नवीन लेखन...

संस्कृत भाषा व संस्कृती : भाग – ११ – परिशिष्टे

परिशिष्ट – ()

फुलपाखरू आणि संस्कृत (व इतर भाषा )

[ ‘संस्कृत भाषेचे ऐक्यासाठी योगदानया शीर्षकाच्या प्रा.शेषराव मोरे यांच्या लोकसत्तामधील लेखावरील,

श्री. किशोर मांदळे यांच्या प्रतिक्रियेतील एक मुद्दा ]

 

 • ‘संस्कृतमध्ये फुलपाखराला शब्द नाहीं’ असें दुर्गा भागवत यांनी म्हटल्याचें सांगून मांदळे यांनी संस्कृतवर टीका केलेली आहे.  (पहा लेखाचा भाग -६ ).
 • ‘संस्कृतमध्ये फुलपाखराला स्वतंत्र  शब्द नाहीं’ असें कदाचित दुर्गा भागवत यांना अभिप्रेत असावें.
 • एक गोष्ट नक्की. संस्कृतमध्ये फुलपाखराला शब्द नाहीं हें logically सर्वथैव असंभव आहे. एखादी गोष्ट जर भारतात नसेलच, तर तिला संस्कृमध्ये शब्द नाहीं, हें बरोबर आहे. उदाहरणार्थ, ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमधील कांगारू, एमू वगैरे प्राणी भारताताच काय, पण जगात इतरत्र कुठेही उपलब्ध नाहींत. त्यामुळे, संस्कृतच काय, पण जगातील इतर कुठल्याही भाषेत त्यांच्यासाठी शब्द नाहीं, सगळे जण त्यांच्यासाठी ऑस्ट्रेलियातील local शब्दच वापरतात. पण, फुलपाखराचें तसें नाहीं.  तें तर भारतात उपलब्ध आहेच. तर मग, त्यासाठी संस्कृत आणि इतर भारतीय भाषांमध्ये  शब्द असणारच.
 • मांदळे यांच्या मुद्द्याला वि.शं. ठाकर यांच्यासारख्या ‘Marathi-Marathi-English Thesaurus’ या अतिउपयुक्त ग्रंथाच्या विद्वान रचयित्यानें उत्तर दिलें , व फुलपाखराला ‘चित्रपतंग’ असा शब्द आहे, हें सांगितलें आहे. (लोकसत्ता, दि. २१ मे) . त्यांनी संदर्भ दिलेला आहे तो, व्ही. एस. आपटे यांच्या (इंग्लिश-संस्कृत) डिक्शनरीचा.  आपटे यांच्या डिक्शनर्‍या गेली सव्वाशे वर्षें, या विषयाचें ‘बायबल’ म्हणून ओळखल्या जातात. इतिहासाचार्य राजवाडेही भाषाशास्त्रीय विवेचन करतांना आपटे यांच्या (संस्कृत-इंग्लिश) डिक्शनरीचे संदर्भ देतात.
 • मला असलेल्या माहितीनुसार, फुलपाखराला संस्कृतमध्ये ‘पतंग’ हा शब्द आहे, व, ‘प्रजापति’ हाही शब्द आहे.
 • आपटे यांच्या ‘संस्कृत-इंग्लिश डिक्शनरी’त, ‘पतंग:, पतंगम:, पतंगिका, पतंगिन्’ असे  जे वेगवेगळे शब्द आहेत, त्यांतून Moth , एक लहान Bee , एक लहान पक्षी, grass-hopper वगैरेंचा बोध होतो, व butterfly हा अर्थ ध्वनित होतो.  (याबद्दल आणखी थोडेसें, ज़रासें पुढे).
 • ठकार यांचें म्हणणें आहे की, आपटे यांच्या ‘इंग्लिश-संस्कृत डिक्शनरी’त ‘चित्रपतंग’ हा शब्द आहे. तें योग्यच असणार.

पण, आपटे यांच्या ‘संस्कृत-इंग्लिश डिक्शनरी’मध्ये चित्रपतंग हा शब्द नाहीं. कदाचित तो कांहीं कारणानें राहून गेला असेल.

तसेंही,‘चित्रपतंग’ म्हणजे  एका विशिष्ट टाइपचा ‘पतंग’च. त्यामुळे, पतंग व चित्रपतंग या दोन्ही शब्दांमध्ये समन्वयच आहे.

 • गुजरातीमध्ये फुलपाखराला (butterfly) ‘पतंगियुं’ [म्हणजेच , संस्कृत पतंगिन् (पतंग) ] हा शब्द आहे. संदर्भ : ‘Gala’s Pocket Dictionary : English-Gujarati’ .
 • हिंदीमध्ये फुलपाखराला ‘तितली’ म्हणतात, ‘तित’ हा शब्द, संस्कृत ‘तत्र’ या शब्दपासून निघाला आहे, असें प्रामाणिक हिंदी शब्दकोशाचे रचयिते सांगतात. यावरून असें दिसतें की, ‘तितली’ म्हणजे, ‘सारखें  इत-तित, यत्र-तत्र, इथें-तिथें, इकडे-तिकडे  जाणारें / उडणारें (लहान पाखरू)’ .
 • हिंदीत आणखी दोन general शब्द दिसतात , ‘फतिंगा व ‘पतंगा’. त्याचा उगम, अर्थातच, संस्कृत ‘पतंग’ हाच आहे,  (व तसाच  अर्थ शब्दकोशातूनही निघतो).
 • ‘Bhargava’s Dictionay : English-Hindi’ आणि ‘बृहत् भारतीय प्रामाणिक हिंदी कोश’ या दोन शब्दकोशांचें सहाय्य घेऊन  ‘खणत’ गेलें तर, ‘पतंग’ या शब्दापर्यंत आपण पोचतो.
 • ‘Bhargava’s Dictionay : English-Hindi’ हा शब्दकोश हिंदीतील आणखी एक शब्द देतो, ‘प्रजापति’.
 • बंगालीतही फुलपाखराला ‘प्रजापति’ म्हणतात. अर्थातच, ‘प्रजापति’ हा संस्कृत शब्द आहे.
 • मात्र, आपटे यांची डिक्शनरी ‘प्रजापति’ या शब्दाचा फुलपाखरू असा अर्थ डायरेक्टली देत नाहीं. तिथें अन्य बरेच अर्थ दिलेले आहेत.
 • मराठीतील शब्द बघतांनाही संस्कृतचा प्रभाव दिसतो. संस्कृतमध्ये ‘फुल्ल्’ म्हणजे ‘फ्लॉवरिग’ व ‘ब्लॉसम्ड्’. त्यावरून फूल शब्द आला आहे. (प्रफुल्ल हा शब्द आठवावा. किंवा, ‘वंदे मातरम्’ या गीतातील, ‘फुल्लकुसुमितद्रुमदलशोभिनीम्’ ही ओळ पहावी ).

पाखरू हा शब्द ‘पक्षालु’ या संस्कृत शब्दाचा अपभ्रंश आहे.

[ पण, फुलपाखरू हा शब्द त्यामानानें आधुनिक वाटतो. यादवकालीन (ज्ञानेश्वरकालीन ) मराठीत हाच शब्द आहे की कांहीं अन्य, तें बघायाला हवें ] .

 • दुर्गाबाईंचा मुद्दा असा असावा की, moth, butterfly, grass-hopper वगैरेंसाठी संस्कृतमध्ये एकच शब्द ( ‘पतंग’ ) कां ? भिन्नभिन्न शब्द कां नाहींत ? (‘प्रजापति’ हा शब्दही इतर अन्य गोष्टींसाठी वापरला जातो) .

पण , अशी उदाहरणें आपल्याला अन्य भाषांमध्येही सापडतात. मराठीच घ्या. फुलपाखरू म्हणजे एक विशिष्ट प्रकारचें पाखरू. मधमाशी म्हणजे एक विशिष्ट प्रकारची माशी. गांधिलमाशी म्हणजेही एक अन्य प्रकारची माशीच. इंग्रजीतील butterfly म्हणजे एक विशिष्ट तर्‍हेची Fly (माशी).  संस्कृतमध्ये व संस्कृतोद्भव मराठीसमान प्रादेशिक भाषांमध्ये , भुंग्याला , भ्रमर, मधुकर, मधुप, वगैरे एकाहून-अधिक भिन्नभिन्न शब्द आहेत. मराठीत भुंगा, हिंदीत भौंरा, असे additional (derived) शब्दही आहेतच.  पण इंग्रजीत त्याला Bee असेंच म्हणतात, त्याला वेगळा शब्द नाहीं. खरें तर, भुंगा म्हणजे एक विशिष्ट प्रकारची Bee च आहे.

 • म्हणून, संस्कृतमध्ये ‘पतंग’ हा शब्द वेगवेगळ्या जीवांसाठी, (आणि सूर्यासाठीही ), वापरत असल्यास कांहीं बिघडत नाहीं. (आणि, ठकारांनी ‘चित्रपतंग’ हा विशेष शब्द तर दिलेलाच आहे).

तसेच ‘प्रजापति’ शब्दाचेंही आहे.

 • फुलपाखराबद्दल शब्द पहातांना, उत्तरेकडील व पूर्वेकडील कांहीं अन्य प्रादेशिक भाषांमध्येही डोकावूं या.

– पंजाबीत फुलपाखराला ‘तितली’ म्हणतात.

– ‘डोगरी’ भाषेतही फुलपाखराला तितलीच म्हणतात.

(या दोन भाषांतील शब्दांवर हिंदीचा प्रभाव स्पष्ट दिसतो).

– सिंधीमध्ये फुलपाखराला ‘पतंग’ किंवा ‘पोपटु’ / ‘पोपट’ म्हणतात.

(पोपट हा शब्द मराठीजनांना माहीत आहे ; मात्र त्याचा मराठीत अर्थ आहे ‘पॅरट्’. गुजरातीमध्येही हाच अर्थ आहे. (संस्कृतमधील, ‘शुक’ ). मात्र. पॅरट काय अन् फुलपाखरू काय, दोन्हीही ‘उडणारे जीव’च आहेत.

-उडियामध्ये ( बंगालीप्रामणेंच ) ‘प्रजापति’ म्हणतात.

 • दक्षिणी भाषांमध्ये पहा :

-तमिळमध्ये फुलपाखराला म्हणतात ‘पत्तामपूची’ ( Pattaampoochee ).

Pattaam : Honour ;  Silky or Beautiful .    Poochee : Insect.

(‘पूची’ या शब्दाचें संस्कृत ‘पुच्छ’ या शब्दाशी साम्य आहे ; पण त्यापासून पूची शब्द आला असेल काय, याची कल्पना नाहीं . तमिळ शब्दाची इटिमॉलॉजी पाहिल्यावरच तें कळूं शकेल).

– कन्नडमध्ये फुलपाखराला ‘पात्रिहित्ती’ म्हणतात. ‘पात्रि’ शब्दाचा उगम संस्कृत ‘पात्र’पासून असूं शकेल.  ( संस्कृतमधील ‘पात्र’ चा एक अर्थ आहे : Worthy ) .

-तेलगुमध्ये फुलपाखराला ‘सीताकोकाचिलुक/ का’ असा शब्द आहे. (म्हणजे, ‘ए बर्ड हू वेअर्स ए साडी’).

इथें, संस्कृतचा प्रभाव दिसतो. सीता हा शब्द आपल्या सर्वांनाच परिचित आहे. कोका म्हणजे ‘चक्रवाक पक्षी’ , व ‘चिल्’ म्हणजे वस्त्र नेसणें. (सीता या शब्दाचा तेलगुमध्ये काय अर्थ आहे, कल्पना नाहीं, मात्र शब्द संस्कृत आहे ).

-मलयालम भाषेत फुलपाखराला ‘चित्रशलभम्’ म्हणतात. आपल्याला दिसून येतें की, हा पूर्णपणें संस्कृत शब्द आहे. ‘शलभ’ हा संस्कृत शब्द grass-hopper आणि moth यांच्यासाठी वापरला जातो.

*म्हणजेच, जसें चित्रपतंग तसेंच चित्रशलभ . पतंग किंवा शलभ या generic शब्दाला ‘चित्र’ हा शब्द लावून फुलपाखरासाठी शब्द बनलेला आहे.

 

 • या चर्चतून आपल्याला हें दिसून येतें की, संस्कृतमध्ये फुलपाखराला शब्द तर आहेच ;

एवढेंच नव्हे तर, अनेक भारतीय प्रादेशिक भाषांमधील , फुलपाखरासाठी असलेल्या शब्दांनाही संस्कृतचा आधार आहे.

– – –

परिशिष्ट – ()

मतें, लेखन आणि पब्लिकेशन्समधील त्यांची प्रसिद्धी

[ ‘संस्कृत भाषेचे ऐक्यासाठी योगदानया शीर्षकाच्या प्रा.शेषराव मोरे यांच्या लोकसत्तामधील लेखावरील,

श्री. हेमंत राजोपाध्ये यांच्या प्रतिक्रियेतील एक मुद्दा ]

 

 • श्री. हेमंत राजोपाध्ये यांच्या प्रतिक्रियेतील एक मुद्दा असा :

‘… मराठी अभ्यासविश्वात ( या विषयाची ) सांगोपांग चर्चा होईल अशी अपेक्षा होती ’ .

(पहा लेखाचा भाग – ९ ).

हा मुद्दा मूळ विषयाशी डायरेक्टली  संबंधित नाहीं, म्हणून मुद्दाम वेगळा, परिशिष्ट म्हणून, घेतलेला आहे.

 

यावरील माझें कांहीं विचार असे :

 • मोरे यांच्या लेखावर बर्‍याच प्रतिक्रिया आल्या, राजोपाध्ये यांच्या लेखानंतरही येतच आहेत. त्यात निखिल जोशी हे व्यासंगी विचारवंत आहेत, ठकार हे शब्दकोशनिर्माते विद्वान आहेत, एक प्राध्यापिका आहेत, व इतरही मंडळी आहेत. मला वाटतें की, समाजाच्या-विविध-भागांमधूनही प्रतिक्रिया आलेल्या आहेत. महाराष्ट्राबाहेरून व भारताबाहेरूनही ही प्रतिक्रया आलेल्या आहेत, जसें बंगळुरुहून निखिल जोशी, व युरोपधून स्वत: राजोपाध्ये. सर्वसाधारणपणें एखाद्या लेखावर जेवढ्या प्रतिक्रिया छापून आलेल्या दिसतात, त्यापेक्षा बर्‍याच जास्त यावेळी छापून आलेल्या दिसतात , असें मला एक वाचक म्हणून वाटतें.

म्हणजेच, अनेक लोकांन या विषयात रस आहे.

 • त्यातून , जागेच्या अडचणींमुळे संपादक-मंडळाला, किती प्रतिक्रियांच्या मजकुराचा संक्षेप करावा लागला आहे, किंवा त्याला कात्री लावावी लागली आहे, तें आपल्याला नाहीत नाहीं. कदाचित त्यामुळेही, छापलेल्या प्रतिक्रिया आपल्याला लहान वाटतात .
 • आणखी एक मुद्दा असा की, साधारणपणें आपली अशी अपेक्षा असते की, शिक्षणक्षेत्रातील मंडळींनी, साहित्यक्षेतील व्यक्तींनी, त्यांची प्रतिक्रिया द्यावी. (आणि तशी ती पेपरमध्ये किंवा  एखाद्या मासिकात नंतर कदाचित येईलही). पण महत्वाची गोष्ट अशी की या वर्गाच्याही पलिकडे, ज्यांची भिन्नभिन्न प्रोफेशन्स आहेत अशी समाजातील विविध मंडळीही, अॅक्रॉस-दि-बोर्ड , (जसें की प्रोफेशननें इंजिनयर, डॉक्टर, मॅनेजर, सी.ए.,  वगैरे ; तसेंच सोशियो-इकॉनॉमिकली-भिन्नभिन्न-स्तरातली-मंडळी ),  हल्ली लिहायला, मतें मांडायला, किंवा किमान त्या विषयावर चर्चा करायला उद्युक्त होत आहेत. (मी स्वत:ही इंजिनियर आहे, याचा उल्लेख इतरत्र आहेच. मोरे स्वत:ही इंजिनियरिंगचे प्राध्यापक होते).
 • माझा लोकसत्ताशी, एक वाचक यापलिकडे कांहींही संबंध नाहीं, त्यामुळे त्यांची बाजू घेण्याचें मला कांहींच

कारण नाहीं. पण, या ज्या आठदहा प्रतिक्रिया लोकसत्तानें छापल्या आहेत, त्याव्यतिरिक्त अजून किती त्यांच्याकडे आल्या, ज्या ते छापू शकले नाहींत, हें आपल्याला माहीत नाहीं. त्यासाठी त्यांची कांहीं कारणें, (जसें की संपादकीय मंडळाची किंवा मालकांची पॉलिसी), किंवा अडचणी (जसें की स्पेस), असूं शकतात.

 • एक अन्य गोष्ट अशी की, अनेक विविध लेखांबद्दल अनेक लोकांकडे मतें असतातही , पण ते लोक, ती मतें वृत्तपत्राकडे धाडून व्यक्त करतीलच असें नाहीं. ते आपापल्या सर्कलमध्ये त्याची चर्चा अवश्य करतात ; फक्त, ती चर्चा आपल्यापर्यंत पोचत नाहीं. लोक आयुष्यभर आपापल्या प्रोफेशन्समध्ये इतके बिझी असतात की,  मतें असूनही, व इच्छा असूनही पेपरकडे प्रतिक्रिया  धाडायला वेळच मिळत नसे. नाहीं. रिटायर झालेल्यांनाही अनेक विषयांवर मतें असणारच, पण, कौटुंबिक कारणें, शारीरिक व्याधी अशा कांहीं कारणांमुळे , लेखन करून तें प्रकाशनार्थ धाडायला त्यांना जमतेंच असें नाहीं

ह्याचा उल्लेख करण्याचा हेतू असा की, सर्वच वाचकांना लिहिण्याबाबत अशा अनेक अडचणी येत असतीलच.  त्यामुळे, पेपरमध्ये न दिसलेल्या प्रतिक्रिया ह्या ‘लेटंट  ’ आहेत, असें समजायला हरकत नाहीं.

 • लोकसत्ताच्या संपादकांनी लोकसत्ताचें रूप हें विचारप्रवर्तक मासिकासारखेंच केलेलें आहे. त्यासाठी त्यांचे धन्यवाद.  पण अखेरीस तें एक दैनिक आहे , मूलत: एक ‘बातम्या देणारे पब्लिकेशन’ आहे.  वृत्तपत्राच्या छापील आवृत्तीत, संपादक मंडळींना जागेची लिमिडेशन्स असतातच.  वृत्तपत्राची ‘ई-आवृत्ती’,  ही छापील आवृत्तीचीच ‘कॉपी’ असते.

 

 • त्यामुळे, ह्या विषयाच्या अनुषंगानें मला लोकसत्ताला , ( व इतर वृत्तपत्रें आणि  नियतकालिकांनाही) , अशी विनंती करावीशी वाटते की,  – 
 • त्यांनी लेखकांच्या, व ज्या लोकांकडून आलेल्या प्रतिक्रिया ते छापत आहेत त्यांच्या, मेल आय्. डीज्. द्याव्यात. ( कांहीं लेखकांच्या दिलेल्या असतात, सर्वांच्या नाहींप्रतिक्रियावाल्यांच्यामेल आय्. डीज्. तर साधारणतया नसतातच ).   त्या असल्यास, इतर वाचकांना, आवश्यकता वाटल्यास, त्या लोकांशी डायरेक्टली संपर्क साधतां  येईल .
 • लोकसत्तावाल्यांनी , ( व इतर वृत्तपत्रें  आणि  नियतकालिकांनी ) ,  एक  ‘ई रीडर्स-फोरम’  सुरूं करावा,    एक  मासिक  सुरूं करावें . तिथें विविध वाचकांना व लेखकांना  त्यांच्या प्रतिक्रिया,  व विस्तृत लेखही,  मोकळेपणानें , देतां येतील  ;  आणि वृत्तपत्र / नियतकालिकालाही  , आकाराच्या व जागेच्या  अडचणीत न सापडतां, ते प्रसिद्ध  करता येतील.

+ + +

( समाप्त )

– सुभाष स. नाईक. Subhash S. Naik

सांताक्रुझ (प), मुंबई.  Santacruz (W), Mumbai.

Ph-Res-(022)-26105365.  M – 9869002126

eMail   : vistainfin@yahoo.co.in

Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com

सुभाष नाईक
About सुभाष नाईक 283 Articles
४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..