नवीन लेखन...

शैक्षणिक क्षेत्रातील ‘महामेरू’ श्रीकांत जिचकार

श्रीकांत जिचकार यांचा जन्म १४ सप्टेंबर १९५४ चा.

तो माणूस डॉक्टर होता, तो वकिलही होता, तो आयपीएस म्हणजे जिल्हा पोलिस प्रमुख दर्जाचा अधिकारी तसंच आयएएस म्हणजे कलेक्टर दर्जाचा अधिकारी होता. याशिवाय तो पत्रकारही होता. इतकंच नाही तो किर्तनकार, आमदार, खासदार आणि मंत्रीही होता. इतक्या पदव्या मिळवणारा ज्ञानयोगी म्हणजे श्रीकांत जिचकार होय.

श्रीकांत जिचकार यांची भारतातील सर्वात शिक्षित व्यक्तींच्या पक्तिंत गणती होते. या ज्ञानयोगी चैतन्याच्या झऱ्याने, ज्ञानदेवता सरस्वतीलाही अक्षरश: मोहून टाकलं. त्यामुळेच आपल्या अपार बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी एकही वर्ष वाया जाऊ न देता, बहुतेक सर्व पदव्यांवर नाव कोरलं. श्रीकांत जिचकार यांनी १९७८ साली यूपीएससीची परीक्षा दिली. यामध्ये त्यांनी अपेक्षित यश मिळवून आयपीएस झाले. पुढे दोनच वर्षात म्हणजे १९८० साली त्यांनी आयएएसची पदवी खिशात टाकली. जिचकार यांच्या वैयक्तिक ग्रंथालयामध्ये ५२,००० पुस्तके होती. श्रीकांत जिचकार यांनी आपल्या अवघ्या ४९ वर्षांच्या जीवनात, ४१ विद्यापीठात शिक्षण, २० पदव्या आणि २८ सुवर्णपदकं असा अफाट ज्ञानाचा खजिना जिंकला होता. आयएस असो वा आयपीएस, एलएलएम असो वा एमबीबीएस, देशातील बहुतेक सर्वच पदव्यां मिळवण्याचा विक्रम श्रीकांत जिचकार यांच्या नावावर जमा आहे. जिचकारांनी मिळवलेल्या २० पदव्यांमध्ये एमबीबीएस आणि एमडी, एलएलबी, एलएलएम, डीबीएम आणि एमबीए, जर्नालिझम यांचा समावेश आहे. श्रीकांत जिचकार यांनी १० विषयांत एम ए केले होते. यामध्ये लोकप्रशासन, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, संस्कृत, इतिहास, इंग्रजी साहित्य, फिलॉसॉपी, राज्यशास्त्र, भारताचा प्राचीन इतिहास संस्कृती आणि पुरातत्व, मानसशास्त्र यांचा समावेश आहे. तसेच त्यांनी संस्कृतमध्ये मानाची डी.लिट ही पदवी मिळवली होती. या मिळवलेल्या बहुतेक पदव्या या प्रथम श्रेणीतून मिळवल्या होत्या. जिचकार सरकारी बाबू म्हणून रमलेच नाहीत, अवघ्या चारच महिन्यात आएएसला रामराम ठोकून राजीनामा दिला.

जिचकार यांनी वयाच्या २५ व्या वर्षी पहिली सार्वत्रिक निवडणूक लढवली आणि जिंकून दाखवली. जिचकार महाराष्ट्र विधानसभेमध्ये १९८० साली निवडून गेले. महाराष्ट्र विधानसभेत निवडून गेलेले ते सर्वांत तरुण सभासद होते. जिचकारांनी १२ वर्षे विधानसभेमध्ये काम केले. एकेकाळी त्यांच्याकडे १४ खात्यांचा कारभार होता. यानंतर त्यांनी राज्यसभेवरही धडक मारली. १९९२ साली त्यांची राज्यसभेवर निवड झाली. जिचकार १९९८ सालापर्यंत राज्यसभेचे सदस्य होते. या काळामध्ये त्यांनी विविध समित्यांमध्ये काम केले. त्यांनी युनो आणि युनेस्को संघटनांसाठी ही काम केले. १९९९ च्या लोकसभेत मात्र जिचकारांचा पराभव झाला. सध्या दिक्षित डाएटची जी चर्चा चालू आहे, त्याची सुरुवात श्रीकांत जिचकार यांनी केली होती.

श्रीकांत जिचकार यांचे २ जून २००४ रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर
९४२२३०१७३३
पुणे.

संदर्भ: इंटरनेट.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4228 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..