नवीन लेखन...

कथाकार अच्युत बर्वे

अच्युत बर्वे यांचा जन्म ३ फेब्रुवारी १९२७ रोजी मुंबई येथे झाला.

अच्युत बर्वे यांची अनुभवसृष्टी ही स्वतंत्र आणि स्वयंभू होती. त्यांची कथातंत्रावरची पकड असामान्य होते. त्यांचा मानवी स्वभावाचा अभ्यासही मनोवैज्ञानिकालाही नवीन वाटेल, असे होते.

बर्वे यांनी मुंबईच्या विल्सन महाविद्यालयातून बी.ए स्सी. केले. काही काळ त्यांनी कोकणातील दापोली येथे शिक्षकपदावर नोकरी केली. नंतर अहमदाबाद येथे साराभाई उद्योगसमूहात १९५२ पर्यंत नोकरी केली. पुढे ३० वर्षे शिल्पी ॲ‍रडव्हर्टायझिंग कंपनीत ते कार्यरत होते. त्यांना चेअरमन पदापर्यंत पदोन्नती मिळाली. ‘आंबट गोड, चंदनाचा उंबरठा, झोका, कोंबड्याची पात, पाठमोरी, हँगओव्हर’ हे त्यांचे महत्त्वाचे कथासंग्रह आहेत. ‘मातीचा वास’ ही त्यांची पहिली कादंबरी असून ‘कॅलिडिओस्कोप’ ही आचार्य अत्रे यांच्या व्यक्तिमत्त्वाचा वेध घेणारी कादंबरी विशेष गाजली. यानंतर आपल्या मुक्या आणि बहिर्याव मुलीवर आधारलेली त्यांची ‘सुखदा’ ही कादंबरी वाचकांच्या मनाला स्पर्श करणारी व वाचकांचे मन हेलावून टाकणारी ठरली.

त्यांच्या कथालेखनावर ना. सी. फडके यांच्या रंजक शैलीची आणि ‘रोमँटिक’ प्रवृत्तीची छाप असल्याचे जाणवते. हलक्या-फुलक्या शैलीत लिहिलेल्या त्यांच्या कथा वाचकांना रिझवतात. मात्र ‘सुखदा’ सारख्या कादंबरीत जेव्हा वाचकाला कठोर वास्तवाला सामोरे जावे लागते, तेव्हा वाचकाला जीवनाचे विदारक दर्शन घडते. आंबट गोड, चंदनाचा उंबरठा, झोका, पाठमोरी, हँग ओव्हर, मातीचा वास, कॅलिडोस्कोप, सुखदा, असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे. अच्युत बर्वे हे प्रसिध्द लेखीका मंगला बर्वे यांचे पती.

अच्युत बर्वे यांचे निधन १६ एप्रिल १९८२ रोजी झाले.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4238 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..