नवीन लेखन...

शीख कट्टरतावाद्यांना कॅनडाकडुन मदत

Sikh Terrorists Funded by Canada

कॅनडाचे संरक्षणमंत्री हरजितसिंग सज्जन हे १७ एप्रिल ते २४ एप्रिल भारताच्या दौर्यावर आहेत. खलिस्तानी दहशतवाद्यांचे समर्थक असलेले कॅनडाचे संरक्षण मंत्री हरजीत सज्जन यांना भेटण्यास पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी नकार दिला आहे. एका मुलाखातीदरम्यान कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी हरजीत सज्जन खलिस्तानवादी असल्याने त्यांच्याशी भेटणार नसल्याचे सांगितले. कॅनडाच्या मंत्रीमंडळात पाच खलिस्तानवादी मंत्री आहेत व त्यांच्यामुळेच कॅनडा सरकारने पंजाब विधानसभा निवडणुकीदरम्यान कॅनडामध्ये प्रचारास परवानगी नाकारल्याचेही अमरिंदर सिंग यांनी सांगितले. हरजीत सज्जन हे कॅनडाचे पहिले भारतीय संरक्षण मंत्री असून संरक्षण मंत्रीपदी नेमणूक झाल्यानंतर प्रथमच ते भारत भेटीवर आले आहेत.

कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुड्यू यांच्या उदारमतवादी म्हणून प्रसिद्ध पावलेल्या सरकारमधील एका शीख मंत्र्याविरोधात त्यांचा हा थेट हल्ला होता. ट्रूड्यू यांच्या उदारमतवादाबद्दल आपल्यालाही आदर आहे, तरीही ते आपल्याला कॅनडामध्ये प्रवेश नाकारून अभिव्यक्ती स्वातंत्र्य का नाकारत आहेत, असा अमरिंदर यांचा सवाल आहे.

अमरिंदर यांच्या या प्रश्‍नाला कॅनडाने तातडीने उत्तर देत त्यांचे कॅनडामध्ये स्वागत असल्याचे म्हटले. ही मोठी घटना आहे; मात्र आपल्याकडील  माध्यमांनी याकडे राजनैतिक यश म्हणून पाहण्यास नकार दिला. पण देशभक्त नागरिकांनी राष्ट्रहिताला प्राधान्य दिलेल्या अमरिंदर यांच्या धैर्याचे आणि भूमिकेचे कौतुक केले पाहिजे.

कॅनडाच्या चार शीख मंत्र्यांची पार्श्वभूमी संशयास्पद

कॅनडा आणि ऑस्ट्रेलियातील श्रीमंत शीख नागरिकांनी यंदाच्या निवडणुकीत कॉंग्रेसचा राज्यातील प्रमुख विरोधक असलेल्या आम आदमी पक्षाला मोठी आर्थिक मदत केल्याचा अहवाल आहे.

भारताच्या दृष्टिकोनातून पाहता, कॅनडाच्या या चार शीख मंत्र्यांची पार्श्‍वभूमी संशयास्पद आहे. सज्जन यांचे वडील हे खलिस्तान-समर्थक जागतिक शीख संघटनेच्या संस्थापकांपैकी एक होते. सज्जनसिंग हे युद्धवीर असून, त्यांनी खासगी गुप्तचर संघटनाही चालविली आहे. दुसरे मंत्री नवदीपसिंग बैन हे दर्शनसिंग सैनी या बब्बर खालसा संघटनेच्या प्रवक्‍त्याचे जावई आहेत. आणखी एक मंत्री अमरजितसिंह सोही यांना तर दहशतवादी कारवाया केल्याच्या आरोपाखाली भारताने तुरुंगात टाकले होते; मात्र पुराव्यांअभावी त्यांना नंतर सोडून दिले होते.

खलिस्तानी उग्रवाद्यांची मदत घ्यायचा केजरीवाल यांचा प्रयत्न

१९८०च्या दशकात पंजाबमध्ये माजलेल्या स्वतंत्र खलिस्तानवादी दहशतवाद जिवंत करण्याचा प्रयत्न दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल निवड्णुका जिंकण्याकरता केला होता. पंजाब विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल खलिस्तानवादी चळवळीतील जुन्या कार्यकर्त्यांचा पाठिंबा मिळवत  होते, त्यांमुळे ही फुटीरतावादी चळवळ पुनरुज्जीवित झाली.कश्मीरप्रश्‍नी सार्वमत घ्यावे व पराभव झाला तर कश्मीर पाकिस्तानच्या हवाली करावा, अशी भूमिका ‘आप’चे नेते घेतात. नक्षलग्रस्त भागातील निमलष्करी दलांच्या नियुक्तीसंदर्भात जनमत घेण्याची मागणी त्यांनी केली होती.

पंजाबमध्ये आमआदमी पक्षाची ज्या ज्या वेळी सभा असते, त्या त्या वेळी तिथे ‘खलिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा दिल्या जायच्या. आप’च्या पोस्टर्स आणि बॅनर्सवर अरविंद केजरीवाल यांच्यासह खलिस्तानी दहशतवादी भिंद्रनवाले यांचे फोटोही झळकत होते. हे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय गंभीर होते.

अरविंद केजरीवाल यांचा आगीशी खेळ  

११ फ़ेब्रुवारीला पंजाबमधील मोगा येथे झालेल्या सभेदरम्यान अरविंद केजरीवाल यांनी ‘खलिस्तानी लिबरेशन फ्रंट’ या फुटीरतावादी संघटनेचा नेता गुरविंदर सिंग याच्या घरी मुक्काम केला. गुरविंदर सिंग याच्यावर पंजाबमध्ये दहशतवादी खलिस्तानी चळवळीचा दहशतवादी म्हणुन आरोप आहे. त्याच्यावर इतरही अनेक हत्या, हत्येचा प्रयत्न, असे आरोप आहेत.

राहुल गांधी यांच्या संगरूरमधील मौर मंडी येथे झालेल्या सभेनंतर बॉम्बस्फोट झाला, ज्यात सहा जणांचे प्राण गेले. केजरीवाल हे पंजाबमध्ये देशविरोधी शक्तींना पुन्हा उभे करण्यासाठी मदत करीत असल्याचा आरोप राहुल गांधी, कॅप्टन अमरिंदर सिंग, अकाली दल आणि पंजाबमधील अनेक राजकीय विश्लेषक-तज्ज्ञांनीसुद्धा केला. पंजाब पोलिसने खलिस्तानी घटकांचे तुष्टीकरण करून अरविंद केजरीवाल आगीशी खेळत असल्याची उघड प्रतिक्रियाही दिली.

आपल्या प्रचारसभेतही केजरीवाल पंजाबमधील तुरुंगात कैदेत असलेल्या अनेक गुंड आणि फुटीरतावादी चळवळीशी संबंधित लोकांना आपली सत्ता आल्यास मुक्त करण्याचेही केजरीवाल नेहमीच बोलत होते.

चळवळ जिवंत ठेवण्याचा प्रयत्न

खलिस्तानी फुटीरतावादी आणि त्यांचे अनिवासी भारतीय पाठीराखे यांच्याशी केजरीवाल यांचा संबंध असल्याचे वर्तमानपत्रात प्रकर्षाने पुढे आले. आमआदमी पक्षाला नोटाबंदीनंतर मोठ्या प्रमाणात निधीची कमतरता भासू लागली. त्यामुळे आमआदमी पक्षाने खलिस्तानी फुटीरतावाद्यांशी संधान साधूनच  वैध-अवैध मार्गाने पैसा गोळा केला. फोर्ड फाऊंडेशनसारख्या स्वयंसेवी संस्थांच्या आडून, हवालामार्गे लाखो रुपयांच्या रकमा जमवल्या. कित्येक खलिस्तानी कार्यकर्ते आमआदमी पक्षात सक्रियही झाले आणि त्यांनी ’आप’ला रसद पुरवली.’आप’च्या सभेदरम्यान ’स्वतंत्र खलिस्तान जिंदाबाद’च्या घोषणाही दिल्या गेल्या.केजरीवाल यांनी  मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल यांच्याविरोधात खलिस्तान समर्थक जर्नेल सिंग यालाही तिकीट देण्याचा प्रताप केला. जर्नेल सिंग याने अनेकदा युरोप आणि कॅनडात जाऊन तेथील खलिस्तानसमर्थक अनिवासी पंजाबी शीख समाजाच्या कार्यक्रमात सहभागही घेतला आहे.

फुटीरतावाद्यांशी असलेले अर्थपूर्ण संबंध, खलिस्तानी गट आणि अरविंद केजरीवाल यांचा देशविघातक संबंध पाहता केजरीवाल हे नक्कीच स्वतःच्या स्वार्थासाठी देशाच्या सुरक्षेशीसुद्धा खेळू शकतात.मात्र पंजाबच्या सुजान मतदारांनी त्यांचा पराभव केला व अमरिंदरसिंग यांना निवडुन आणले.

युरोप , अमेरिकात खलिस्तानी प्रचारक कार्यरत

आज जगात जवळपास २ कोटी ७० लाख म्हणजेच जगाच्या ० . ३९ टक्के लोकसंख्या शिखांची असून , त्यापैकी जवळपास व्यापार – उद्योगाच्या निमित्ताने १७ टक्के शिख जगभर पसरले आहेत.अत्यंत कडवी धार्मिकता आणि लढवय्येपणायासाठी ते प्रसिद्ध आहेत . परदेशात या दहशतवादाचे जाळे पूर्वीपासूनच आहे . युरोप , अमेरिका , कॅनडा , न्यूझीलंड , जर्मनी येथे खलिस्तानी प्रचारक कार्यरत आहेत . ब्रिटनमध्येही खलिस्तानचे समर्थक असून ते तेथून पंजाबमधील समर्थकांना पैशांचा पुरवठा करत आहेत.
पाकिस्तानची याला फूस असून , पंजाबमधील खलिस्तानी दहशतवादाला खतपाणी घालण्यासाठी पाकिस्तानची गुप्तहेर संघटना पुन्हा जोमाने कामाला लागली आहे . ‘ बब्बर खालसा इंटरनॅशनल ‘ आणि ‘ खलिस्तान कमांडो फोर्स ‘ सारख्या दहशतवादी संघटना पाश्चिमात्य देशांमधील शीख युवकांना भडकाविण्याचा प्रयत्न करत आहेत . यात अमेरिका , कॅनडा , ब्रिटन , फ्रान्स , जर्मनी आणि बेल्जियमसारख्या देशांमध्ये जन्म झालेल्या आणि तेथेच वाढलेल्या शीखांना लक्ष्य केले जात आहे . दहशतवादी संघटनांसह ५० सोशल नेटवर्किंग साइट आणि वीसहून अधिक वेबसाइटवरून ‘ स्वतंत्र खलिस्तान ‘ चा प्रचार सुरू आहे .

नवखलिस्तानी चळवळीला काबूत आणणे, हेच राष्ट्रहिताचे

भारतिय सैन्य व के. पी. एस. गिल यांनी सातत्याने व हिकमतीने आक्रमक आक्रमक कारवाया करीत खलिस्तानी दहशतवाद मोडून काढला. त्या सरकार त्यांच्या पाठीशी उभे राहिले. मुख्यमंत्रिपदी असतानाच बियांतसिंग यांची हत्या करण्यात आली. मात्र त्यानंतर गेली १५ वर्षे पंजाबमध्ये शांतता होती.आता युरोप,अमेरिका, कॅनडा,न्यूझीलंड येथिल सरकारांची मदत घेउन खलिस्तानी प्रचारकांवर करडी नजर ठेवली पाहिजे.दहशतवादी समर्थकांना होणारा अर्थ पुरवठा थांबविला पाहिजे.त्यांच्या राजकिय समर्थकावर देशाचे कायदे मोडल्याबद्द्ल खटले चालविले पाहिजे.

कॅनडातील भारतीय वंशाच्या लोकांची संख्या  12 लाख

नादीर पटेल हे कॅनडाचे भारतातील उच्चायुक्त आहे. त्यांचे कुटुंब मूळ गुजरातच्या कच्छचे. दोन वर्षांपूर्वी त्यांची नियुक्ती भारतात झाली. ‘येत्या वर्षाच्या अखेरीस पंतप्रधान त्रुड्यू भारताला भेट देण्याची शक्‍यता आहे,” अशी माहिती पटेल यांनी दिली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅनडाला भेट दिली होती, तेव्हा झालेल्या समझोत्यानंतर कॅनडातर्फे भारतातील अणुभट्ट्यांना युनरेनियमचा पुरवठा सुरू झाला आहे. गेल्या दोन वर्षात दुतर्फा व्यापाराचे प्रमाण 16 टक्‍क्‍यांनी वाढले आहे. सध्या उलाढाल सुमारे सहा अब्ज कॅनडियन डॉलर्स आहे. परंतु, व्यापारवृद्धीस भरपूर वाव आहे. . कॅनडातील भारतीय वंशाच्या लोकांची संख्या तब्बल 12 लाख झाली असून, त्यापैकी 5 लाख पंजाबी व शीख, सुमारे 3 लाख गुजराती व उरलेले अन्य भाषिक भारतीय आहेत. सुमारे 1 लाख भारतीय विद्यार्थी कॅनडात शिक्षण घेत आहेत.

कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी हरजीत सज्जन खलिस्तानवादी असल्याचे व कॅनडाच्या मंत्रीमंडळात पाच खलिस्तानवादी मंत्री आहेत हे वास्तव पुढे आणले. कॅनडातुन खलिस्तानला मिळणार्या समर्थनाला देशासमोर आणण्याकरता कॅप्टन अमरिंदरसिंग यांचे अभिनंदन. खलिस्तानवाद्यांचा धोका पाहता शीख कट्टरतावाद्यांना कॅनडाकडुन  मदत दिली जाणार नाही अशी त्यांच्या शीख मंत्र्यांकडून हमी घेतली पाहिजे.त्यांच्याकडून भारताच्या एकतेची आणि अंतर्गत बाबींमध्ये ढवळाढवळ न करण्याची ग्वाही घेणार का? कॅनडाने या सर्वांबाबत ग्वाही दिली असली तरी खलिस्तान चळवळ संपल्याचे अधिकृत विधान मात्र या नेत्यांनी केलेले नाही. कॅनडामधील कट्टरतावाद्यांकडून पंजाबमधील त्यांच्या समर्थकांना निधी मिळत असल्याचा अहवाल असून हे थांबवले पाहिजे.

सीमा सुरक्षा दल, पोलीस राजकीय संरक्षणामुळे बेकायदेशीर व्यापार 

पंजाबमधील ड्रग माफियांचा विदारक चेहरा संपूर्ण देशासमोर आणणारा ‘उडता पंजाब’ हा चित्रपट देशभर गाजला व नंतर पंजाबमध्ये निवड्णुकीत मुख्य मउद्दा बनला.दहशतवाद व मादक द्रव्यांला राजाश्रय देणाऱ्या गद्दार नेत्यांना निवडणुकीत पराभूत केले गेले.पाकिस्तान सीमेवरून अफ़ुची तस्करी होते. सीमा सुरक्षा दलाकडून सोयीस्कर कानाडोळा केला जात होता. पोलीस खात्याशी अफ़ु माफियांचे साटेलोटे होते. राजकीय संरक्षणाशिवाय हा बेकायदेशीर व्यापार होऊच शकत नाही. दुर्दैवाने पंजाबचे काही अकाली नेते व त्यांचे जवळचे आप्तेष्ट,अनेक इतर  माफिया मधे शामिल होते.

प्रामाणिक पोलीस  अधिकार्याची गरज

‘खलिस्तान’ चळवळीचे पार कंबरडे मोडणाऱ्या भारताला ‘मादक द्रव्यांच्या  चक्रव्यूहातून बाहेर पडणे शक्य आहे.

प्रामाणिक राजकीय इच्छाशक्ती हा या समस्येवरचा पहिला  उपाय आहे. स्वच्छ चारित्र्याच्या राजसत्तेने दणका देताच हा व्यापार कोसळून पडेल. के.पी.एस. गिलसारख्या प्रामाणिक पोलीस अधिकाऱ्याने प्रसंगी जाचक कायदे वाकवून खलिस्तान्यांचा नायनाट केला, त्याचप्रमाणे एखाद्या प्रामाणिक व कर्तव्यदक्ष अनुभवी पोलीस अधिकाऱ्याची नेमणूक करून त्यास मुक्तहस्ते काम करू दिल्यास सामान्य जनता ‘खबरी’ बनते. सामान्य नागरिकांच्या सक्रिय सहभागाशिवाय कोणताही उपक्रम यशस्वी होऊ शकत नाही .सामान्य भारतीय नागरिक हा संकटसमयी आपली देशभक्ती न चुकता दाखवितोच दाखवितो. मादक द्रव्यांच्या दुष्परिणामांसोबत पाकिस्तानचा अंतस्थ हेतूही लोकशिक्षणाद्वारे जनतेच्या लक्षात आणून दिल्यास हा काळा व्यापार राजरोस करणे माफियांना अशक्य होईल.

— ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)

ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)
About ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) 288 Articles
ब्रिगेडियर हेमंत महाजन हे राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर नियमितपणे लेखन करत असतात. त्यांचे लेख मराठीतील अनेक वर्तमानपत्रांत नियमितपणे प्रसिद्ध होतात. अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांवर ते नियमितपणे तज्ज्ञ वक्ते म्हणून कार्यक्रमांत सहभागी असतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..