नवीन लेखन...

रूट कॅनल – एक माहिती

जगभरातील सगळ्यात जास्त म्हणजे ९० टक्के लोकांना पायोरिया हा आजार होत असतो. पायोरिया हा आजार शरीरात कॅल्शियमचे प्रमाण कमी होणे, हिरड्या खराब होणे, दातांची स्वच्छता न राहणे या कारणांमुळे होतो. किडलेला दातांसाठी रूट कॅनल वरदान ठरत आहे. कारण त्यामुळे दात वाचला जातो.


आपल्या दातांना आपले आरोग्य व सौंदर्याचा आरसा मानला जातो. मात्र बहुतेक जणांना कमी वयातच दातांच्या दुखण्याला सामोरे जावे लागत असते. दात व तोंड व्यवस्थित स्वच्छ न करणे हेच दातांच्या दुखणामागील प्रमुख कारण असते. दातांच्या अस्वच्छतेमुळे होणाऱ्या आजाराला पायोरिया असे म्हटले जाते. तोंडाची दुर्गंधी, हिरड्यांमधून रक्त येणे, दात दुखणे, दात ठिसूळ होणे अशी या आजाराची लक्षणे आहेत.

जगभरातील सगळ्यात जास्त म्हणजे ९० टक्के लोकांना पायोरिया हा आजार होत असतो. पायोरिया हा आजार शरीरात कॅल्शियमचे प्रमाण कमी होणे, हिरड्या खराब होणे, दातांची स्वच्छता न राहणे या कारणांमुळे होत असतो. पायोरिया झालेला व्यक्तीचा हिरड्या पिवळ्या होत असून त्यातून रक्त येत असते. तोंडातून दुर्गंधी येत असते.

आपला तोंडात ७०० प्रकारचे विषाणू असतात. तोंड व दातांची स्वच्छता न ठेवलास त्यांची संख्या कोटींचा घरात वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. तोंडात वाढलेले विषाणू आपला दात व हिरड्यांवर हल्ला चढवितात व हळूहळू आपला दातांना आधार देणाऱ्या हाडाला नष्ट करतात.

पायोरियावर उपचार करता येऊ शकतो. पायोरियाने हलत असलेले दातदेखील आपल्याला उपचाराने मजबूत करता येऊ शकतात. चांगल्या पद्धतीने दात, जीभ व तोंडाची स्वच्छता हाच पायोरियावर प्रथमोपचार आहे. हिरड्यांवर या आजाराचा अधिक प्रभाव पडला असेल तर सर्जरी करून त्या व्यवस्थित करता येतात. दात किडले असतील तर रूट कॅनल करून ते आपल्याला आधीसारखे करता येऊ शकतात.

रूट कॅनल
पूर्वी दातांना कीड लागली तर त्यांना काढण्याशिवाय दुसरा उपाय नव्हता मात्र दंत चिकित्सेमध्ये संशोधन झाल्याने किडलेल्या दातांवरही उपचार करून त्यांना सुस्थितीत करता येऊ शकते. रूट कॅनल ही अशी उपचार पद्धती आहे की, सुंदर मोत्यांसारखा दातांना ते एक वरदानच ठरले आहे.

दात किडल्याने व्यक्तीला मरणाच्या वेदना होतात. दाताला वरच्यावर कीड लागली असेल तर त्यावर सोने अथवा चांदीची कॅप बसविली जाते, मात्र दाताला मुळापासून कीड लागली असेल तर त्याला पूर्वी दंत चिकित्सकांकडून काढण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. आता मात्र त्यावर विज्ञानाने प्रगती साधली असून रूट कॅनल ही पद्धती शोधून काढली आहे. रुट कॅनलमुळे मानवी जीवनात नवचैतन्य निर्माण झाले आहे. दात आहेत म्हणून आपण कुठलाही पदार्थ चावून चावून खाऊ शकतो. अन्यथा पडलेल्यांची अवस्था काय आहे हे तर आपण पाहतोच आहे.

तोंडातील दातांच्या मालिकेतील एखादा दात काढला तर त्याचा परिणाम तोंडातल्या इतर दातांवर होतो, तो म्हणजे दात काढल्याने त्याची जागा ही रिकामी होते व त्या आजूबाजूचे दात घासण्याची प्रक्रिया सुरू होते. त्यामुळे एक एक करून सगळे दात खिळखिळे होतात. तसेच चेहऱ्याचा शेपही बिघडतो. एका दातावर एक किंवा त्यापेक्षा अधिक रूट कॅनल तयार होऊ शकतात. या गोष्टींसह आपले सुखमयी आयुष्य वाचवायचे असेल तर किडलेल्या दातांवर रूट कॅनल करणे म्हणजे आपल्या सुंदर दातांना नवसंजीवनी देणे होय.

रूट कॅनल करण्याची पद्धती
दातांच्या किडलेल्या भागावर ड्रिल करून किडलेला भाग काढून टाकला जातो. त्या भागाची हायड्रोजन पॅराक्साईड किंवा सोडियम हायड्रोक्लोराईडने स्वच्छता केली जाते. त्यानंतर फिलरने तो खोल केलेला भाग भरला जातो. सिल्वर फिलिंग किंवा टूथ कलर फिलिंगने दात सील केला जातो. दाताला मजबुती दिल्यानंतर त्यावर कॅप बसविणे आवश्यक असते, अन्यथा दात तुटण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आधुनिक उपकरणे
रुग्णाला कमी त्रास होईल अशा पद्धतीने दंतचिकित्सा विज्ञानात आधुनिक उपकरणे तयार करण्यात आली आहेत. वायरलेस डिजीटल एक्सरेच्या मदतीने रूट कॅनल करण्यासाठी कमी वेळ व रुग्णाला देखील अधिक त्रास होत नाही. रूट कॅनल या आधुनिक पद्धतीने दातांपासून व्यथित असणारा रुग्ण समाधानी झाला असून त्याच्या दातांसाठी रूट कॅनल एक की वरदानच ठरले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..