव्हा ‘ आपली आवड ‘ हा कार्यक्रम स्टुडिओमध्ये बसून आईकाला मिळतो समोर निवेदक म्ह्णून कधी श्रीराम केळकर , दिनेश अडावदकर किंवा सुलभा सौमित्र असतात, ते जेव्हा ती पत्रे घेऊन त्यांची नावे वाचतात ती पत्रे माझ्या बघण्यात आली आणि खरेच इतके आस्चर्य वाटले की रेडिओचा प्रभाव खूप दूरवर पसरला आहे ते, त्यांची पत्रे अगदी सुशोभित केलेली असतात , छान बॉर्डर असते वेगळ्या रंगाची , कधी त्याचे नाव आणि पत्त्याचा रबरस्टॅम्प मारलेला असतो इतका रेडिओचा प्रभाव आणि आपले नाव रेडिओवर यावे यासाठी दुर्गम भागातून पत्रे येतात, तर आपल्या शहरात अजून मराठी कार्यक्रम रेडिओवर होतात किंवा रेडिओ चालू आहे हे देखील किती अज्ञानी मराठी माणसांना माहित नाही. एके दिवशी मी असाच बसलो असताना कुठले तर हायफाय जोडपे आले होते , पत्रांचा ढीग पाहून ती बाई म्हणाली अय्या अजून पोस्टकार्डे मिळतात, मी जरा शांत शब्दात म्हणालो अहो पुणा , मुबई, डोबावली, किंवा नाशिक म्हणजे महाराष्ट नाही रेडिओची किती क्रेझ आहे बाहेर ते आपल्या शहरातील लोकांना अजून माहीत नाही. आज खऱ्या बातम्या विश्वनीय बातम्या आज रेडिओवरून दिल्या जातात हे महत्वाचे आणि त्याची दखल अनेकजण घेतात.
तर ती पत्रे मी पहिली , त्यावरील अक्षर, अत्यंत साधे संयमित लिहिणे पाहून बघत रहावे . त्याचे अक्षर अत्यंत कोरीवपूर्ण असते, परंतु सह्या बघीतल्या तर इतक्या वेगेवेगळ्या असतात कारण कधीकधी आपला ठसा उमटवण्याच्या नादात फार ही मंडळी अत्यंत आकर्षक आणि वेगळ्या सह्या करतात खऱ्या कधीकधी त्यांच्या नसतीलही परंतु बघताना खूप मजा येते. प्रत्येकाला आपले नाव रेडिओवर यावे ही इच्छा असते अर्थात ती पत्रे मी इथे देऊ शकत नाही ते व्यवहार्य होणार नाही परंतु आज मी अशी पत्रे देत आहे ती सुमारे ८० ते ९० वर्षांपूर्वीची आहेत माझ्याच घरामधली काही मोडी लिपीतली माझ्या आजोबांची आहेत त्यावेळचे जुन्या मंडळींचे अक्षर आणि लिहिण्यातील संयम , आपुलकी लक्षात येते सलगता ल्सखात येते. . ते अक्षर वाचताना कळेल की कठीण परिस्तिथी मध्येही ही माणसे कसा मार्ग काढतात ते बघावयास मिळले , तर काही ठिकाणी उद्वेग असेल तेव्हा त्यांचेच अक्षर कसे बदलेले असते हे पण कळेल.
त्यावेळी टाक किंवा फाऊंटन पेन असे आणि निरोप पाठवायची दोन प्रमुख साधने म्हणजे तार म्हणजे टेलिग्राम , मला आठवतंय ७० ते ८० साली रेडिओवर कार्यक्रम असेल तर तार येत असे कारण टेलिफोन काहीच लोकांकडे असत. २००० सालपर्यंत आणि पुढे परिस्तिथी खूप बदलली , ७० वर्षात काहीच झाले नाही असे नाही बरेच काही झाले , जुने गेले नवीन आले परंतु काही गोष्टी आजही महत्वाच्या आहेत त्यातील एक म्हणजे म्हणजे स्वाक्षरी आणि पत्र. आजही अनेकजण आवर्जून पत्र लिहितात. आजही पोस्टकार्डे पोस्टात मिळतात हे नवीन पिढीला सागावेसे वाटत्ते. कारण त्या लिहिण्यात आपलेपणाचा सुगंध दरवळत असतो कारण त्या अक्षरातून , शब्दातून खरा माणूस दिसतो, माझ्याकडील जी पत्रे पहा , त्यावरील मोडी लिपीतील अक्षर स्वाक्षऱ्या पहा, त्यात आपलेपणा , सलगता जाणवते , त्या वव्यक्तीच्या मनात काय आहे हे जाणवते , आपण हे सगळे मिस करत आहोत असे जाणवत नाही का…जरा आपल्या हस्ताक्षरात आपल्या मित्र मैत्रिणीला पत्र लिहून पहा आपल्याला वेगळे काही केल्याचा भास निश्चित होईल कारण मोबाईलच्या मेसेजपेक्षा किंवा चॅटिंग पेक्षा आपलेपणा आधी जाणवेल. त्याचप्रमाणे त्या व्यक्तीची मानसिक आंदोलने देखील तुम्हाला जाणवतील. हा सगळा शब्दांचा खेळ किती भारी आहे हे पण जाणवेल .
–सतीश चाफेकर

Avatar
About सतिश चाफेकर 447 Articles
सतिश चाफेकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. जगभरातील ३०००० पेक्षा जास्त व्यक्तींचा स्वाक्षरीसंग्रह त्यांच्याकडे आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..