नवीन लेखन...

संत्रा : विदर्भाचा भाग्योदय होणार का?

शर्माजी ज्यूस स्टाल समोर उभे होते, मला येताना पाहून सहज विचारले, पटाईतजी ज्यूस पिओगे क्या? आपण हि पक्के बेशरम, हाँ हाँ क्यों नहीं. झक मारून शर्माजीने दोन गिलास संत्र्याचे ज्यूस मागविले. ज्यूस पिता पिता शर्मा म्हणाला, हा दुकानदार भेसळ करत नाही, किती गाढे स्वादिष्ट ज्यूस आहे. मी उतरलो, शर्माजी हे संत्र्याचे ज्यूस नाही, किन्नूचे आहे. समोर पहा दुकानात किन्नू सजवून ठेवलेले आहे. पैसे देताना, शर्माने दुकानदाराला सहज विचारले, आप संत्रे कि जगह किन्नू पिलाते हो, कभी- असली संत्रे का ज्यूस भी पिलाया करो. दुकानदार हसून बोलला, ग्राहक दुगनी कीमत देने को तैयार हो तो संतरा भी पिला देंगे. 
भगव्या रंगाचे आंबट गोड ज्यूस म्हणजे संत्र्याचे ज्यूस, हि सामान्य ग्राहकाची कल्पना. त्याला किन्नू, माल्टा आणि संत्र्यातील फरक कळत नाही. भारतात संत्र्याच्या नावावर किन्नूचे ज्यूस देशी विदेशी कंपन्या विकतात. कारण स्पष्ट आहे, किन्नूत संत्र्याच्या तुलनेत जास्त रस. रस हि जास्त गाढ आणि  जास्त गोड. शिवाय स्वस्त: हि.
पण विदर्भात संत्रा होतो. ८० हजाराहून जास्त हेक्‍टरवर संत्र्याच्या बागा आहेत. दरवर्षी पाच ते सहा लक्ष टन संत्र्याचे उत्पादन होते. कमी पाऊस झाला कि कमी उत्पादन  होते आणि  शेतकर्याचे नुकसान होते. चांगला पाऊस झाला, उत्पादन जास्त झाले तरी संत्र्याला विदर्भा बाहेर पाठविण्याची व्यवस्था चांगली नसल्याने रुपयाचे २ संत्रे विकण्याची पाळी शेतकर्यावर येते.  दुसर्या शब्दांत संत्र्याची शेती हि नुकसानीची शेती. जो पर्यंत संत्र्यावर मोठ्याप्रमाणावर प्रक्रिया करणारे उद्योग लागत नाही संत्र्याची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे भाग्योदय होणे नाही.

विदर्भात संत्र्यावर प्रक्रिया करण्यासाठी अनेक उद्योग  वेळोवेळी लागले आणि बंद हि पडले. उदा. अमरावती फ्रुट ग्रोअर इंडस्ट्रियल को-ऑपरेटिव्ह सोसायटीने १९५८ मध्ये   सुरू केलेला प्रकल्प १९६३ मध्ये बंद पडला. नोगा (NOGA) ची स्थापना 1972 मध्ये झाली. या सरकारी कंपनीची वार्षिक क्षमता ४९५० टन अर्थात दिवसाची फक्त १५ टन आहे. हि कंपनी हि संत्र्याचे ज्यूस लोकप्रिय करण्यास असमर्थ ठरली. सध्या टमाटो केचप हे ह्या कंपनीचे मुख्य उत्पादन आहे.  निजी क्षेत्रात हि अनेक संयंत्र सुरु झाले आणि बंद पडले. सरकारी क्षेत्रातला काटोल संयंत्र हि तोट्यामुळे बंद पडला.  मार्केटची सद्य परिस्थितीत पाहता मुफ्त जागा आणि संयंत्रासाठी ५०% टक्के अनुदान दिले तरी कुणी संत्र्याचे ज्यूस काढणारे संयंत्र लावण्याची हिम्मत करणार नाही.  सत्य हेच आहे, संत्रा किन्नू किंवा माल्टा सोबत प्रतियोगिता करू शकत नाही. असे कृषी भवन मधल्या माझ्या एका जुन्या सहकारीचे मत.

अश्या परिस्थितीत बातमी आली, पतंजली नागपूर मध्ये मेगा फूडपार्क आणि संत्र्याचे ज्यूस काढण्याचे मोठे संयंत्र लावणार आहे.  पतंजलीचा कारभार अत्यंत पारदर्शी असल्यामुळे, काही दिवसांपूर्वी या विषयावर आस्था चेनेल वर चर्चा आणि आचार्य बाळकृष्ण यांचे विचार ऐकले. विदर्भातील शेतकर्यांच्या आत्महत्या थांबवायच्या असेल, नक्षलवाद संपवायचा असेल, तर ग्रामीण भागात मोठ्या संख्येत रोजगार निर्मिती झाली पाहिजे. नागपुरात  मेगा फूडपार्क  लावण्यामागचा हाच उद्देश्य.

विदर्भात संत्रा होतो, संत्र्याचा ज्यूस काढण्याचा एक मोठा संयंत्र विदर्भातील शेतकर्यांचे भाग्य बदलू शकतो. पण एक खंत हि त्यांच्या भाषणात दिसली, महाराष्ट्र किंवा इतर राज्यांत जिथे उद्योगांना कौड़ियों के भाव जमीन दिली जाते, तिथे फक्त विदर्भातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी २५ लाख प्रती एकर भाव बाबाजीनी मोजला.  शेती आधारित उद्योगांबाबत सरकारी उदासीनता स्पष्ट दिसून येते.  बाबांची आज्ञा, जगातल्या संत्र्या उद्योगाबाबत माहिती गोळा करणे सुरु केले. माहिती मिळाली, संत्र्याचे ज्यूस काढण्याचा संयंत्र किती हि मोठा असला तरी, फक्त ज्यूस काढून त्याला चालविणे अशक्य.  संत्र्याच्या साली आणि बियांपासून इतर उत्पादने घेतली तर संत्रा संयंत्र चालविल्या जाऊ शकते. इथे तर ग्राहकांना संत्र्याचे ज्यूस इतरांपेक्षा स्वस्त: हि विकायचे आहे.

विदर्भात ५ लक्ष टनपेक्षा जास्त संत्रा होतो. उच्च दर्जेचा संत्रा सोडल्यास बाकी संत्र्याचे अधिकाधिक ज्यूस काढल्यास शेतकर्यांना संत्र्याचा जास्त पैसा मिळू शकतो.   सर्व  बाबींचा विचार करून पतंजलीने  ८०० टन रोज अर्थात वार्षिक २,९०,००० टन क्षमतेचे विशाल संयंत्र लावण्याचा निर्णय घेतला. पाच महिने तरी संत्र्याचा ज्यूस काढण्यासाठी हा संयंत्र वापरला गेला तरी दिडेक लाख टन संत्र्यापासून ज्यूस निश्चित काढल्या जाईल. हे वेगळे हा नवीनतम तकनीकवर आधारित संयंत्र इटालियन कंपनी पुरविणार आहे.

२०१९च्या सुरवातीला हे संयंत्र सुरु करण्याची मनसुबा पतंजलीचा आहे. मेगा फूडपार्क आणि मेगा ज्यूस संयंत्रामुळे विदर्भातील शेतकर्यांचे भाग्योदय होईल का, या प्रश्नाचे उत्तर काळातच दडलेले आहे.

Avatar
About विवेक पटाईत 194 Articles
संवेदनशील मन, लेखन व वाचनाची आवड मराठीसृष्टी वर नियमित लेखन.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..