नवीन लेखन...

‘शुद्राचे’ काही चालत नाही..?

एका ब्राम्हणाने पत्नीला विचारले…

” पाणी छान आणि थंड आहे..
आपल्या घरात फ्रिज नाही, कुठुन आणलेस..?”
पत्नी म्हणाली – “शेजारच्या कुंभारा कडुन.!”
ब्राम्हण – काय..? त्या शुद्राचे पाणी मला पाजलेस,
तुला लाज वाटत नाही…? आपण ब्राम्हण आहोत…
आपल्याला शुद्राचे काही चालत नाही..?”
पत्नी म्हणाली – ( घाबरली व म्हणाली )” मला माफ करा, या पुढे अशी चुक होणार नाही….
दुस-या दिवशी…
ब्राम्हण म्हणाला ; “अग… जेवायला वाढ..!”
पत्नी म्हणाली – काही नाही..!”
ब्राम्हण म्हणाला – “काय…? पोळी केली नाही..?”
पत्नी म्हणाली – ” नाही….! कारण…
तवा व चुल शुद्र लोहाराने व चुल कुंभाराने बनवलेली असल्याने मी त्या वस्तू फेकून दिल्या..!”

ब्राम्हण म्हणाला- “वेडी आहेस काय..? बरं दुध आण..!”
पत्नी म्हणाली – “मी दुध फेकुन दिले कारण….
ते शुद्र गवळ्याने दिले.
ब्राम्हण म्हणाला- मी म्हटले ‘उद्या पासुन दुध आणू नकाे’
आम्हांला शुद्रांचे काही चालत नाही..!”
ब्राम्हण म्हणाला- (किंचाळला..) ” काय…?”
ब्राम्हण म्हणाला- “बरं..बर” .. झोपायला खाट लाव..!”
पत्नी म्हणाली – “मी खाट तोडून टाकली व लाकडे जाळुन टाकली. मेलं शुद्राचं काहीच नको आपल्याला..!!”
ब्राम्हणाने डोक्याला हात लावला..
ब्राम्हण म्हणाला :- “अरे… ईथली धान्याची पोती कुठ आहेत..?”
पत्नी म्हणाली -“मी धान्य लोकांना वाटून टाकले कारण…ते आपण कुणबी शुद्रां कडुन घेतले होते. नकोच ते आपल्याला ..!”

ब्राम्हणाला भाेवळ आली व म्हणाला, ” माझे आई… घरात काहीच दिसत नाही. वस्तू कुठं गेल्या..?”
ब्राम्हणाची पत्नी म्हणाली – “नाथ… घरातली प्रत्येक वस्तू कुण्यातरी शुद्रांनेच बनवली आहे.त्यामुळे मी त्या तोडून- मोडून जाळून टाकल्या..!” ब्राम्हण मोठयाने ओरडला म्हणाला,” अरे आपण पार भिकारी झालो…एवढे घरंच काय ते उरले आता…!”
पत्नी म्हणाली,” नाथ… चिंता करू नका, मी आपल्या आज्ञे पुढे नाही, मी हे घर दान करून टाकले आहे.
कारण… हे घर त्या शुद्र गवंडी वडार व शुद्र मजुरांनी बांधले होते, नकोच बाई आपल्याला शुद्राचे.”
“नाथ…. चला आपण जंगलात जावू
कारण…इथे सर्व शुद्र आहेत, भिक्षा काय शुद्राला मागायची..? नको नको..!”

ब्राम्हण चक्कर येवुन खाली पडला, “हे देवा…
मी तर पार शुद्रापेक्षा अतिशुद्र आहे. माझ्याकडे कांहीच नाही, मीच खरा शुद्र आहे, माझे पानही शुद्रा शिवाय हालत नाही…
देवा…!! खरे उच्च शेतकरी…
सर्व अठरा पगडं जातीच महान व वंदनीय आहेत,
मी मात्र काहीच कामाचा नाही..!”

Avatar
About गणेश कदम 48 Articles
पुणे येथे वास्तव्य असलेले गणेश कदम हे विविध विषयांवर समाजमाध्यमांतून लिहित असतात. ते टेक महिंद्र या कंपनीत वरिष्ठ सल्लागार आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..