नवीन लेखन...

सुमंत उवाच… लेखमालिका परिचय

आजपासून एक नवीन लेखमाला सुरु करत  आहोत. लेखमालेचे  नाव आहे  ‘सुमंत उवाच’.

सुमंत परचुरे यांच्या लेखणीतून साकारलेली ही लेखमालिका आपल्याला नक्कीच आवडेल.

सुमंत उवाच म्हणजे नक्की काय? हे लिखाण कशासाठी? यातून घ्यायचे काय?

श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या मनाचे श्लोक, दासबोध सारख्या लिखाणातून समर्थांनी जगायचं कसं हे सांगितलं. अध्यात्म म्हणजे काय? अध्ययनातून आत्म्याशी साधलेला संवाद म्हणजे अध्यात्म. पण समर्थांनी अध्यात्माची जोड घेऊन माणसाला मिळालेला हा मनुष्यजन्म सार्थकी कसा लावता येईल हे सांगितले आहे.

सुमंत उवाच हे जगावं कसं? या प्रश्नाला समर्थांच्या कृपेने आणि त्यांच्या विचाराने प्रेरित होऊन आलेले उत्तर आहे असे लेखकाला वाटते. सुमंत उवाच मधे अध्यात्मिक, सामाजिक, नैतिक, व्यावसायिक आणि अशा अनेक विषयांना समजून कसं घ्यायचं आणि त्याचा उपयोग आयुष्य जगताना कसा करायचा यावर भाष्य केले आहे.

ओवीबद्ध असलेले शब्द स्वरचित आहेत तर त्याचा अर्थ हा सोप्या शब्दात सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

 


लेखकाविषयी:

नाव-सुमंत जयंत परचुरे.
वास्तव्य – ठाणे.
मोबाईल क्रमांक: 9820944493
व्यवसाय – 
ऋतू फूड्स- विविध प्रकारचे फूड प्रॉडक्ट्स उत्पादन (उकडीचे मोदक, पुरणपोळी, गुळपोळी, खजुरपोळी, विविध प्रकारचे लाडू, भाकरी- चपाती, मसाले, भाजणी, नमकीन पदार्थ, करंजी, पापड ई.)
शिक्षण – हॉटेल मॅनेजमेंट.
 
छंद – गेली 27 वर्षे सहयाद्री मधे भटकंती, 200 हुन किल्ले भटकंती पूर्ण. काव्य लेखन, कथा लेखन, प्रवास वर्णनं लेखन करणे.
“Bharpet” नावाने YouTube चॅनल.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..