नवीन लेखन...

ध्वनिरोधक खिडक्या

फार थोड्या लोकांना घरात शांततेचा अनुभव मिळतो. रात्रीच्या वेळी कुत्री भुंकत असतील किंवा शेजाऱ्यांचा म्युझिक प्लेयर, टीव्ही जोरदार आवाजात भोवतालच्या जगाचा विसर पडून वाजत असेल तर झोपेची वाट लागायला वेळ लागत नाही. अशावेळी आपण रात्री उठून कुणाशी भांडायला जात नाही.

रात्रीच काय दिवसाही वर्दळीच्या रस्त्यांवर ज्या इमारती असतात तेथे वाहनांच्या आवाजाने असह्य त्रास होतो. रुग्णालयांच्या खिडक्या या कारणासाठीच ध्वनिरोधक असतात. घरातही अशा खिडक्या वापरल्या जातात त्यामुळे बाहेरचा आवाज सहजपणे आपल्या खोलीपर्यंत पोहोचत नाही. ध्वनिरोधक खिडक्या वापरल्या तर किमान ९० टक्के आवाज रोखला जातो. बाहेरचा आवाज खोलीत येतो तो खिडकीतून. जर कुणी मोठ्याने टीव्ही लावला असेल तर आपण खिडक्या बंद केल्या की, आपल्याला येणारा आवाज कमी होतो व त्रासही कमी होतो.

जर खिडक्या ध्वनिरोधक असतील तर हा आवाज खूपच म्हणजे नगण्य इतका कमी येतो. ध्वनिरोधक काच असलेली खिडकी ही आपल्या नेहमीच्या खिडकीच्या आतल्या बाजूने बसवली जाते. दोन खिडक्यांमधील मोकळ्या जागेत हवेचा थर असतो. अलीकडच्या ध्वनिरोधक खिडक्यांची रचना काहीशी वेध वेगळी असू शकते. यात ध्वनिरोधक काचांमधील वापरलेले साहित्यही महत्त्वाचे असते. या काचेत व्हिनाइल वापरले जाते. मास लोडेड व्हिनाइल असे त्याचे नाव आहे. त्याचे वैशिष्ट्य असे की, त्याचे वजन जास्त असले तरी वस्तुमान कमी असते, त्याचे वस्तुमान जास्त असल्याने काचेला ध्वनिरोधक गुणधर्म प्राप्त होतो.

ते प्लास्टिकसारखे असल्याने त्याच्या आवरणाने काचेला आणखी एक गुणधर्म प्राप्त होतो तो म्हणजे ही काच सहज फोडता येत नाही. साउंड ट्रान्समिशन क्लास नंबर वरून काच किती प्रमाणात ध्वनी रोखणार हे समजते असते. हा आकडा दुहेरी काचेच्या तावदानांसाठी जास्त असतो. ध्वनिरोधक काचेचा शोध हा विसाव्या शतकात वैज्ञानिकांनी ध्वनीचे गुणधर्म अभ्यासल्यानंतर लागला. काही पदार्थ हे ध्वनी शोषून घेतात तर काही त्याला विचलित करतात. ध्वनीला रोखण्यासाठी पहिला मार्ग म्हणजे काचेची जाडी वाढवणे त्यामुळे काच ध्वनिलहरी आदळल्यानंतर कमी कंप पावते. काचेच्या दोन थरांमध्ये इन्सुलेशन टाकणे किंवा त्यात जागा ठेवणे यामुळेही ध्वनी कमी होतो. लॅमिनेशन हा तिसरा मार्ग त्यात असून त्यात काचेच्या दोन थरात प्लास्टिकचा थर वापरला जातो. अशा प्रकारच्या काचा आपल्याला आधुनिक इमारतींच्या घरातील खिडक्या तसेच कार्यालयांचे दरवाजे व खिडक्यांना वापरलेल्या दिसतात. त्यात बाहेरून येणाऱ्या आवाजाचे प्रमाण खूपच कमी असते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..