नवीन लेखन...

मराठीतील निवेदक, मुलाखतकार, लेखक, पत्रकार सुधीर गाडगीळ

सुधीर गाडगीळ यांनी विविध क्षेत्रातील २८०० हून अधीक नामवंत व्यक्तींच्या मुलाखती घेतल्या आहेत. त्यांचा जन्म २५ नोव्हेंबर १९५० रोजी झाला.  या मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, उद्योगपती शंतनु किर्लोस्कर, अभिनेत्री माधुरी दिक्षित, चित्रकार मकबूल फिदा हुसेन, गायक आशा भोसले, व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण. यांचा समावेश आहे. त्यांच्या मुलाखती म्हणजे मान्यवरांशी मारलेल्या अनौपचारिक दिलखुलास गप्पा असतात. प्रास्ताविक आणि पाहुण्यांची नावं तपासत लाडे लाडे निवेदन करण्याच्या काळात मा.सुधीर गाडगीळ यांनी स्वत:चं मुलाखतकार आणि निवेदक म्हणून हुकमी स्थान निर्माण केलं. त्यासाठी पत्रकारितेतील अनुभवाचा त्यांना खूपच उपयोग झाला. मा.सुधीर गाडगीळ यांची कारकिर्द १९७० च्या सुमारास सुरु झाली.

१९७१ मध्ये मुंबईत ‘तेजस्वी’ साप्ताहिक सुरू झाले होते. तिथे ते मुंबईचा ब्युरो इन्चार्ज म्हणून काम करू लागले. कॉमर्समधून पदवी घेतल्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्रची ऑर्डर हातात असतानाही सुधीर गाडगीळ ‘मनोहर’ साप्ताहिकात सहसंपादक म्हणून काम करू लागले. १९७३ ते १९८० पर्यंत त्यांनी ‘मनोहर’मध्ये काम केलं. ‘मनोहर’ ही त्यांची शेवटची नोकरी. त्यानंतर मुक्तपत्र कारिता केली. ‘मुलखावेगळी माणसं’ ‘प्रतिमा आणि प्रतिभा’, ‘गजरा’, ‘युवदर्शन’, ‘मुखवटे आणि चेहरे’ असे अनेक दूरदर्शन साठी कार्यक्रम त्यांनी केले. विशेष म्हणजे, लता मंगेशकर, आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना खडीकर, पंडित हृदयनाथ मंगेशकर या मंगेशकर कुटुंबीयांच्या प्रकट मुलाखती घेण्याचा मान सुधीर गाडगीळ यांच्या कडे आहे.

आशा भोसले यांच्या जाहीर मुलाखती तर ते सलग २७ वर्ष घेत आहेत. जुलै १९८५ मध्ये त्यांनी आशा भोसले यांची पहिल्यांदा मुलाखत घेतली. प्रकट मुलाखती घेण्याच्या बाबतीत तर सुधीर गाडगीळ यांच्या नावावर राष्ट्रीय उच्चांक आहे. त्यांनी आतापर्यंत ३ हजार ६८२ प्रकट मुलाखती घेतल्या आहेत. त्यांनी टीव्हीवर घेतलेल्या मुलाखतींवर आधारित ‘मुलखावेगळी माणसं’ असा एकपात्री स्वतंत्र कार्यक्रम केला. पण, तो फक्त परदेशांकरिता. टीव्हीवर त्याच नावाचा कार्यक्रम होता. पण, तो वेगळा होता. तिथे मी प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या होत्या आणि इथे त्यांनी घेतलेल्या सगळया माणसांचं मुलखावेगळंपण एकत्र किस्से-कथनाच्या माध्यमातून मांडत होतो. अमेरिकेतल्या तर ५१ शहरांमध्ये आठ वेळा जाऊन त्यांनी हा कार्यक्रम केला. दक्षिण पूर्व अमेरिका, मॉरिशस, जपान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, चीन, आफ्रिका अशा सर्व ठिकाणी महाराष्ट्र मंडळातून हे कार्यक्रम केले आहेत.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट

सुधीर गाडगीळ यांची माहिती, मुलाखत वाचण्यासाठी
http://mulakhat.com/sudhir-gadgil/
http://thinkmaharashtra.com/node/1885

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4231 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..