नवीन लेखन...

अमेरिकेतील आकाशदर्शन..

अमेरिकेत पाऊल टाकले की तिथला विलक्षण निसर्ग मनाला भावतो. आपला भरतखंडही यादृष्टीने संपन्न आहेच. त्याला स्वतंत्र परंपरा, सांस्कृतिक वारसा आणि ऐतिहासिक संदर्भ आहेत. आपल्याकडील निसर्गाची वेगळीच मोहिनी आपल्या मनावर असते. अमेरिका भारताच्या मानाने उत्तरेकडे असल्याने उत्तर ध्रुवाला जास्त जवळची आहे. त्यामुळे या विशालकाय भूखंडाच्या सभोवती पॅसिफिक आणि अन्टार्टिक महासागर यांचा वेढा पडलेला.

इथलं एक वैशिष्ट्य असे जाणवते की, कुठूनही पाहिलं तरी आपल्याला नेहमीच फार मोठा आकाशाचा निळा पट्टा दिसत असतो आणि त्याची निळाई काही वेगळी अशी. आपल्या श्री कृष्णाचा रंग निळा सांगितला आहे आणि त्याचे साम्य आकाशाच्या निळाईशी दाखवले जाते.. निळेपणाची ही विलक्षण गहन गंभीरता आकाशाकडे पाहिल्यावर चटकन कळते.

इकडे आकाशात विहरणारे ढगही तसेच वेधक असतात. पांढरे ढग तर एखाद्या जलाशयात स्वच्छंदपणे विहार करणाऱ्या स्वच्छ, शुभ्र सारस पक्षांसारखे दिसत असतात. नाना आकारांचे हे ढग वाऱ्याबरोबर वेगाने फिरत असतात. त्यांच्यामागील आकाश गर्द निळे असल्यास ते आणखीनच मनात भरते. पावसाळी काळसर ढग आपल्याकडे असतात तसेच उदास भासतात.

रात्रीच्या वेळी आकाश विलोभनीय दिसते. गडद निळ्या पट्ट्यावर एक एक चांदणी हळूहळू दिसू लागते आणि आपल्या अंगभूत तेजाने चमकू लागते. रात्र जसजशी चढू लागते तसतशी ही लावण्यशोभा अधिकच रमणीय भासू लागते.

फक्त तिच्याकडे रसिकतेनं पाहाणारा डोळा तेवढा आपलाकडे हवा..

— डॉ. अनंत देशमुख

(अनघा प्रकाशन ने प्रकाशित केलेल्या ओ अमेरिका ह्या पुस्तकामधून)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..