नवीन लेखन...

शो मस्ट गो ऑन!

प्रश्न अस्तित्वाचा होता. तरीही या दीड वर्षात ठामपणे उभा राहिला तो मालिका क्षेत्राचा व्यवसायच. ज्या तऱ्हेने या जीवघेण्या आजाराशी झुंज देत हिमतीने मालिका क्षेत्र उभं राहिलं ते अतिशय कौतुकास्पद आहे. मालिकांमुळे अनेक घरांचा उदरनिर्वाह चालू राहिला.

अनघा दिवाळी अंक 2021’ मध्ये प्रकाशित झालेला रोहिणी निनावे यांचा हा लेख.


प्रश्न अस्तित्वाचा होता. तरीही या दीड वर्षात ठामपणे उभा राहिला तो मालिका क्षेत्राचा व्यवसायच. ज्या तऱ्हेने या जीवघेण्या आजाराशी झुंज देत हिमतीने मालिका क्षेत्र उभं राहिलं ते अतिशय कौतुकास्पद आहे. मालिकांमुळे अनेक घरांचा उदरनिर्वाह चालू राहिला.

आपलं आयुष्य नॉर्मल चालू होतं .. कुणालाच कल्पना नव्हती, डोळ्यांना न दिसणारा एक विषाणू आपल्या आयुष्यामध्ये एवढी खळबळ, एवढी दहशत माजवणार आहे. त्याविषयी आपल्याला पूर्वी कल्पना दिलेली असून सुद्धा आपण त्याकडे फार लक्ष दिलं नाही. त्याच्या प्रकोपाबद्दल आपल्याला जराही कल्पना नव्हती. मालिकांचं शुटींग व्यवस्थित चालू होतं. उगाचच करोनाचा बागुलबुवा केला जातो आहे असं सगळ्यांना वाटत होतं.
पण तो आला आणि त्याने सगळं जग हादरवून सोडलं.

मृत्यूचा दर जस जसा वाढत गेला.. तसतसं एकेक क्षेत्र बंद होत गेलं.. ऑफिसेस बंद झाली.. बस गाड्या बंद झाल्या ..सगळी माणसं दाराआड बंदिस्त झाली.!

याचा परिणाम जसा इतर क्षेत्रांवर झाला तसाच तो मालिका आणि फिल्म इंडस्ट्रीवर होणं स्वाभाविक होतं. मालिका आणि चित्रपटाचे शूटिंग हे वेगवेगळ्या स्टुडिओजमध्ये होते.. बरेचदा काही आउटडोअर लोकेशन्स वरही होते…

करोना पसरेल या भीतीने जिथे करोना चा प्रादुर्भाव जास्त आहे अशा ठिकाणी शूटिंग करण्यास सरकारने बंदी घातली तेव्हा मालिका क्षेत्रातील लोकांपुढे आणि चॅनलपुढे आता काय करायचे हा फार मोठा प्रश्न उभा राहिला . मग त्यातल्या त्यात कशा पद्धतीने शूटिंग करता येईल याचा विचार सुरू झाला. मग शूटिंग स्टुडिओ मध्ये एकाच ठिकाणी शूटिंग करणे, शूटिंगच्या ठिकाणीच कलाकार आणि तंत्रज्ञ यांनी राहणे . सगळ्यांच्या करोना टेस्ट करणे rt-pcr बंधनकारक केल्या गेले. त्याच बरोबर शूटिंगचा सगळा परिसर ठराविक वेळेनंतर SANITISE करून INFECTION होणार नाही याची काळजी घेणे. कलाकारांनी स्वतचा मेकअप स्वत करून येणे.. प्रत्येक कलाकारांनी शूटिंगच्या वेळेस तीन फुटावर उभे राहणे. सगळ्यांनी कंपल्सरी मास्क घालणे.. गरजेचे आहे असे नियम लागू करण्यात आले.
हे एक मोठेच संकट आमच्यासमोर होते.

मालिका किंवा चित्रपट म्हणजे अभिनय महत्त्वाचा आणि जो अभिनय चेहऱ्यावरच्या हावभावातून व्यक्त होतो.. तो चेहराच झाकला गेला तर हाव हाव व्यक्त होणार कसे?

त्याच काळात माझी एक मालिका चालू होती मोलकरीण बाई. ही मालिका मोलकरणींच्या आयुष्यावर आधारित असल्याने त्यांचं घर आम्ही अतिशय छोट दाखवलं होतं आणि या छोट्या घरांमध्ये तीन फुटावर प्रत्येक कलाकाराला उभं करणं हे आमच्यासाठी अतिशय कठीण होते.. एकमेकांच्या अंगाला हात लावायचा नसल्यामुळे कुठल्याही तऱहेचा ड्रामा लिहिताना बऱयाच मर्यादा पडत होत्या.

कलाकारांना सतत मास्क लावल्याने घाम येत होता. सतत शूटिंगचा एरिया SANITIZE करणे.. हा सगळा एक्स्ट्रा खर्च PRODUCER ला सहन करावा लागत होता.

वृद्ध लोक आणि लहान मुलांना कोरोना चा अधिक धोका असल्याने त्यांना शूटिंग करायची परवानगी नव्हती म्हणून ते कॅरेक्टर्स मालिकेतून काढून टाकावे लागले काही पात्रांना मारून टाकावे लागले तर काहींना गावी पाठवावे लागलं काहीजणांना कोमात पाठवावे लागले.

ज्यांच्या घरी लहान मुलं आणि वयोवृद्ध माणसं असतील त्या कलाकारांनीही शूटिंगला येणं टाळणं पसंत केलं. तर काही कलाकारांच्या घरी कामवाल्या बायका येत नसल्यामुळे घरात स्वयंपाक करणारा कोणी नाही .. ती जबाबदारी असल्यामुळे स्त्राr कलाकारांनी शूटिंग करण्यास नकार दिला. अशा सगळ्या पात्रांचं काय करायचं हा यक्षप्रश्न आमच्याकडे उभा राहिला होता.

लिहिताना खूपच गोष्टींच्या मर्यादा पडत होत्या. बाहेर घडणाऱ्या गोष्टी दाखवूच शकत नव्हतो. जे काही घडेल ते चार भिंतीतच घडवा असे आम्हाला सांगण्यात आले. अगदी कमीत कमी कलाकारांमध्ये सीन लिहावा लागत असे. त्यामुळे सीनमध्ये ग्रेंजर आणता येत नव्हतं.

लिहिण्यासाठी हा काळ जितका जिकिरीचा होता तितकाच दिग्दर्शनासाठी होता. सगळे नियम पाळून शुटींग करणे हे दिग्दर्शकासाठी एक आव्हान होतं. आणि सगळ्या गोष्टींसाठी शिपचा कॅप्टन म्हणून प्रोड्युसरलाच जबाबदार धरले जाणार असल्यामुळे त्याच्यावर खूप मोठी जबाबदारी होती, टेन्शन होतं पण म्हणतात ना शो मस्ट गो ऑन त्याप्रमाणे मालिका क्षेत्रातील लोकांनी आपलं काम सगळे नियम पाळून चालू ठेवलं.

जास्तीत जास्त शूटिंग मुंबईमध्ये होत.. पण मुंबईतच करोनाचा धोका जास्त असल्यामुळे एक दुसरा पर्याय चॅनलच्या लोकांनी शोधून काढला तो म्हणजे मुंबईबाहेर जिथे करोनाचा प्रादुर्भाव कमी आहे तिथे जाऊन शूटिंग करणे.

मग गोवा, दमण, अहमदाबाद अशा ठिकाणी लोकेशन शोधून शूटिंगला सुरुवात करण्यात आली. सगळ्या कलाकारांना तिथे घेऊन जाणे त्यांच्या राहण्याची व्यवस्था करणे त्यांची काळजी घेणे हा सगळा भार प्रोडक्शन हाऊस वर होता आणि त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी ही होती.

अशा तऱ्हेने आपलं कुटुंब सोडून मुंबईबाहेर जाऊन शूटिंग करायची तयारी सगळ्यांनीच दाखवली नव्हती. प्रत्येकाला आपल्या जीवाची भीती होती. पण पैसा तर हवाच त्यामुळे अक्षरश जीवावर उदार होऊन लोक आपलं घर आपलं कुटुंब सोडून दूर वर त्या ठिकाणी राहून शूटिंग करत होते . मात्र ज्या मालिकांमध्ये असा कलाकारांचा खूप जास्त प्रॉब्लेम आला त्यांना शूटिंग चक्क बंद करावे लागले.

मूळ मालिकेत ते ज्या घरात राहत होते, त्या घराशी साधर्म्य असलेलं घर शोधावे लागले किंवा उभे करावे लागले. सगळे आहे तसेच दिसावे, वाटावे यासाठी आम्ही अनेक क्लुप्त्या रोज शोधून काढायचो.

माझी स्वतची मालिका ‘मुलगी झाली हो’ या मालिकेचं शूटिंग गुजरात मध्ये चालू होतं.. सगळी काळजी घेऊनही एक एक करून कलाकारांना CORONA होत गेला.. मग त्या पात्राला काढून कथेमध्ये सातत्याने बदल करावे लागले.. पण जेव्हा सर्वच महत्त्वाच्या पात्रांना आणि स्वत नायिकेला ही corona झाला तेव्हा मात्र मालिकेचं शूटिंग आम्हाला नाईलाजाने बंद करावं लागलं…!

जवळ जवळ महिनाभर नवीन एपिसोड टेलिकास्ट झाले नाहीत.. आणि प्रोड्युसर सकट आम्हा सगळ्यांचं खूप नुकसान झालं.. कारण मध्ये GAP पडली तर लोकांचे कथेवरून लक्ष उडू शकतं .. यादरम्यान लोक अधिकाधिक ओटीटी प्लॅटफॉर्म वरचे चित्रपट आणि मालिका बघू लागले होते.. त्यांना काहीतरी नवीन मिळालं होतं.. त्यामुळे मालिकांच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला होता.

अशावेळी कॉम्पिटीशनही निर्माण झाली होती. प्रश्न अस्तित्वाचा होता. तरीही या दीड वर्षात ठामपणे उभा राहिला टिकून राहिला तो मालिका क्षेत्राचा व्यवसायच.. ज्या तऱहेने या जीवघेण्या आजाराशी झुंज देत हिमतीने मालिका क्षेत्र उभं राहिलं ते अतिशय कौतुकास्पद आहे. मालिकांचे शुटिंग चालू राहिल्याने अनेक घरांचा उदरनिर्वाह चालू राहिला..!

परिस्थिती माणसाला शिकवते म्हणतात ते काही खोटं नाही सगळ्यांनाच या गोष्टीचा प्रत्यय या संकटकाळात आला. कमी जागेत, कमी पात्रांमध्ये सुद्धा ड्रामा रंगवता येतो..कथा चांगल्या तऱहेने सांगता येते हे या काळात शिकायला मिळालं.. आज CORONA चा प्रादुर्भाव कमी झाला असला तरीसुद्धा आजही तेच नियम पाळून आपल्याला कसे लिहिता येईल किंवा कसे शूटिंग करता येईल याचा धडा आम्हाला सगळ्यांना मिळाला आहे.

ज्यांचं काम सुटलं त्यांच्यासमोर खूप मोठ्या आर्थिक समस्या उभ्या राहिल्या… आणि याच समस्या मानसिक आजारांसाठी कारणीभूत ठरल्या. पैसे आणि काम नसल्याने महिनोन्महिने घरात राहिलेले कलाकार हे डिप्रेशनमध्ये गेले आणि कित्येक कलाकारांनी आपलं आयुष्य या डिप्रेशनच्या भरात संपवलं देखील. यामुळे मनोरंजन क्षेत्राची अपरिमित हानी झाली. तसंच एक निरुत्साही निराश वातावरणही पसरलं.. काय करून पैसे कमवावे असा मोठा प्रश्न समोर उभा असताना काही कलाकारांनी वेगवेगळे व्यवसाय सुरू करून पर्याय शोधले उदाहरणार्थ वेगवेगळे घरगुती आणि चमचमीत पदार्थ बनवून पाठवणे बायकांनी ऑनलाईन साड्या, पर्सेस यांचा व्यवसाय सुरू केला. एका कलाकाराने तर दुधाचा व्यवसाय सुरू केला.
नाट्यक्षेत्रात या काळात अतिशय नुकसान झालं. विशेषत बॅकस्टेज वर्कर्स साठी घराचा खर्च चालवणं खूपच जिकिरीचं झालं अशावेळी काही ज्येष्ठ कलाकारांनी पैसे गोळा करून त्यांना मदतही केली.

वाईटातून चांगले एक झालं की आपण सगळे शहाणे झालो जगण्यासाठी स्वच्छतेची गरज आहे हे आपल्याला कळलं प्रत्येक गोष्ट धुवून घेतली पाहिजे बाहेरून आल्यावर हात पाय स्वच्छ धुतले पाहिजेत स्वतचे काम स्वत करता आलं पाहिजे आणि वेळ प्रसंगी कोंड्याचा मांडा करता आला पाहिजे ही शिकवण आपल्या सगळ्यांना मिळाली.

आज सगळेजण मुंबईत परतले आहेत.. आणि शूटिंग सुरू झालेला आहे तरीपण CORONA ची टांगती तलवार अजूनही डोक्यावर आहे.. मुंबईत आल्यावर सगळ्यांनी मोकळा श्वास घेतला तरी नियमांचा मास्क मनावर आणि तोंडावर ठेवणं गरजेचे आहे कारण आपल्याला टिकून राहायचं आहे.. श्वास जपायचे आहेत. !

— रोहिणी निनावे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..