नवीन लेखन...

साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग १४)

सुसंकृत मानवी जीवनामध्ये नमस्कार , नम्रता , लीनता , परोपकारता , समाधान , सहनशीलता कृतज्ञता हे मूलसंस्कार आहेत . ते मानवाला जीवनाच्या कुठल्याही परमोच्च सुखात किंवा तीव्र दुःखाच्या पाशात देखील स्थितप्रज्ञ ठेवतात. हा इतिहास आहे. मानवांन ” *मीत्व* ” *अहंपणा* पासून दूर राहिलं तर नराचा नारायण होतो अशी एक म्हण अनादिकाला पासून प्रचलित आहे. संस्कारित माणसं नेहमीच नम्र ,प्रांजळ ,तृप्त ,निस्वार्थी ,समाधानी दिसून येतात.

अशी कित्येक माणसं आहेत की सर्वावस्थेत स्थितप्रज्ञ जाणवतात. त्यांच्या सुखाच्या अपेक्षा , कल्पना विवेकाधिष्ठित असतात. आपण *अध्यात्म* म्हणतो ! पण अध्यात्म म्हणजे काय ? याचे अगदीच सोपे उत्तर म्हणजे अध्य + आत्म = अध्यात्म. अध्य = आधी तर आत्म = आत्ममुख होणे. म्हणजेच स्व- विरहित जीवन जगणे म्हणजेच इदं न मम. अध्यात्म म्हणजे सर्व जीवमात्रा बद्दल मनात सद्भावना प्रेमास्था जपणे. असो.

पण अशी “मी” विरहित मानसिकता असलेली , सर्वांप्रती प्रेमभाव असलेली खुप माणसे मी जीवनात खुपच पाहिली. आणी अशा किती व्यक्तिनच्या बाबतित मी इथे उल्लेख करावा ? या संभ्रमात मी आहे !

माझ जीवन अगदी शून्यावस्थेतुन घडत गेलं ! अनेक मार्गदर्शक माणसं भेटली . सर्वार्थांनेच सर्वानी मदतीचा मैत्रपूर्ण प्रेमास्थेचा हात दिला …माझं जीवन सावरलं..!!

साताऱ्याजवळ माहुली जवळ कृष्णेच्या काठावर कृष्णधाम नावाच एक सुंदर निसर्गरम्य ठिकाण आहे . तिथे कृष्णनाथ महाराजांची खुप रम्य शांत समाधी आहे. छोटासा पण अगदी सुंदर निसर्गमय मनःशांति देणारा आश्रम आहे. खुप मोठ्ठी मोठ्ठी (विचारांनी) माणसे तिथे सन्यस्त वृत्तिने रहात होती . त्यामध्ये कै. गणपतराव आळतेकर वकील कराड , तर कै. दादासो.पंडित. अकोला , नानासो देशपांडे(अकोला) कै .बापूसो.पंडित (अकोला) कै. नानासो वेचलेकर (नागपुर) अनेक सातारकरही त्यात होते. या सर्व लोकांचा माझ्या लहान वयातच खुपच जवळचा संबंध आला आणी त्यांच्या विचारांचे संस्कार माझेवर झाले. भारताचे सर्वोच्य न्यायमूर्ती कै .चंद्रचुड़ यांना ( न्यायमूर्ती चंद्रचूड़ सातारचे प्रख्यात ज्येष्ठ वकील कै.एन.जी.जोशी यांचे वर्गमित्र होते.आणी मीही एन.जी. जोशी वकील यांचे शेजारीच रहात होतो.) तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कै . मोरारजी देसाई हे ( कै. नानासो देशपांडे (अकोला) यांचे बालमित्र असल्यामुळे ) यांनाही मला अगदी जवळून पहाता आले. त्यावेळच्या या सर्वांच्याच अनेक आठवणी अजुनही माझ्या मनाच्या संदूकेत गच्च भरलेल्या आहेत ..!

ही सगळीच माणसे सर्वार्थांनच धार्मिक ! साहित्यिक ! राजकीय ! सामाजिक ! न्यायिक ! शैक्षणिक ! उद्योजक ! बैंकिंग !
अशा क्षेत्रातील मोठ्ठी ! विद्वान ! उच्च पदस्थ असून किती निर्मोही होती !… किती सन्यस्त वृत्तिची होती !…. किती लाघवी आणी अत्यंत साधी रहाणीमान असणारी होती !… किती परोपकारी होती…याची आज प्रकर्षाने जाणीव होते ..अशा आदर्श व्यक्ती आज खुपच दुर्मिळ झाल्या आहेत. हे मात्र खरे . यांचा प्रदीर्घ सहवास मला लाभला..हे माझे पूर्वकर्म …एवढेच मी म्हणेन !
माझ्या व्याख्यानात मी आवर्जून या सर्वांच्या अनुभवांचा ! विचार संस्कारांचा उल्लेख करतो . या सर्वच व्यक्ती म्हणजे प्रत्येकी एक वैचारिक कादंबरी आहे असे मी म्हणेन .!

सातारच्या मातीत अजिंक्यताऱ्या सारखी उत्तुंग व्यक्तिमत्व असणारी माणसं होऊन गेली . याचा अभिमान आहे .

सातारला तर शिवकालीन ऐतिहासिक परंपरा आहे. अनेक संतांच्या पदस्पर्शानी पुनीत झालेली सातारा निसर्गदत्त भूमी आहे .
प्रत्येकाच्याच जीवनात असे लाभलेले सहवासाचे क्षण हे आदर्श मार्गदर्शक असतात आणी त्यातूनच जीवन घडत असते .!!!!
माझी साहित्यसंपदेची मशागत ही सातारच्या कृष्णाकाठीच झाली.हे निर्मळ सत्य !!! *गुरुवर्य कै.प्राचार्य बलवंत देशमुख सरांनी मला दिलेल्या आशीर्वादात याचा उल्लेख केला आहे .* हा माझा मनस्वी आनंद आहे.

पुणे माझी जन्मभूमी तर सातारा माझी विद्यानगरी ,कर्मभूमी .!!आणी आता उत्तरार्ध पुन्हा पुण्यभूमीत !!! आणी समृद्ध साहित्यिकांचा नित्य सहवासही पुण्यातच लाभला. कै. प्रा. शिवाजीराव भोसले , कै. जगदीश खेबुडकर (नाना) कै. प्रा. शिवाजीराव चव्हाण (सातारा) याही साहित्यिक , व्याख्यात्या व्यक्ती अगदी सहज भेटल्या पण कायम लक्षात राहिल्या. हा ही एक विलक्षण आनंद आहे !!

©वि.ग.सातपुते
(9766544908)

२४- ११- २०१८.

(पुणे मुक्कामी)

Avatar
About विलास सातपुते 115 Articles
मुद्रक, प्रकाशक, पत्रकार, संपादक, साहित्यिक (कवी,लेखक), संतचित्रकार, व्याख्याता व संस्थापक अध्यक्ष, महाकवी कालिदास प्रतिष्ठान, पुणे 41. व्यवसायात आजपर्यंत 1077 पुस्तकांचे मुद्रण केले आहे. स्वतःची 16 पुस्तके प्रकाशित आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..